Maharashtra Political Crisis Today, 07 July 2023 : अजित पवार यांनी ९ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. अजित पवारांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तसेच, अजूनही काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं अजित पवारांच्या गटाकडून सांगण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटातील आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra Updates : राजकीय, क्राइम आणि विविध घडामोडी वाचा…
लागोपाठ दोन दिवस ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणारे माजीमंत्री शिंगणे यांनी डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेच्या मुद्यावरून, अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज ७ जुलैला सकाळी ते ठाम निर्णयाप्रत आले. यावेळी ते बुलढाण्यातील आपल्या निवासस्थानी होते.
मीरा रोड येथील एका चौकाला देण्यात आलेले टिपू सुलतान हे नाव बदल्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसात शहरातील वातावरण पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीरा रोड येथे नया नगर नावाचा एक परिसर आहे.या भागातील एका चौकाचे २०१६ रोजी ‘हजरत टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले होते.
“सध्या त्यांचे खेळ सुरु आहेत. काल तर त्यांची मस्त पंचाईत झाली आहे. ते आणि त्यांचं नशीब. आपण कोणत्या फंद्यात न पडता काम करत पुढे जायचं आहे,” असं शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव यांनी म्हटलं आहे. 'मातोश्री'वर आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाध साधताना ते बोलत होते.
मुंबई: घरकाम करणाऱ्या नोकराने घरात कोणी नसताना चार लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली होती.
ठाणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस पक्षातील आमदारांचा एक गट फुटणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ठाणे शहरातील कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणातील सहा मुद्दे जाणून घ्या…
“ही फूट नाहीतर अजित पवार यांच्यामागे आमदारांचं बहुमत आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. पण, ती पक्षाची अधिकृत बैठक नव्हती,” अशी प्रतिक्रिया खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
डोंबिवली: डोंबिवली, कल्याण, २७ गाव परिसरात पाऊस सुरू झाला की दरवर्षी पडणारे खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन शासनाने आता ‘खड्डे आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करावा.
“भाजपा हा कधीची कोणाचा मित्र होऊ शकत नाही. भाजपाने अजित पवारांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे की, राहिलात तर राहा किंवा गेलात तर जा,” अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.
बुलढाणा: जिल्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अखेर अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिंगणेंच्या या निर्णयाने केवळ पक्षातच नव्हे तर सत्ताधारी पक्षातही खळबळ उडाली आहे.
मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरु आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
नागपूर: पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त २५ जून ते ५ जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागातून एस.टी.महामंडळाने सोडलेल्या ५ हजार यात्रा स्पेशल बसमधून संपूर्ण राज्यातून ८ लाख ८१ हजार प्रवाशांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुर गाठले. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २.५ लाखांनी अधिक आहे.
नागपूर: घरातील व्यक्तीचे निधन झाले की तेरवीला किवा वर्षश्राध्दाच्यावेळी भाताचे गोळे (पिंड) तयार करुन ते कावळ्याला खाऊ घातले जाते. ही अनेक वर्षापासूनची परंपरा आहे.
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या पूर्व, मुख्य आणि अंतिम परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.‘एपीएससी’ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याच्या अपेक्षेने या परीक्षेची तयारी करतात.
नवी मुंबई : नवसारी कडून मुलुंड कडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक झाल्याने हा कंटेनर चार गाड्या आणि एका रिक्षाला धडकला. यात रिक्षातील एक प्रवासी महिला किरकोळ जखमी झाली आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा एका पक्षाचा प्रमुख घरी बसल्याने आणि एक बाहेर फिरत असल्याने लोकांनी सोडलं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “आता सर्वजण बाहेर गेले आहेत. सर्वाचे उपचार झाले आहेत. कोणाला पट्टे लावण्यात आले होते. ते सुद्धा निघाले आहेत. आता फिरत आहेत.”
“शिवसैनिकांच्या मेहनीतवर नीलम गोऱ्हे यांनी चार वेळा आमदारकी भोगली. ज्या शिवसैनिकांच्या जोरावर ही सगळी पदे भोगली, त्यांना किती यातना होत असतील. आपल्याला काही मिळत नाही, म्हणून पक्ष सोडणारे भरपूर आहेत. पक्षाचे लाखो कार्यकर्ते उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. संधीसाधू लोक गेले असतील, तर त्याची जागा आम्ही भरून काढू. पण, सगळी पदे उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणं आणि वार करणं हे उच्च पदाधिकाऱ्यांना शोभत नाही,” अशी नाराजी आमदार अनिल परब यांनी व्यक्त केली आहे.
कल्याण- पत्नी मोबाईल संपर्काला प्रतिसाद देत नाही म्हणून पत्नीच्या कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील बुधवारी मध्यरात्री येऊन तिला आणि मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आणि पत्नीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती विरुध्द पत्नीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट भाजपच्या माध्यमातून शिंदे सरकारमध्ये सहभागी झाला.दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत झाले. अजित पवारांचे भाषण आक्रमक होते तर शरद पवार यांनी सयंमीपणे भूमिका मांडली.
डोंबिवली- यापूर्वी शिवसेना-भाजप युतीला जनतेने राज्य सत्तेसाठी जनादेश दिला होता. त्याचे पालन न करता शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्याच्या विपरित भूमिका घेतली. अन्य पक्षांबरोबर घरोबा करुन सत्ता काबीज केली. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यापेक्षा भीतीच अधिक वाटते, असे मत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच यशस्वीरीत्या पार करण्यात आला.
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गाने जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच अधिकृत आहे,” अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
पुणे : पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. ओमप्रकाश बकोरिया यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे : प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बांधकामासाठी करण्याची सक्ती करण्यात आल्यानंतर ४ लाख ९० हजार लिटर सांडपाण्याचा वापर आतापर्यंत बांधकामासाठी करण्यात आला आहे.
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुख्याधिकारी संवर्गातील सोलापूर महापालिकेतील उपायुक्त विजयकुमार खोराटे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं. या सर्व चर्चा पंकजा मुंडे यांनी फेटाळल्या आहेत. मी कधीही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे भेटले किंवा पाहिलं नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. त्या वरळीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावर ४१२ हरकती आल्या आहेत. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्वाधिक शंभर, तर सर्वांत कमी ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात १४ हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेऊन त्या निकाली काढल्या जाणार आहेत. त्यानंतर शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेनंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्वेक्षणात आठ क्षेत्रीय कार्यालयांत १८ हजार ६०३ फेरीवाले आढळून आले आहेत.
चंद्रपूर: शहरात अस्वलीने शिरकाव केला असून पहाटे फिरायला गेलेल्या प्रेमदास मारोती रामटेके यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. यात रामटेके गंभीर जखमी झाले.
पुणे : राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर शहर काँग्रेसलाही जाग आली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात आता दर सोमवारी साप्ताहिक बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामधील सिटीस्कॅन यंत्र बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी सिटीस्कॅन केंद्रांमध्ये ही चाचणी करावी लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.