Article Body Starting: Maharashtra politics rain update, 09 July 2022 : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदेगट आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी या गोष्टींमुळे अजूनही सरकार स्थिरस्थावर झालेलं नाही. दुसरीकडे राज्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली असताना काही भागात नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पुढचे ३ दिवस राज्यात काही भागात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Latest News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
जमीन खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या दलालाचा खून करण्यासाठी सराईतांना ३० लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. जमीन दाखविण्याच्या बहाण्याने दलालाला मुळशीत नेऊन त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून सराईतांनी ६० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाराष्ट्रातील सरकारमधून बाहेर पडली आहे. पण आता ठाकरे कुटुंबीयांनी पक्ष वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारपासून निष्ठा यात्रा सुरु केली आहे. भायखळ्यातील बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी या यात्रेची सुरुवात केली. यावरुनच आता मनसेने आदित्य ठाकरेना टोला लगावला आहे. वाचा सविस्तर…
आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामधून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे#adityathakre #Shivsena https://t.co/1zSkBkoJcx
— LoksattaLive (@LoksattaLive) July 9, 2022
राज्यात शिंदे गट आणि भाजपा (BJP) यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले आहे. सध्या या सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे<u> यांनी स्वीकारले असून ते मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कारभार हाकत आहेत. दरम्यान, सत्ताबदल आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे बंड करणार आहेत, याबाबत कल्पना होती का? असे विचारताच हो मी ज्योतिषी आहे, असे मिश्किल भाष्य राणे यांनी केले आहे. वाचा सविस्तर
संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. त्यांनी कोणतातरी गुन्हा केला असेल, असे राणे म्हणाले आहेत. वाचा सविस्तर
सातारा-ठोसेघर रस्त्यावर सज्जनगड जवळ दरड कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. वाचा सविस्तर बातमी…
पूर्व विदर्भात करोनाचे संक्रमण वाढत असतानाच गेल्या सात दिवसांत डेंग्यूचे ३४ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील आहेत, हे विशेष. वाचा सविस्तर बातमी…
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला दमदार पाऊस कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठा २१ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाचा सविस्तर बातमी…
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज टीव्ही ९ शी बोलताना बंडखोर आमदारांच्या आमदारकीवरून खोचक टोला लगावला आहे. तसंच, त्यांना जाहीर आव्हान देखील दिलं आहे.
राज्यात पुढील ३ दिवस (११ जुलै पर्यंत) हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.