Maharashtra Political News Today : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा अधांतरी असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याशिवाय राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील इतर बातम्यांवरही आपले लक्ष असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Political News Update : महामुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीचा ताप, एकाच वेळी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने बिकट स्थिती

19:31 (IST) 21 Apr 2023
डोंबिवली: ठाकुर्लीत गटारात पाय घसरुन पडल्याने पादचारी जखमी

डोंबिवली: संध्याकाळच्या वेळेत ठाकुर्ली भागात फिरण्यासाठी गेलेले एक रहिवासी पदपथावरील गटारावर झाकण नसल्याने गटारात पाय घसरुन पडले. बेसावधपणे गटारत पडल्याने या रहिवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

सविस्तर वाचा…

18:43 (IST) 21 Apr 2023
कल्याण मधील वाडेघर येथे गृहप्रकल्पाच्या दारात स्मशानभूमी; रहिवाशांचा विरोध

कल्याण: कल्याण पश्चिमेतील वाडेघर भागातील २५० कुटुंब राहत असलेल्या एका गृह प्रकल्पाच्या शेजारी कल्याण डोंबिवली पालिकेने स्मशानभूमी उभारण्याचे काम हाती घेतल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

18:39 (IST) 21 Apr 2023
नाशिक: अन्न औषध प्रशासनाकडून ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त

उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत असल्याने शीतपेयांसह इतर खाद्यपदार्थांचा मोह नागरिकांना अनावर होतो. बऱ्याच शीतपेयांमध्ये आरोग्यास अपायकारक अशा घटकांचा उपयोग करण्यात येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने शीतपेयांची तपासणी करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

18:13 (IST) 21 Apr 2023
जळगाव: सावद्यात रविवारी पहिली राज्यस्तरीय केळी परिषद

जळगाव: महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघातर्फे रविवारी रावेर तालुक्यातील सावदा येथे पहिली राज्यस्तरीय केळी परिषद आयोजित करण्यात आली असून, यात राज्यभरातील विविध तज्ज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सविस्तर वाचा…

17:56 (IST) 21 Apr 2023
बुलढाणा: आज ‘चाँद’ दिसणार होता, उद्या ईद साजरी केली असती…पण? वेगवान ‘समृध्दी’ने पुन्हा घेतला बळी!

समृद्धी महामार्गावरील अपघातांची दुर्दैवी मालिका संपायची चिन्हे नाहीत. खास ईदसाठी आपल्या अमरावती जिल्ह्यातील मूळ गावी जाण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या कारला आज शुक्रवारी( दि २१) सावरगाव माळ शिवार परिसरात( चॅनल३४६.५) ही अपघात झाला. यात एका इसमाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

सविस्तर वाचा

17:24 (IST) 21 Apr 2023
नागपूर: चित्त्यांचे ‘बारसे’…. नवीन नावे काय दिलीत माहितीये..? ओबान झाला ‘पवन’, सियाया झाली ‘ज्वाला’

नागपूर: नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांना आता नवीन नावे देण्यात आली आहेत. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात असलेल्या मादी चित्ता ‘अशा’ला ‘आशा’, ‘सवाना’ला ‘नभा’, ‘तिबिलिसी’ला धात्री तर ‘सियाया’ला ‘ज्वाला’ असे नाव देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

17:03 (IST) 21 Apr 2023
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना गृहजिल्ह्यात काँग्रेसच्या सुनील केदारांचा धक्का; सावनेर तालुका बाजार समितीच्या सर्व जागा बिनविरोध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांनी धक्का दिला आहे.केदार यांनी जिल्हा परिषद भाजपकडून परत मिळावली होती. जिल्ह्यातील सात तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

सविस्तर वाचा

16:58 (IST) 21 Apr 2023
घरात एकट्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, त्यानंतर बदनामीच्या भीतीने युवकाने…

यवतमाळ : मारेगाव शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा येथीलच एका युवकाने बळजबरी करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.मुलीच्या काकूने हा प्रयत्न हाणून पडल्यानंतर तरूणाने बदनामीच्या धाकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सविस्तर वाचा

16:57 (IST) 21 Apr 2023
मुंबई: वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांचे हाल; तांत्रिक बिघाडाने वातानुकूलित लोकलचे रुपांतर विनावातानुकूलित लोकलमध्ये

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रवासादरम्यान उन्हाच्या झळा बसू नये म्हणून प्रवाशांनी गारेगार प्रवासाठी अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित लोकलचे तिकीट काढले.

सविस्तर वाचा

16:56 (IST) 21 Apr 2023
बुलढाणा: पाणीप्रश्न पेटला! ग्रामस्थ बेहाल, टँकर, विहिरीद्वारे भागविली जातेय तहान

बुलढाणा : मागील पावसाळ्यात धो धो बरसलेला पाऊस, सध्याही अधूनमधून हजेरी लावणारा अवकाळी पाऊस याउपरही जिल्ह्यात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे.कमी अधिक दोन लाख ग्रामस्थांची तहान कृत्रिम उपाय योजनांद्वारे भागविली जात आहे.

