Maharashtra Political Crisis Today, 07 July 2023 : अजित पवार यांनी ९ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. अजित पवारांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तसेच, अजूनही काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं अजित पवारांच्या गटाकडून सांगण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटातील आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra Updates : राजकीय, क्राइम आणि विविध घडामोडी वाचा…
“मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतली. आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे, अशा बातम्या चालवण्यात आल्या. कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता. माध्यमांना कोणतीही बातमी देताना स्त्रोत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या चॅनेल्सवर मानहानीचा दावा ठोकणार आहे,” अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
अकोला: पश्चिम विदर्भात पाच जिल्ह्यांसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कार्यरत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांनी देखील अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवला आहे. त्यात पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चां रंगला आहे. अशातच पंकजा मुंडे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत.
“शिवसेना आणि राष्ट्रवादीने राऊत आणि सुषमा अंधारेंचं नागरी सत्कार करायला हवा. कारण, त्यांच्यामुळे आमचे काम सोप्प झालं आहे. ते जेवढं बोलतील आणि पत्रकार परिषदा घेतील तेवढी माणसं आमच्याकडे येणार आहेत. शिवसेनेतील ६ आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे येण्यास तयार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आदित्य ठाकरे, राऊत, अंधारेच राहतील,” असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.
नागपूर : राष्ट्रीय महामार्गावर कितीही खबरदारीच्या उपाययोजना केल्या तरी वन्यप्राण्यांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे.आता गुरांना रस्ता ओलांडण्यापासून आणि मानवी जीव गमावणाऱ्या धोकादायक अपघातांना कारणीभूत ठरू नये यासाठी भारतातील महामार्गालगत “बाहू बल्ली” गुरांचे कुंपण राबविण्याची योजना आखत आहोत.
उरण: पावसाळ्यापूर्वी वीज पुरवठा करणाऱ्या विजेचे खांब, तारा यांची दुरुस्ती न केल्याने उरणच्या विविध परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे.
तुमच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांचा फोटो वापरणार का या प्रश्नावर दीपक मानकर म्हणाले की, शरद पवार हे आमचे दैवत असून त्यांच्यावर आमचा अधिकार आहे. पवार साहेबांनी फोटो टाकू नका अस जरी सांगितले. तरी आम्ही शरद यांचे फोटो वापरणारच आणि आता साहेबांनी अजित पवार यांना आशिर्वाद द्यावेत अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले की, अजित पवार यांनी प्रशांत जगताप यांना पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि ऑफिस दिले होते. आता ते आम्हाला त्यानी द्यावे ही विनंती आहे.पण प्रशांत जगताप यांनी स्वतःच्या नावाने ऑफिसच्या जागेचा करार केला आहे.त्यातून त्यांनी पक्षाची एक प्रकारे फसवणूक केली आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने करार केला पाहिजे होता. अशी भूमिका मांडत ते म्हणाले की, आम्ही पक्ष कार्यालयावर दावा करणार नसून काँग्रेस भवन कार्यालयाच्या परिसरामध्ये लवकरच नवं कार्यालय उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले
पुणे प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर दिपक मानकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यावेळी दिपक मानकर म्हणाले की, माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर अजित पवार यांनी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार असून शहरातील सर्व समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. येत्या पंधरा दिवसात आम्ही शहराची कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे- घोडबंदर येथील गायमुख भागात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कंटेनर उलटल्याने घोडबंदर ते वसईतील नवघर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहे.
चंद्रपूर : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिंदे शिवसेना सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अजितदादांचे स्वागत केले आहे.
नागपूर: महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त करणारा फलक शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात लावला आहे.
अलिबाग: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रायगड जिल्हयात ठिकठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. परंतु शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या महाड तालुक्यात लागलेले बॅनर सर्वांनाच बुचकळयात टाकणारे आहेत. या बॅनरची चर्चा संपूर्ण महाड तालुक्यात सुरू आहे.
नागपूर: समाजमाध्यमांवर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन इन्स्टाग्रामवरील मित्राने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून विनयभंग केला.
नागपूर: भारतीय हवामान खात्याने आज कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
वर्धा: शासकीय सेवेत असूनही परत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या भावना यांना स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान वाटते.
मुंबई: सामान्यतः लोक ६० व्या वर्षी तर, भाजपमध्ये नेते ७५ वर्षानंतर निवृत्त होतात. पण तुमचे वय आता ८३ वर्षे झाले. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही, असा सवाल करीत अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला. पण याच अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, रामराजे नाईक निंबाळकर हे ७५ वयाच्या घरातील नेते कसे चालतात, असा सवाल आता केला जात आहे.
पुणे शहर पोलीस विभागात परिवहन विभागामध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या वैभव दिलीप शिंदे या कर्मचार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
“भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आज मंत्री बनले आहेत. राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून खासदारकी रद्द करण्यात येते. मनी लाँड्रिंग, कारखाने लुटणारे आणि देशाला बुडवणारे लोक भाजपाबरोबर मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. हा समान नागरी कायदा नाही आहे. तुम्ही विरोधकांना लक्ष्य करत आहाता. पण, वरील न्यायालयात राहुल गांधींना न्याय मिळेल आणि त्यांची खासदारकी पुन्हा बहाल होईल,”