Maharashtra Political News Today : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा अधांतरी असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याशिवाय राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील इतर बातम्यांवरही आपले लक्ष असणार आहे.
Maharashtra Political News Update : महामुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीचा ताप, एकाच वेळी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने बिकट स्थिती
पुणे : गोमांसची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग किवळे येथे ही कारवाई करण्यात आली. आठ टन गोमांसासह २७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अलिबाग – महाड येथील सावित्री नदीतील गाळ उपश्याचे काम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात १ लाख ९२ हजार ४०० घनमीटरचा गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरीत गाळ काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. सविस्तर वाचा..
बुलढाणा : खामगाव नजीकच्या घाटपुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावलेल्या शुभेच्छा फलकावर चिखल फेकल्याचे निदर्शनास आले. यामुळे संतप्त अनुयायी रस्त्यावर उतरले असून घाटपुरीसह खामगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपात जाण्याच्या चर्चेवरून खुलासा केल्यानंतरही खासदार संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांच्याबाबत वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न केला.
पुणे : श्री सदस्यांच्या मृत्यूंबाबत सरकार आणि विविध माध्यमे, राजकीय पक्षांकडून तफावत येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही मागणी केली.

यवतमाळ : मे. रिलायन्स रिटेल लिमिटेड कंपनीच्या येथील ‘रिलायन्स मार्ट’ या किराणा व गृहपयोगी वस्तू विक्रीच्या मॉलमध्ये जाळे लागलेले आणि भुंग्यांनी पोखरलेले शेंगदाणे तसेच भुंगे असलेले काबुली चणे ग्राहकांना विकण्यात येत असल्याची गंभीर बाब अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानकपणे केलेल्या तपासणीतून पुढे आली आहे.
ठाणे: येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनीजवळ ट्रक शुक्रवारी पहाटे बंद पडला. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन महामार्गावर दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली. नितीन कंपनीपासून ऐरोलीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेसाठीची तिसरी मेट्रो गाडी लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी थेट आरे कारशेडमध्ये आणण्यात येणार आहे. यापुढील सर्व गाड्या आता आरे कारशेडमध्येच दाखल होणार आहेत.
सविस्तर वाचा…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले. या पॅनलमधील विजयी उमेदवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते.
पुणे: प्रशांत जगताप यांना खासदार होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. पुणे लोकसभेचा उमेदवार घटक पक्ष एकत्र बसून ठरवू. मात्र, नवा चेहरा दिल्यास जनताही त्याला पसंत करते, अशा मोजक्या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रथमत पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत सूचक संदेश शुक्रवारी दिला.
मुंबईः गोवंडी येथे निष्कासन कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला महिलेने मारहाण केली. याप्रकरणी महानगरपालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली.
पुणे: उन्हाच्या वाढत्या झळा आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील घटता पाणीसाठा या पार्श्वभूमीवर शहरात पाणीकपात अटळ आहे. मात्र दिवसाआड पाणीपुरवठा करण्याऐवजी आठवड्यातून एकदा पाणीबंद ठेवण्याची हालचाल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाली आहे.
संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना टोला लगावत त्यांनी सकाळचे अभंग बंद करावे, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. ते मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.
पुणे: बाणेर परिसरातील एका क्लिनिकमध्ये डॉक्टरची नजर चूकवून अमेरिकन डॉलर आणि रोकड असा ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे: कोपरी येथील आनंदनगर भागात शिंदे गट आणि भाजपमध्ये राडा झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भाजपचे पदाधिकारी प्रमोद चव्हाण यांच्याविरोधात ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी: वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने झालेल्या १४ जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना करोना काळातही हलगर्जीपणा झाला होता, असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. दरम्यान, यावरून आता संजय राऊतांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
पिंपरी : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये घेतलेल्या ‘मॉक ड्रिल’नंतर महत्त्वाच्या त्रुटी निदर्शनास आल्याने आठ दिवसांत महापालिका इमारतीचे अग्निशामक लेखा परीक्षण (फायर ऑडिट) करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. तसेच चिंचवडमधील एका मॉलमध्ये घेण्यात आलेल्या ‘मॉक ड्रिल’नंतर काही त्रुटी आढळून आल्या असून, शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीस देण्यात येणार आहेत.
