Mumbai Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीला अपेक्षपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. संघाने थेट ऑर्गनायझर या साप्ताहिकात प्रतिकूल मत नोंदविल्यानंतर आता महायुतीत चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या तथाकथित गूप्त भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू असून आतापासूनच विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा पारड्यात पडून घेण्यासाठी नेत्यांकडून राजकीय विधाने केली जात आहेत. राज्याचे पावसाळी अधिवेशन २७ जून पासून सुरू होणार असल्यामुळे या राजकीय धुमशानाचे पडसाद विधीमंडळात उमटल्याचे पाहायला मिळू शकतात.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून पराभव सहन करावा लागला. यानंतर सांगलीचा वादावर पडदा पडेल, असे चिन्ह असतानाच आता चंद्रहार पाटील यांनी सांगलीतील विधानसभेच्या दोन जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. हे विधानसभा मतदारसंघ आम्हाला न मिळाल्यास त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live | मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

19:21 (IST) 14 Jun 2024
विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांच्यावर गुन्हा दाखल करा; अन्यथा मोर्चा काढणारच, इंडिया आघाडीचा कोल्हापुरात निर्धार

कोल्हापूर : जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य कणेरी मठ या ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी केलेले होते. त्याची शहानिशा करून जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांवर किंवा दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा खोटे वक्तव्य करून कोल्हापूरचा अपमान करणाऱ्या वक्तव्याच्या संदर्भात मिलिंद परांडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे शुक्रवारी करण्यात आली.

आज इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना भेटले. याप्रसंगी बोलताना सतीशचंद्र कांबळे यांनी आर.एस.एस.चे पंचवीस वर्षे काम करणारे यशवंत शिंदे यांचे कोर्टात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पोलीस प्रमुखांसमोर मांडले. अशा प्रकारे बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देणारे मिलिंद परांडे हे आहेत. हे वेगवेगळ्या घटनांवरून सिद्ध होते. त्यामुळे त्यांच्यावर कोल्हापुरातील दंगल रोखण्यासाठी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली.

19:03 (IST) 14 Jun 2024
धक्कादायक! लग्नाला जात असलेल्या एका दुचाकीस्वाराचा चिनी मांजाने गळा चिरला

अमरावती : कुटुंबासह लग्नाला जात असलेल्या एका दुचाकीस्वार तरुणाचा चिनी मांजाने गळा चिरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी बडनेरा ठाण्याच्या पोलीस हद्दीतील अकोला-अमरावती मार्गावरील वरूडा येथील उड्डाणपुलावर घडली.

वाचा सविस्तर...

18:34 (IST) 14 Jun 2024
Maharashtra News Live : लोकसभा निकालानंतर राज्यातील भाजपाने घेतला मोठा निर्णय; पराभवाचे विश्लेषण करणार..

लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात अपयशाचा सामना करावा लागला. यानंतर आता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या ४८ मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघात पराभव झाला, त्या मतदारसंघातील पराभवाचे विश्लेषण करण्यात येणार आहे.

17:59 (IST) 14 Jun 2024
सांगली : जिल्हा बॅंकेत ५० कोटींच्या नुकसानप्रकरणी आजी, माजी संचालकासह ४१ जणांना नोटीसा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५० कोटी ५८ लाखाचे नुकसान केल्या प्रकरणी जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी बँकेच्या आजी, माजी संचालकासह ४१ जणांना चौकशी अधिकारी डॉ. प्रिया दळणर यांनी नोटीसा बजावल्या आहेत. या सर्वांना दि.२७ जून रोजी आपले म्हणणे मांडण्यास या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:36 (IST) 14 Jun 2024
सातारा : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद बाजारात बोकड व बकरीची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री, कोट्यावधी रुपयांची विक्रमी उलाढाल

वाई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद आठवडा बाजारात बोकड व बकरीची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. लोणंद बाजार समितीच्या आवाराला बोकड व बकरीच्या आजच्या बाजाराला जत्रेचे स्वरूप आले होते. बाजारात कोट्यावधी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली.

सविस्तर वाचा...

17:03 (IST) 14 Jun 2024
Maharashtra News Live : पुणे पोर्श अपघात प्रकरणी आरोपीच्या पालकांना आणखी १४ दिवसांची कोठडी

पुणे पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि डॉक्टरांना लाच देण्यात मध्यस्थी करणाऱ्या अशपाक मकंदरला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

16:58 (IST) 14 Jun 2024
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी घेरा डालो मोर्चा; ११ जिल्ह्यांमध्ये निदर्शने, उपोषण करण्याचा संघर्ष समितीचा निर्णय

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधात १८ जून रोजी ‘घेरा डालो डेरा डालो मोर्चा’, आयोजित करण्यात आला आहे तसेच राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निदर्शने, धरणे, उपोषण या स्वरूपाचे तीव्र आंदोलन या दिवशी केले जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजय घाटगे, समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सविस्तर वाचा...

16:25 (IST) 14 Jun 2024
‘पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही,’ छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य

पुणे : शिवसेना पक्ष जेवढ्या वर्षांचा आहे, तेवढे माझे वय आहे. त्यामुळे आतापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या आहेत. पक्षात काम काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. काहीवेळा थांबावे लागते, असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पुण्यात केले.

