Maharashtra Political News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेनंतर सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट (शिवसेना) आक्रमक झाला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रत्येकाला उत्तरं देत आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Update : महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या
ठाणे: संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले असून या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात ‘ठाणे ईट राईट मिलेट मेळावा आणि वाॅकथाॅन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरूर : पुण्यातील काम सोडून गावाकडील शेती आणि जनावरे सांभाळण्याचे काम करावे लागणार असल्याच्या रागातून एकाने आपला सावत्र भाऊ आणि भावजयीवर चाकूहल्ला करीत डोक्यात लोखंडी डंबेल्स घातल्याने भावजय जागीच ठार झाली; तर भाऊ गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळून जाणारा हल्लेखोरही मोटारीला धडकून मरण पावला. आंबळे (ता. शिरूर) येथे आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हा थरार घडला.
वर्धा : विविध कारणांनी नेहमी वादात राहणाऱ्या येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात सध्या तणाव आहे. विद्यापीठ परिसरातील कबीर टेकडी भागात संत तुकाराम महाराज यांचा पुतळा आहे. त्याची विटंबना झाल्याचे उघडकीस आलं आहे.
ठाणे : हाती घेतलेली रस्त्यांची कामे विनाविलंब तसेच गुणवत्ता पूर्ण करावीत, या कामांवर कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः लक्ष ठेवावे असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
कल्याण – येथील मुरबाड रस्त्यावरील स्टेट बँकेत एका भामट्याने एका मुलीला बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील दीड लाख लाख रुपये घेऊन बँकेतून पळ काढला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
बुलढाणा : जळगाव जिल्ह्यातील जामनेर ते बुलढाणा (एमएच ४० एन ९९४७ ) ही बस आज दुपारी बुलढाण्यात सुखरूप पोहोचली. जयस्तंभ, संगम चौक पार करून आता बुलढाणा बस आगारात शिरणार तोच बस प्रवेशद्वारातच अडकली. गाडी गरम झाल्याने मध्येच अडकल्याचे वाहक व चालकाने सांगितले.
डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रामनगर तिकीट खिडकी, डाॅ. राॅथ रस्ता रेल्वे जिन्याजवळ पहाटेपासून अनेक रिक्षा चालक वाहनतळ सोडून प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा उभ्या करतात. या बेकायदा वाहनतळामुळे प्रवाशांना या भागातून येजा करणे अवघड होते.
ठाणे : शहरात उभारण्यात येणारे बेकायदा जाहिरात फलक, पोस्टर्स आणि कमानीविरोधात तक्रारी नोंदविण्यासाठी सुरू केलेला मदत कक्ष दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करून हा क्रमांक सुरू केला आहे. यामुळे नागरिकांना तक्रार करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध झाली आहे.
डोंबिवली – डोंबिवली, २७ गाव परिसरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी सराईत २४ गुंडांना अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्याने कारवाई केली आहे. याशिवाय नऊ संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडून काढण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे.
नागपूर : जिल्ह्यात बुटीबोरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे भावी मुख्यमंत्री, असे फलक लावण्यात आल्यामुळे आता शहर व जिल्ह्यामध्ये राजकीय वतुर्ळात या फलकाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
अमरावती : प्रेयसीची आक्षेपार्ह छायाचित्रे तिच्या नियोजित वराला पाठवून एका युवकाने तिचे जुळलेले लग्न मोडले. हा धक्कादायक प्रकार माहुली जहांगिर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय रवी मोहिते (२४, रा. वाघोली) याच्याविरुद्ध विनयभंग, सामाजिक बदनामी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
नांदेड – जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुखेड व लोहा तालुक्याला मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा व गारपिटीचा तडाखा बसला. यामध्ये केळी, हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या विजयाची नोंद सत्तारूढ गटाने केली आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून विजय मिळवला आहे. त्यांनी विरोधी गटाचे नेते सतेज पाटील यांच्या समर्थकाचा ३९ मताच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. उत्पादक गटातील मतमोजणीमध्ये महाडिक गटाचे उमेदवार उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेतले आहे.
कल्याण – ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या चार तालुक्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ६५ जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्याच्या सत्तेत आणि विरोधात असणारे पक्ष वरच्या पातळीवर एकजीव असले तरी बाजार समिती निवडणुकीत युती, आघाडींमध्ये बिघाडी आणि बंडखोरी झाल्याचे चित्र आहे.
कल्याण – ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास पथकाने डोंबिवलीतील ६५ महारेरा घोटाळ्यातील इमारतीमधील सदनिकांची दस्त नोंदणी करू नये, असे पत्र नोंदणी उपमहानिरीक्षकांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन करून कल्याण पश्चिमेतील सह दुय्यम निबंधक-२ यांनी या इमारत घोटाळ्यातील सदनिकांची नियमबाह्य दस्त नोंदणी केल्याचे प्रकरण उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर: लक्ष्मीचे वाहन म्हणून घुबड या पक्ष्याची ओळख असली तरीही रात्रीचा राजा म्हणून तो पक्षी अभ्यासकांना जास्त परिचित आहे. त्याच्याबद्दल जे काही समज-गैरसमज समाजात आहेत ते आहेतच, पण पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार यात न पडता त्याची प्रतिमा कशी चांगली येईल, यादृष्टीनेच त्याला कॅमेऱ्यात कैद करतात.
