Maharashtra Political News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेनंतर सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट (शिवसेना) आक्रमक झाला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रत्येकाला उत्तरं देत आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Maharashtra Update : महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या
मुंबई: मुंबईतील हवेतील वाढते प्रदुषण, धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केल्यानंतर महिन्याभराने त्याच्या अंमलबजावणीसाठी मुहूर्त सापडला आहे.
महापालिका निवडणुकीवेळी मंत्री गिरीश महाजन यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची पूर्तता न होता उलट महापालिका मात्र रहिवाशांकडून वर्षभराचा पाणी कर वसूल करत आहे. पाण्याची समस्या मांडण्यासाठी भ्रमणध्वनी केल्यावर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून री उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
पुणे: वर्धा जिल्ह्यातील येसंबा गावाजवळच्या पठारावर पुरातत्त्वीय लोहयुगीन काळातील ७१ महापाषाणीय शीलावर्तुळे उजेडात आली आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये पीएच.डी. करत असलेल्या ओशिन बंब या संशोधक विद्यार्थ्याने हे संशोधन केले असून, ही शीलावर्तुळे अंदाजे अडीच हजार वर्षांपूर्वीची आहेत.
मुंबई: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू लागले आहे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा होणार आहे. याच परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांत आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता.
सात वर्षांच्या कालखंडानंतर होणाऱ्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यात चांगलीच उडालेली आहे. नगर जिल्ह्यात सहकारातील निवडणुका राजकीय पक्षांपेक्षा जिरवाजीवीचा राजकारणातून गटातटाची समीकरणे जुळवत लढवल्या जातात.
आर्थिक घोटाळ्यातील २० झोपडपट्टी पुनर्वसन योजनांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेला स्थगिती आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्र सरकारला विनंती केली होती. त्यानंतर हा स्थगिती आदेश मागे घेत असल्याचे पत्र संचालनालयाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला पाठविले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात खासगी बस उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याची समजते. ही घटना काल रात्री (२४ एप्रिल) रोजी रात्री ९ वाजता घडली.
वर्धा: उमेद असणारे खेळाडू खूप, पण सोयीचा अभाव असल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरले जाते. महानगरात जाण्यासाठी पैसे नसल्याने अनेकांना आयुष्याचे ध्येय गाठता येत नाही. ही उणीव दूर करण्याचा चंग महिला विकास संस्थेने बांधला आहे.
बेळगावसह सीमालढ्याला पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेनेच्या भूमिकेमुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने खानापूर मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसने निपाणी मतदारसंघात उमेदवारी दिली आहे.
राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी अलीकडील व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन प्रक्रियेत देशात १४ वा क्रमांक मिळाला आहे. असे असताना हे राष्ट्रीय उद्यान सध्या व्हेरी गुड कॅटेगरीत आले आहे, तर या अभयारण्याला उत्कृष्ट श्रेणी मिळण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. महाराष्ट्रातील पेंच वन्यजीव प्रकल्प ८ व्या क्रमांकावर आहे.
कल्याण – कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघण्यासाठी फेरीवाला हटाव पथकातील अनेक कामगारांच्या आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी बदल्या केल्या. बदल्या करूनही काही कामगार फेरीवाल्यांना हटविण्यापेक्षा आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांची पाठराखण करत आहेत. या प्रकारामुळे कल्याण पश्चिमेतील क प्रभाग, डोंबिवली पूर्व भागातील फ प्रभागातील फेरीवाल्यांचा प्रश्न कायम आहे.
नागपूर : एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. विरोध केला असता तिला मारहाण करून धमकावले. या प्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय पीडित महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवित आरोपी व्यवस्थापकाला अटक केली. राकेश रमेश चिमनकर (४२) रा. हरिओम सोसायटी, दत्तवाडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नागपूर : जामठा येथील राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटचा (एनसीआय) लोकार्पण समारंभ २७ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एकाच मंचावर असतील.
नागपूर : शिक्षण घेताना झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि प्रेमात झाले. वर्षभराच्या प्रेमसंबंधानंतर दोघांनीही प्रेमविवाह केला. तरुणीच्या आईला प्रेमविवाह मान्य नसल्यामुळे त्यांच्या संसाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरोसा सेलने पती-पत्नीचे समुपदेशन करून ताटातूट झालेला संसार पुन्हा रुळावर आणला. दोघेही एकाच दुचाकीवरून घराकडे निघाले, तर सासू रिकाम्या हाती पुण्यात परतली.
वर्धा : सकाळी आठ वाजेपासून वर्धा शहरात आज स्फोटकांच्या आवाजाने नागरिक चकित झाले. जवळपास एक तास हा गगनभेदी आवाज ठराविक आवाजाने गुंजत होता. भयभीत नागरिक चौकशी करू लागले. माहिती मिळाल्यावर मात्र सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पातील पेंच नदीच्या पात्रात मगर आणि कासवांच्या घनता आणि निवासस्थानाच्या वापराचा अभ्यास करण्यात येत आहे. नागरी विज्ञान उपक्रमाचा वापर करून करण्यात येणारे हे भारतातील पहिलेच निरीक्षण सर्वेक्षण आहे.
चंद्रपूर : प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मूलमध्ये घडली. गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे ( ४५) आहे. मुल शहरातील वार्ड क्र. ११ मध्ये तो वास्तव्याला होता.
चंद्रपूर : शहरात परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास कारवाई होणार असून विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच १ लाख दंड ठोठावण्यात येणार आहे. वृक्ष आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
पुणे: पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या केंद्रीय कृषी-हवामानशास्त्रीय वेधशाळेचे नूतनीकण करण्यात आले आहे. देशातील सर्वात जुन्या वेधशाळांपैकी ही एक वेधशाळा आहे.
ससून रुग्णालयाच्या आवारातून दुुचाकी लांबविणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सतीश मारुती गंगावणे (वय ३३, रा. पिंपरी गुरव, ता. कर्जत जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
भाजप ते काँग्रेस असा राजकीय प्रवास असलेल्या देशमुखांवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यावर त्यांचा पुढचा पक्ष कोणता याबाबत उत्सूकता होती. या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यावर ते राष्ट्रवादीत जातील व या पक्षाकडून हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरू झाली.
नागपूर: सायबर गुन्हेगारांचे जाळे राज्यभर पसरत असून आता त्यांचे लक्ष्य सुशिक्षत बेरोजगार युवक ठरत आहेत. अनेकदा सायबर फसवणुकीची माहिती नसणारे व्यक्ती सायबर गुन्हेगारांचे बळी ठरत होते.
“मी स्वत: सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जातोय. काल माझं शरद पवारांशी तर आज सकाळी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालंय. आम्ही ठरवलंय की एकजुटीनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करायचा. यावेळी बोलताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलं. “माझं आव्हान आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. ते म्हणतायत ना की त्यांनी बेळगावच्या आंदोलनात भाग घेतला, तुरुंगात गेले. ही वेळ आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकीकरण समितीच्या प्रचारासाठी बेळगावात यावं.
वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आणि महिलांचा अपमान करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना आणि भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार केल्याचंही राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
संजय राऊतांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. “मी CBI कडे यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली आहे. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ही तक्रार मी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता मी सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघुयात पुढे काय होतंय”, असं संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे, त्याला अनेक स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. गावकरी याविरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलक गावकरी रिफायनरी प्रकल्प आणि सरकारविरोधात ते घोषणा देत आहेत. बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीनेच हे विरोधक माळरानावर दाखल झाले आहेत, कारण हे गावकरी जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन आले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारसूतल्या लोकांना विश्वासात घेतल्यास विरोध दूर होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.