वाचा सविस्तर...

15:59 (IST) 14 Jun 2024
अखेर अजित पवार यांची कबुली… म्हणाले, ‘कांदा प्रश्नामुळे चार जिल्ह्यांत फटका…’

पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्नाने डोके वर काढले होते. या प्रश्नी कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढावा, असे केंद्राला कळविले होते. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने लोकसभा निवडणुकीत नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत महायुतीला फटका बसल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.

वाचा सविस्तर...

15:43 (IST) 14 Jun 2024
Maharashtra News Live : निवडणुका झाल्या असत्या तर पुण्यात पाणी तुंबलं नसतं - वसंत मोरेंची टीका

"पहिल्याच पावसात पुणे तुंबले याला सर्वस्वी राज्य सरकार आणि पालिका प्रशासन जबाबदार आहे. अडीच वर्षात निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळेच पुणे तुंबले. जर निवडणुका झाल्या असत्या तर ही परिस्थिती उद्भवली नसती. प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी सध्या कुणीही नाही. त्यामुळे नालेसफाई कोण करत नाही, याकडे कोणाचेही लक्ष नाही", अशी टीका वसंत मोरे यांनी केली.

14:49 (IST) 14 Jun 2024
भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आता मिशी काढून… खासदार प्रतिभा धानोरकर यांचा टोला

यवतमाळ : चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या. प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल दोन लाख ६० हजार मतांनी पराभव केला. आता निवडून आल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक काळातील आरोपांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा...

14:29 (IST) 14 Jun 2024
अमरावती : ८६४ रुपयांच्या कापूस बियाणे पाकिटाची १८०० ला विक्री, कृषी विभागाची कारवाई

अमरावती : शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या विशिष्‍ट कंपनीच्‍या कापूस बियाण्यांची जादा दराने व छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या जुने कॉटेन मार्केट परिसरातील मे. नितीन कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून छापा घातला.

सविस्तर वाचा...

14:27 (IST) 14 Jun 2024
बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण

पुणे : बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 14 Jun 2024
वसई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटनेची पाहणी, बचाव कार्य पुन्हा सुरू

वसई: वर्सोवा खाडीजवळ सूर्या प्रकल्पाच्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. यात अडकून पडलेल्या राकेश कुमार चालकांचा शोध घेण्यासाठी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

13:33 (IST) 14 Jun 2024
Maharashtra News Live Updates : "अण्णा हजारे जेव्हा अचानक जागे होतात...", अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सरकारच्या क्लोजर रिपोर्टविरोधात भूमिका घेतली आहे. यानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अण्णा हजारेंवर टीका केली आहे. "अचानक जेंव्हा अण्णा जागे होतात... तेंव्हा समजायचं कुणीतरी उठवलंय", अशी पोस्ट मिटकरी यांनी केली आहे.

https://twitter.com/amolmitkari22/status/1801521168224239926

13:09 (IST) 14 Jun 2024
विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; वडगाव शेरी परिसरातील घटना

पुणे : खेळताना विजेचा धक्क्याने दहा वर्षांच्या शाळकरी मुलाचा मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वडगाव शेरीतील गणेशनगर भागात घडली. शाळकरी मुलाचा वीजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.

सविस्तर वाचा...

13:08 (IST) 14 Jun 2024
खासदार धानोरकर म्हणतात, “सहा विधानसभेच्या तिकीट मीच वाटणार”, पटोले म्हणतात पक्षात लोकशाही…

चंद्रपूर : माझ्या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचे तिकीट मीच वाटणार आहे, असं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा...

13:07 (IST) 14 Jun 2024
गडचिरोली : अर्चना पुट्टेवारच्या आशीर्वादाने भूमीअभिलेखमधील ‘तो’ कर्मचारीच बनला भूमाफिया? गैरमार्गाने अल्पावधीत कोट्यधीश

गडचिरोली : संपत्तीसाठी सासऱ्याची हत्या करणारी गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार हिच्या आशीर्वादाने अहेरी भूमीअभिलेख कार्यालयात कार्यरत एका कर्मचाऱ्याने शासकीय माहितीचा गैरवापर करीत नियमबाह्यपणे गावठाण क्षेत्रातील आखीव पत्रिका बनवून शेकडो कोटींचे भूखंड लाटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सविस्तर वाचा...

13:06 (IST) 14 Jun 2024
पुतळ्याआडून कोणाचे हितरक्षण ? नागपुरात प्रशासनाच्या भूमिकेवर शंका

नागपूर : अंबाझरी तलावालगतचा स्वामी विवेकानंदांचा पुतळा हटवल्यास या परिसरातील तशाच प्रकारच्या इतर खासगी बांधकामांवर कारवाई करावी लागेल. तसे करावे लागू नये म्हणून पुतळा कायम ठेवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका अंबाझरी परिसरातील पूरबाधित नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा...