वर्धा : सगळं सुरळीत चालले आहे, असा शासनाचा नेहमी दावा असतो. मात्र, त्यास शिक्षण विभागाने छेद दिला आहे.
चंद्रपूर : राज्यातील ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. २१ फेब्रुवारी २०२३ ते २ मार्च २०२३ दरम्यान शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही. याचे पडसाद थेट राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडले होते. त्यानुसार राज्यसरकारने महासंघ नियामक मंडळ व विजुक्टाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावून महत्त्वाच्या मागण्यांच्या मंजुरीबाबत इतिवृत्त लिहून दिले होते. मात्र आता सरकारने आश्वासनाची पूर्तता न केल्याने शिक्षकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पिंपरी : सांगवी परीसरामध्ये वर्चस्व रहावे यासाठी हवेत गोळीबार करणाऱ्याला साथीदारासह पोलिसांनी अटक केली. सुजल राजेंद्र गिल (वय १८ रा. रा. विनायकनगर, सांगवी), रिहान आरिफ शेख ( वय १९ रा. भाऊनगर, साठफुटी रोड, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे : देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या यंदा जानेवारी ते मार्च या कालावधीत ५१.७० टक्क्याने वाढली आहे. या कालावधीत ३ कोटी ७५ लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. मागील वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान विमान प्रवाशांची संख्या २ कोटी ४७ लाख होती. याचवेळी प्रवाशांच्या तक्रारीत चालू वर्षी मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
सविस्तर वाचा…
गडचिरोली : केंद्रवर्ती अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांना व्यवसायासाठी दुभत्या, दुधाळ गायी घेण्याकरिता थेट लाभ हस्तांतरण ( डीबीटी) माध्यमातून देण्यात आलेल्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचे ‘लोकसत्ता’ने उघड करताच अधिकारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. घोटाळा लपविण्यासाठी ‘मोठ्या’ साहेबांचा आदेश येताच कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
नागपूर : नक्षलग्रस्त गडचिरोलीत एकीकडे प्राणांतिक अपघात ६७ टक्क्यांनी वाढले असतानाच येथे ‘आरटीओ’च्या वायूवेग पथकाला रस्त्यांवर गस्त घालण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे परिवहन खात्याने येथे एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीद्वारे (आयटीएमएस) वाहतूक नियंत्रणाचा निर्णय घेत तसा प्रस्ताव शासनाला दिला आहे.
पुणे : गुंतवणुकीवर चांगल्या प्रकारचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका इंटिरियर डिझाईन व्यवसायिक तरुणाची तब्बल ८१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
पुणे : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अन्य मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीने शिकवण्याबाबत घेतलेला निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने फिरवला आहे.
देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी खारघरमधील घटनेचं सत्य सांगाव. ज्या लाईट अॅंण्ड शेड्स या कंपनीला या कार्यक्रमाचं कंत्राट देण्यात आलं होतं. ती कंपनी कोणाही आहे? या कंपनीतील भागीदार कोण आहेत हे फडणवीसांनी सांगावं, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं.
पिंपरी : किवळे येथील बेकायदा लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा फलक काढण्यास सुरुवात केली खरी, पण ही कारवाई अतिशय संथ गतीने सुरू आहे.
राजकारणातील कटुता संपवायची असेल तर सकाळचा अभंग बंद करायला हवा, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी काल संजय राऊतांना लगावला होता. त्यालाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. “आमच्या अभंगात फडणवीसांनी सहभागी व्हावं. आमचा अभंग हा अन्यायाविरोधात. खरं तर त्यांनी अभंगाची चेष्टा करू नये. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर अभंगाला उत्तर द्या”, असे ते म्हणाले.
पावसाळय़ापूर्वी महामुंबई खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्राधिकरणांना दिले होते. त्यानंतर या सर्वच प्राधिकरणांनी मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्याचा फटका आता बसू लागला असून या भागात वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली आहे. महामुंबईत दुपारी अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात सुरू असते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.