सविस्तर वाचा

16:38 (IST) 21 Apr 2023
दुर्घटनेची जबाबदारी अप्पासाहेबांवर ढकलण्याचे राज्य सरकारचे कारस्थान; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुढे करत श्रीसाधकांना निरोप पाठवून स्वत:ची राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. परंतु अप्पासाहेबांनीच सकाळची वेळ दिल्याचे सांगून राज्य सरकारने दुर्घटनेची जबाबदारी त्यांच्यावर ढकलण्याचे कारस्थान सुरू केले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

सविस्तर वाचा..

16:38 (IST) 21 Apr 2023
ठाण्यात अग्निशमन दाखला केवळ हप्ता घेण्यापुरता मर्यादीत; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बांधकामांना अग्निशमन दाखला देण्यात येतो. पण, हा दाखला केवळ हप्ता घेण्यापुरता मर्यादीत राहिला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुकवारी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

सविस्तर वाचा..

16:37 (IST) 21 Apr 2023
ठाणे : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा; भाजपाच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

ठाणे : दिवा येथील शिंदे गटाचे उपशहरप्रमुख ॲड. आदेश भगत यांच्याविरोधात भाजपाचे पदाधिकारी रोहीदास मुंडे आणि ज्योती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर आदेश भगत यांनीही काही दिवसांपूर्वी रोहीदास मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता दिव्यात भाजपा आणि शिंदे गटामधील वाद अधिक वाढत असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा..

16:36 (IST) 21 Apr 2023
नागपूरच्या सभेत काँग्रेसचे शहर अध्यक्ष दूर का होते?

नागपूर : नागपुरात महाविकास आघाडीची सभा यशस्वी झाली तरी सभेचे कवित्व अद्याप सुरूच आहे. सभेत शहर काँग्रेसचा मर्यादित सहभाग आणि शहरात सभा असूनही काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सभेच्या तयारीपासून राखून ठेवलेले अंतर याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सविस्तर वाचा..

16:35 (IST) 21 Apr 2023
ठाण्यात पुन्हा ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी सकाळी ट्रक बंद पडल्याने नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले होते. त्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एक ट्रक बंद पडला. त्यामुळे नितीन कंपनी ते माजीवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या ट्रकला बाजूला करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. वाहतूक कोंडीमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले.

सविस्तर वाचा..

16:34 (IST) 21 Apr 2023
खबरदार..! बालविवाहाला उपस्थित राहाल तर..

अमरावती : बालविवाह रोखण्‍यासाठी आता जिल्‍हा प्रशासनाने कडक पाऊले उचलण्‍यास सुरूवात केली असून बालविवाहास उपस्थित राहणाऱ्या किंवा त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनाही आता काळजी घ्यावी लागणार आहे. कारण कायद्यानुसार अशा विवाहाला उपस्थित राहणारादेखील दोषी असून संबंधित व्यक्तीला दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

सविस्तर वाचा…

16:33 (IST) 21 Apr 2023
पुणे: गुंतवणुकीच्या आमिषाने १६ कोटींची फसवणूक; एपीएस वेल्थ व्हेंन्चर्सच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

पुणे: गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून १६ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एपीएस वेल्थ व्हेंन्चर्सच्या संचालकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा…

16:33 (IST) 21 Apr 2023
वर्धा : हिंगणघाट बाजार समिती निवडणुकीत भाजपाचे आमदार – खासदार आमनेसामने, कुणावर यांची काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी

वर्धा : बाजार समितीच्या निवडणुका गावगड्यात फार जिकरीने लढल्या जातात. अलोट पैसा ओतल्या जातो. वाट्टेल तशी तडजोड होते. हिंगणघाट बाजार समितीच्या निवडणुकीतही असेच दिसून येत आहे. येथील भाजपाचे आमदार समीर कुणावार यांनी पक्षनिष्ठा खुंटीवर टांगून काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी यांच्याशी साटेलोटे केले. पदरात तीन जागा मिळवून उमेदवार उभे केले. हे पाहून संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी स्वतःचे पॅनल उभे करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला.

सविस्तर वाचा..

16:09 (IST) 21 Apr 2023
Maharashtra News Live : राज ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेचा मार्ग अखेर मोकळा, आता ‘या’ मैदानावर होणार सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे मैदान निश्चित करण्यात आले होते. मात्र, संस्थेने परवानगी नाकारल्यानंतर मनसेला दुसरे मैदान शोधावे लागले. त्यामुळे आता मनसे नेत्यांनी रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या मैदानाची पाहणी करत हे मैदान निश्चित केले आहे.