13:05 (IST) 14 Jun 2024
वर्धा : निराधार वृद्धांना आसरा व मोफत उपचार, युथ फॉर चेंजचा मदतीचा हात

वर्धा : निराधार वृद्धांच्या अडचणी सोडवून त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा उपक्रम ‘युथ फॉर चेंज’ संस्थेच्या माध्यमातून युवक राबवित आहे. समाजात अनेक वृद्ध नागरिक कोणत्याही आधाराशिवाय जगत असल्याचे दिसून येते.

सविस्तर वाचा...

13:04 (IST) 14 Jun 2024
पिंपरी-चिंचवड: शॉर्ट सर्किटमुळे ट्रॅव्हल्स ला भीषण आग; सुदैवाने जीविहितहानी नाही

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील नाशिक फाटा जवळ खाजगी ट्रॅव्हल्स ला भीषण आग लागली. सुदैवाने ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. सकाळी सातच्या सुमारास बसला आग लागली.

सविस्तर वाचा...

13:03 (IST) 14 Jun 2024
कल्याण-डोंबिवलीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्ती उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

12:59 (IST) 14 Jun 2024
कामोठे उड्डाणपुलावर तरुणाला ट्रकने चिरडले

पनवेल ः कामोठे वसाहतीसमोरील पनवेल शीव महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये २० वर्षीय तरुणाला ट्रकने चिरडल्याने तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. आकाश हिरेमठ असे या मृत तरुणाचे नाव आहे. 

भिंगारी येथील ओएनजीसी गेटसमोरील झोपडपट्टीत आकाश कुटूंबासोबत राहत होता. कामोठे येथील उड्डाणपुलावरुन मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सूमारास आकाश स्कूटी घेऊन जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने आकाशला हुलकावणी दिली. या हुलकावणीनंतर काही अंतरापर्यंत आकाश ट्रकच्या पुढील चाकासोबत फरफटत नेले. त्यानंतर ट्रकच्या मागील चाकाखाली आकाशचे शरीर चिरडल्याने तो जागीच ठार झाला. या प्रकरणी कामोठे पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.

12:56 (IST) 14 Jun 2024
दरड कोसळल्याने अनुस्कुरा घाटातील वाहतूक विस्कळीत; कोल्हापूर कोकण वाहतुकीवर परिणाम

पावसाला नुकतीच कोठे सुरुवात झाली असताना दरडी कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मार्गाला होणारी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वाचा सविस्तर...

12:49 (IST) 14 Jun 2024
बलकवडी धरण तळाला गेल्याने मंदिरे अवशेष उघडले

वाई : जोर खोऱ्यातील कृष्णा नदीवर बलकवडी धरणात तब्बल २४ वर्षांपूर्वी पाण्याच्या फुगवंट्यात बुडालेली शिवकालीन मंदिरे अवशेष पाणी तळाला गेल्याने पाहण्यासाठी खुली झाली आहेत.ती पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी होत आहे.

वाचा सविस्तर...

12:44 (IST) 14 Jun 2024
Maharashtra News Live Updates : वसईच्या सुर्या प्रकल्पातील दुर्घटना दुर्दैवी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वसईत २९ मे रोजी सुर्या प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी जेसीबीचा अपघात होऊन जेसीबी ऑपरेटर गाडला गेला. १७ दिवसांपासून याठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. मात्र अद्याप जेसीबी ऑपरेटरचा थांगपत्ता लागलेला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला.

12:41 (IST) 14 Jun 2024
“RSS कडून मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग”, संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले, “संघ आता…”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू श्रीरामाने २४० जागांवर मर्यादित ठेवलं”. पाठोपाठ संघातील इतर वरिष्ठ नेत्यांनी देखील भाजपावर टीका केली आहे. दरम्यान, संघातील नेत्यांच्या वक्तव्यांचा दाखला देत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले की संघाला नरेंद्र मोदींचं अहंकारी सरकार पाडायचं आहे. भाजपाची मातृसंस्था जर या सरकारला सुरुंग लावत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत असं म्हणावं लागेल.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 14 Jun 2024
Maharashtra News Live Updates : सरसंघचालकांचा सूचक संदेश मोदी कितपत ऐकणार?

राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या सदस्यांना संबोधित करत असताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "राजकीय सत्तेच्या शोधात जबाबदार राष्ट्रीय नेत्यांनी फुटीरतावादी घोषणा आणि अजेंडा टाळला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये जरी स्पर्धा असली तरी ते एकाच राष्ट्रीय नाण्याच्या दोन बाजू असतात." सविस्तर लेख वाचण्यासाठी क्लि करा

11:56 (IST) 14 Jun 2024
‘गुलाम जास्त आवाज करत नाहीत, शिंदे आणि अजित पवार आश्रित राजे’ – संजय राऊत

शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. गुलाम जास्त आवाज करत नाहीत, त्याप्रमाणे शिंदे आणि पवार हे आश्रित राजे असून ते आवाज करणार नाहीत. राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आता अण्णा हजारे जागे झाले आहेत, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही संजय राऊत म्हणाले. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांकडे बोट दाखविले जाते.

sanjay raut modi mohan bhagvwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी भाजपावर टीका केल्याचा संदर्भ देऊन संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.