Article Body Starting: Maharashtra politics rain update, 09 July 2022 : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदेगट आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी या गोष्टींमुळे अजूनही सरकार स्थिरस्थावर झालेलं नाही. दुसरीकडे राज्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली असताना काही भागात नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पुढचे ३ दिवस राज्यात काही भागात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Latest News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णालेक भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागलं आहे. यामुळे महाबळेश्वर पाचगणीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
मागील काही दिवसांपासून महाबळेश्वरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे महाबळेश्वर-पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव तुडूंब भरला आहे. सविस्तर बातमी
अमरनाथ येथे शुक्रवारी झालेल्या ढगफुटीमध्ये पुण्यातील दोघा यात्रेकरूंचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. प्रदीप नाथा खराडे (रा.पिंपरी), सुनीता महेश भोसले (रा.वडगाव बु.) अशी दोघांची नावे आहेत. यातील खराडे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर येथील कपिल और धीरज वाधवान यांच्या बंगल्यावर छापा टाकला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. येस बँकेची हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे. आज दुपारी सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान यांच्या बांगल्यावर छापा टाकला. सविस्तर बातमी
अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा सुरूच असून, कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्रासह आता विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागांत पावसाने जोर धरला आहे. आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस आणखी आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात मुक्कामी राहणार असल्याचा अंदाज आहे. शनिवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील हिंगोलीत ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात काही भागांत आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाट विभागांमध्ये दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मागील दोन-तीन दिवसांपूर्वी निघालेल्या ‘पुनर्वसु’ नक्षत्राने रौद्र रूप दाखवत नांदेड जिल्ह्याला पावसाने शुक्रवारी रात्रीपासूनच झोडपायला सुरूवात केली असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. शेजारील हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा फटकाही नांदेडला बसला असून आसना नदीने रौद्र रूप धारण केल्याने नांदेड-मालेगाव-वसमत महामार्गावरील वाहतूक बंद पडली. जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. वाचा सविस्तर बातमी…
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आता बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी देखील राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांमुळे गुंता वाढला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमी
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या नऊ दिवसांपासून कोसळणारा दमदार पाऊस शनिवारी देखील कायम होता. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये तब्बल १.२४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ६.९५ टीएमसी म्हणजेच २३.८३ टक्क्यांवर पोहोचला. पुढील पाच दिवस धरणक्षेत्रांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे धरणांमध्ये जुलैअखेरपर्यंत समाधानकारक पाणीसाठा जमा होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर बातमी…
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने धमकावण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना धमकीचा ई-मेल पाठवून मजकुरात राज्य घटनेचा अवमान केल्याचे उघडकीस आले आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत १९६ शिक्षण संस्थांमधील जागांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना स्व प्रमाणपत्र नव्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांचा या पदभरतीसाठी विचार केला जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यांतील १२ नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ नगर परिषदा आणि दोन नगर पंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध योजनेतील ५०६८ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. १८ ऑगस्ट रोजी सोडत जाहीर होणार आहे. वाचा सविस्तर बातमी…
नागपूर शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर खातमारी पांजरी (लोधी) येथे गेल्या चार दिवसांपासून वाघीण आणि तिचा बछडा फिरत आहे. या परिसरात तिने निलगायीची शिकार केली असून गावाच्या परिसरातच ते फिरत असल्याने गावकरी घाबरले आहेत. सायंकाळनंतर घराबाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. वाचा सविस्तर बातमी…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा अभंगांचा समावेश असलेली शके १६५३ मधील दुर्मीळ वही मराठी हस्तलिखित केंद्राकडे आली आहे. या वहीमध्ये संत तुकाराम यांचे अभंग तर आहेतच. पण, त्याचबरोबरीने संत नामदेव यांचे अभंगही यामध्ये समाविष्ट आहेत. संत जगनाडे महाराज आणि बाळा जगनाडे या पिता-पुत्राच्या हस्ताक्षरामध्ये या अभंगांचे लेखन हे या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य आहे. वाचा सविस्तर बातमी…
भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या विरोधाचा आधार घेत त्यांनी हा टोला लगावला आहे. सविस्तर बातमी
पालघरमधील तलासरी तालुक्यातील झाई शासकीय आश्रमशाळेतील चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या सारिका भरत निमला (9) या विद्यार्थिनीचा आज(शनिवार) मृत्यू झाला. वाचा सविस्तर बातमी…
मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथील वसाहतीत २०१९ मध्ये संरक्षक भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला तीन वर्षे झाली, तरी तेथील सर्व रहिवाशांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. एकूण १५५ झोपडीधारकांपैकी ७३ झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. वनखात्याच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसन रखडल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून रहिवासी येथे राहत आहेत. वाचा सविस्तर बातमी…
शाळकरी मुलीने चौदाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागातील उच्चभ्रू सोसायटीत घडली. अवंतिका कुलशेखर (वय १७, रा. अमानोरा पार्क, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. वाचा सविस्तर बातमी…
मागील तीन दिवस ठाण्यात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वच ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकुन पडावे लागत आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, ठाण्याला मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असा संताप मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे असुन यावेळी तरी विचार करून निर्णय घ्या,असे असेही त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर बातमी…
मागील काही दिवसांपूर्वी राज्यात मोठे सत्तानाट्य रंगले. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वाचा सविस्तर
अकोला शहरातील गोरक्षण मार्ग भागात राहणाऱ्या आणि स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगणाऱ्या ‘नटवरलाल’ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने शेती खरेदीच्या बदल्यात पैशांऐवजी कागदाने भरलेली बॅग देऊन पुण्यात राहणाऱ्या महिलेची १२.२० लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही शिवसेना खासदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केल्यानंतर या भेटीच्या चर्चेमुळे शिवसेनेत पुन्हा फूट पडणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात असताना शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांनी मात्र यावर वेगळी भूमिका मांडली आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात आज(शनिवार) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या कर्नाटकातील ऐतिहासिक विजापूरजवळ असल्याची माहिती समोर आली. विजापूर परिसरात झालेला भूकंप ४.६ रिश्टर स्केलपर्यंत नोंदविण्यात आला. जिल्हा प्रशासनाने या घटनेस दुजोरा दिला आहे. वाचा सविस्तर बातमी…
ठाण्यातील कळवा येथील कारगिल डोंगरावर असणाऱ्या विहिरीत बुडून एका १७ वर्षीय मुलाचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कळवा पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी त्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. विहिरीच्या खोलीचा आणि पाण्याचा अंदाज आला नसल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव सुमित माळी असून तो नवी मुंबई येथील रहिवासी आहे. वाचा सविस्तर बातमी…
जवाहिऱ्यांच्या पेढ्यांसमोर बसून सोन्याचे दागिने वितळविण्याचा व्यवसाय करणाऱ्या मुंबईतील एका तरुणाला व्यवसायात तोटा झाला. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी या तरुणाने डोंबिवली परिसरात येऊन घरफोड्या करून सोने आणि त्या सोबत मिळणारा किमती ऐवज चोरण्याचा धंदा गेल्या काही दिवसांपासून सुरू केला होता. मानपाडा पोलिसांनी मुंबईतील कामाठीपुरा भागातून या तरुणाला अटक केली. वाचा सविस्तर बातमी…
सिग्नल, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती यांसह विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी १० जुलैला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा-मलुंड दोन्ही धीम्या मार्गावर आणि हार्बरवर पनवेल-वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवरही ब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांना विलंब होईल. हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून फक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी मेगाब्लॉक नाही. वाचा सविस्तर बातमी…
शिवसेना पक्ष आता संपला आहे. बाकीचे आमदारदेखील बंड करतील, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांच्या याच दाव्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्याचं रक्त भगवं आहे, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. वाचा सविस्तर
राज्यसभेच्या नवनिर्वाचित २७ सदस्यांचा काल शपथविधी पार पडला. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या खासदारांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ सभागृहात नियमित राहावे, सभागृहात तयारी करुन यावे तसेच शब्द जपून वापरावेत, असा सल्ला मोदी यांनी या खासदारांना दिला. राज्यसभेत निवड झालेल्या खासदारांपैकी नीर्मला सीतारामन, पीयुष गोयल अशा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले असताना शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामनामधून शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना टोला लगावतानाच बंडखोर आमदारांच्या शिंदे गटावर देखील तोंडसुख घेतलं आहे.
नागपूर येथील बुटीबोरीतील वेणा नदीच्या पुलाखाली एक महिला व एका पुरुषाचा मृतदेह गुरुवारी आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास केला असता कौटुंबिक बदनामीच्या रागातून सख्ख्या भावांनीच इतर दोघांच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघडकीस आले. वाचा सविस्तर बातमी…
पुणे शहरात मागील चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्याच दरम्यान आज(शनिवार) सकाळी शुक्रवार पेठेतील ८० वर्ष जुना वाडयाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत अडकलेल्या सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. वाचा सविस्तर बातमी…