16:05 (IST) 21 Apr 2023
नंदुरबारमध्ये शनिवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; रुग्णालय लोकार्पणासह भरदुपारी शिवकथा सोहळा; एक लाख भाविकांसाठी मंडप

नंदुरबार: राज्यात खारघर दुर्घटनेनंतरचा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम येथे शनिवारी भर दुपारी होणार असून या कार्यक्रमाला एक लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

16:03 (IST) 21 Apr 2023
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांसाठी दुरंगी, तिरंगी लढती; अपक्षांचेही आव्हान

जळगाव – जिल्ह्यातील बाराही बाजार समित्यांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, बहुतेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती होतील. आगामी विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचेही बोलले जात असून, जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली आहे.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 21 Apr 2023
मुंबई: मेट्रो प्रवाशांना दिलासा, आता अंधेरी – बीकेसी प्रवासही सुकर ; गुंदवली – बीकेसीदरम्यान वातानुकूलित बेस्ट बस सुरू

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या मदतीने मोठा दिलासा दिला आहे. बेस्टने नुकतीच गुंदवली मेट्रो स्थानक – वांद्रे-कुर्ला संकुल अशी प्रीमियम वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

15:24 (IST) 21 Apr 2023
पुणे: कोंढव्यातील ‘ती’ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन

पुणे: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या संघटनेने कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले देशविरोधी कृत्यासाठी वापरल्याचा ठपका राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठेवल्यानंतर शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत ही शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. आता ही शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य शाळेत केले जाणार आहे.

सविस्तर वाचा…

15:17 (IST) 21 Apr 2023
कल्याण डोंबिवली पालिकेतील नस्तींचा मानवी हाताळणीचा प्रवास थांबणार? ई ऑफिस प्रणाली गतिमानतेसाठी प्रशासनात हालचाली

कल्याण डोंबिवली पालिकेतील बनावट रस्ते नस्ती घोटाळा उघडकीला आल्यानंतर पालिका प्रशासनाने नस्तींचा हाताने होणारा प्रवास कायमचा थांबविण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

सविस्तर वाचा

15:03 (IST) 21 Apr 2023
डोंबिवलीत रविवारी पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे ‘बुक स्ट्रीट’; एक लाख पुस्तकांची रस्त्यावर मांडणी

डोंबिवली बाजारात येणारी वैविध्यपूर्ण पुस्तके वाचकांना कळावित. जुन्या, नवीन पुस्तकांचा प्रचार, प्रसार व्हावा या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लागावी, या उद्देशातून येथील उपक्रमशील पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे रविवारी बुक स्ट्रीटचे डोंबिवलीतील फडके रस्त्यावर आयोजन केले आहे.

सविस्तर वाचा

15:03 (IST) 21 Apr 2023
भंडारा: प्रशासनाने चक्क राज्य महिला आयोगालाच दिली चुकीची माहिती; आठवडा भरापूर्वीच घडली हुंडाबळीची घटना

भंडारा: जिल्ह्यात हुंडाबळीची एकही घटना नोंद नाही ही अभिमानाची बाब आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या. मात्र, अगदी आठवडाभरा पूर्वीच तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील एका विवाहितेने हुंड्यासाठी दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली

सविस्तर वाचा

15:02 (IST) 21 Apr 2023
कोण संजय राऊत? म्हणणाऱ्या अजित पवार राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

अजित पवार आणि माझ्यात कोणताही वाद नाही. अजित पवार हे फार गोड व्यक्तिमत्व आहे. आम्ही दोन दिवसांपूर्वीच बरोबर जेवलो. त्यामुळे आमच्या कोणतीही कटुता नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच मी कोणत्याही पक्षाच्या अंतर्गत विषयावर बोलत नाही. मी फक्त महाविकास आघाडीशी संबंधित विषयांवरच बोलतो, असेही ते म्हणाले.

15:01 (IST) 21 Apr 2023
कापसाचे मोठ्या बोंडाचे नवीन वाण लवकरच येणार; अकोला कृषी विद्यापीठात संशोधन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कपाशीचे पाच ग्रॅमपर्यंत सरासरी बोंडाचे वजन असणारे नवीन वाण संशोधित केले आहे.बीटी कपाशीचे संकरित बियाणे शेतकऱ्यांंना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाबीजमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

14:04 (IST) 21 Apr 2023
चंद्रपूर: ब्रम्हपुरी येथील सिनेमागृहाला आग, लाखोंचे नुकसान

चंद्रपूर: ब्रम्हपुरी शहरातील अलंकार सिनेमागृह जळून बेचिराख झाले आहे. आगीत सिनेमागृह मधील सर्व साहित्य जळाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सविस्तर वाचा…

13:48 (IST) 21 Apr 2023
वृद्ध मतदारांचे होणार सर्वेक्षण; काय आहेत निवडणूक आयोगाचे निर्देश?

नागपूर : आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली असून मतदार यादी अचूक करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मतदार यादीत नाव असणाऱ्या ८० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या मतदारांची पडताळणी केली जात आहे.

सविस्तर वाचा..

पावसाळय़ापूर्वी महामुंबई खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्राधिकरणांना दिले होते. त्यानंतर या सर्वच प्राधिकरणांनी मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्याचा फटका आता  बसू लागला असून या भागात वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली आहे. महामुंबईत दुपारी अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात सुरू असते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.