Today’s Live News Updates : देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध पक्षांची वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून तिकीट मिळालेल्या आणि अपक्ष निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात अशा बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच बहुसंख्य पक्षांनी अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. तसेच युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा चालू आहे. या जागावटपाच्या चर्चा, उमेदवारांच्या घोषणांवर आपली नजर असेल. दिवसभरातल्या राजकीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा आपण या न्यूज लाईव्ह ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra Live News Updates 21 March 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

11:38 (IST) 21 Mar 2024
कात्रजमध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार

पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात बुधवारी सायंकाळी घडली. गोळीबारात कोणी जखमी झाले नाही.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 21 Mar 2024
नाशिक : वणवे रोखण्यासाठी उपाययोजनांकडे दुर्लक्ष

नाशिक : जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही वणव्यांचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. वारंवार लागणारे वणवे पर्यावरण, जैव विविधतेला धोकादायक असतानाही ते रोखण्यासाठी वन, पर्यावरण खात्याकडून संरक्षण, वणवाप्रवण क्षेत्रात जाळपट्टे उभारणी, नुकसानीचे परीक्षण, वणवा लावणाऱ्यांचा शोध, या उपायांकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही.

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 21 Mar 2024
पिंपरी : गृहनिर्माण संस्थेतील थकबाकीदारांचे नळजोड खंडित करणार

पिंपरी : कर वसुलीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने कर संकलन व कर आकारणी विभागाने गृहनिर्माण संस्थेतील थकबाकीदारांचे अंतर्गत नळजोड खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 21 Mar 2024
“विरोधक हिंदू विरोधी, मग गुजरातमध्ये हिंदू शेतमजुरांची मजुरी किती वाढवली?” जावंधिया यांचा सवाल

नागपूर: पंतप्रधान म्हणतात विरोधी पक्ष हिंदूंचा अपमान करतात, गुजरातमध्ये मागील पंचवीस वर्षापासून भाजपचे सरकार आहे, तेथे हिंदू शेतमजुरांच्या मजुरीत किती वाढ झाली हे पंतप्रधानांनी जाहीर करावे, असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी केले आहे.

वाचा सविस्तर…

11:17 (IST) 21 Mar 2024
“NDA चा IPO लाँच झालाय, तो आता…”, एनडीएतील इनकमिंगवर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीएचा (राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा) आयपीओ लाँच झाला आहे. तो आता ओव्हरस्बस्क्राईब झाला असून भाजपा आगामी निवडणुकीत ४०० पार होणार आहे. आम्हाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील यात वाद नाही. भाजपाने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. आता लवकरच पुढची यादी जाहीर होईल. राज्यातली जागावटपही लवकरच जाहीर होईल.

“अजित पवारांनी पातळी सोडून टीका केल्याचं दु:ख”, शरद पवारांच्या बहिणीचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेप्रमाणेच हे प्रकरणही थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. न्यायालयाने घड्याळ या पक्षचिन्हाबाबत नुकतेच अजित पवार गटाला निर्देशही दिले आहेत. या सर्व चर्चा एकीकडे चालू असताना दुसरीकडे ही पक्षफूट म्हणजे शरद पवारांनी केलेली खेळी असल्याची टीकाही पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडतंय? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्यावर शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

सरोज पाटील म्हणाल्या, अजित पवारांनी शरद पवारांवर पातळी सोडून टीका केल्याचं दु:ख वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. “राजकीय पातळी सोडल्याचं दु:ख वाटतंय. पण आमच्या आईनं आम्हाला शिकवलंय की रडत बसायचं नाही. कसा तोल सुटतो हे मला कळत नाही. पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली, ते बोलता बोलता आलं असेल. कारण तो संवेदनशील आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला कदाचित पश्चात्ताप झाला असेल. पण या सगळ्याचं दु:ख नक्कीच झालं.

सरोज पाटील म्हणाल्या, अजित काय बोलला, श्रीनिवास काही बोलले तर ते राजकारणापुरते आहे. निवडणुका संपल्या की सगळे ढग निघून जातील”, असं विधान यावेळी सरोज पाटील यांनी केलं. या विधानावरून आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.