तुमसर : शहरातील गोवर्धन नगर येथील साई कॉलोनीत भर रात्रीच्या दरम्यान रानडुकराचा कळप लोक वस्तीत शिरून एका महिलेवर हल्ला केला, तसेच दुचाकीला धडक दिली. मात्र, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.
बुलढाणा: ‘सुजलाम सुफलाम’ मोहिमेच्या माध्यमाने बुलढाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळमुक्त करण्याचे मोठे काम भारतीय जैन संघटनेने केले. शिक्षणाच्या संदर्भातही ‘बिजेएस’ ने भरीव काम केले आहे.
जळगाव – पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेर साहित्यनगरीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यास अखिल भारतीय साहित्य मंडळाने मान्यता दिली. संमेलनासाठी आतापासूनच तयारी सुरू केली असून, संमेलनासाठी प्रताप महाविद्यालयाचे स्थळ निश्चित झाले आहे. भोजनव्यवस्थेत पंचपक्वान्न न ठेवता खानदेशी अन्नपदार्थ असेल, अशी माहिती मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.
यवतमाळ : कुठल्याही प्रसंगाचे छायाचित्र समाज माध्यमांवर अपलोड करण्याची स्पर्धा हल्ली तरुणाईमध्ये दिसते. मात्र यवतमाळातील एका विद्यार्थिनीस तिचे समाजमाध्यमावरील छायाचित्रच मनस्ताप देणारे ठरले. पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने या विद्यार्थिनीचे छायाचित्र वापरून इंस्टाग्राम, फेसबुकवर आठ बनावट खाती उघडली. ही बाब विद्यार्थिनीच्या एका मित्राच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.
धुळे – सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी भर उन्हात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रभारी अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालण्यात आला.
अमरावती : बडनेरा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार रवी राणा यांनी केल्याबद्दल भाजपाच्याच माजी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, मंगळवारी भाजपाचे महापालिकेतील माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांनी लावलेल्या फलकांना काळे फासले आणि फलकांची मोडतोड केली.
वर्धा : सामान्यांच्या प्रश्नावर अत्यंत आक्रमक राहणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक मंगेश विधळे (५१) यांचा आज सकाळी नऊ वाजता झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
जळगाव – रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळा बाजार करणार्यांवर रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या पथकाने कारवाई करीत एकाला ताब्यात घेतले असून, तो ई-आरक्षण रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना मिळून आला. त्याच्याकडून एकूण १७ हजार ३६७ रुपयांची नऊ तिकिटे जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील करंजी येथे दोन तोतया पोलिसांनी साडेतीन हजार रुपयांनी तर पोहणा (ता. हिंगणघाट) मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तिघांनी युवकाचे १५ हजार रुपये लुटल्याची घटना घडली. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या या तोतया पोलिसांच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या. वडकी पोलिसांनी ही कारवाई वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व वडनेर येथे केली.
बुलढाणा : पुतण्या घरासमोर रडताना दिसला. त्याला विचारणा केल्यावर त्याने घराच्या दिशेने बोट दाखविले. त्यामुळे घरात जाऊन पाहिले असता फासाला लटकलेला भावाचा मृतदेहच दिसला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे हा दुदैवी घटनाक्रम घडला. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी अलीकडील व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन प्रक्रियेत देशात १४ वा क्रमांक मिळाला आहे. असे असताना हे राष्ट्रीय उद्यान सध्या व्हेरी गुड कॅटेगरीत आले आहे, तर या अभयारण्याला उत्कृष्ट श्रेणी मिळण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. महाराष्ट्रातील पेंच वन्यजीव प्रकल्प ८ व्या क्रमांकावर आहे.
राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचा विरोध नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईमधील ठिकठिकाणच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी कंत्राटदारांना कार्यादेश देऊन तीन महिने लोटल्यानंतरही कामांना सुरुवात झालेली नाही. यासंदर्भात माजी नगरसेवकांनी प्रशासनाला पत्र पाठवून पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकारण तापू लागले आहे.
नाशिक: बड्या आणि प्रभावशाली थकबाकीदारांकडील वसुलीत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून परस्पर दिले जाणारे निर्देश आणि सूचना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोहिमेत अवरोध ठरत आहेत.
बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे, त्याला अनेक स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. गावकरी याविरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलक गावकरी रिफायनरी प्रकल्प आणि सरकारविरोधात ते घोषणा देत आहेत. बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीनेच हे विरोधक माळरानावर दाखल झाले आहेत, कारण हे गावकरी जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन आले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारसूतल्या लोकांना विश्वासात घेतल्यास विरोध दूर होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.