Maharashtra Political Crisis Today, 10 July: महाराष्ट्रातल्या राजकारणात २ जुलैपासून उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड करुन शरद पवारांविरोधातच दंड थोपटले आहेत. तर शरद पवार यांनी कुणावरही टीका करणार नाही, नव्या जोमाने पक्ष बांधणी करणार असं म्हणत पुन्हा एकदा मैदानात उतरुन तयारी सुरु आहे. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे की काँग्रेस पक्षही लवकच फुटणार आहे. तर संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत जी परिस्थिती आत्ता निर्माण झाली ती भाजपामुळेच झाली आहे. त्यांनी २०१९ ला वचन पाळलं नाही त्याचा हा परिणाम आहे असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे यवतमाळच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी पोहरा देवीची शपथ घेऊन हे सांगितलं आहे की अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद असंच ठरलं होतं. त्याचाही उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. तसंच भाजपा हा बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे असं म्हटलं आहे. पावसाने काही प्रमाणात राज्यातून ब्रेक घेतला आहे. तर इतरही महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडत आहेत. या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra Updates : ठाकरे परिवाराला सत्तेची भूक नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी
ठाणे: जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे महापालिका चषक २०२३’ या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आठ दिवसापूर्वी शिंदे फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच दरम्यान पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाडयातील महात्मा जोतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्यास अजित पवार यांचे गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या सह आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक: लग्नाचे नाटक करुन ३१ वर्षाच्या युवकाची चार संशयितांनी फसवणूक केली. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात. पण त्याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधीमंडळाचा आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही.
मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – भायखळ्यादरम्यान अप जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत सोमवारी दुपारी ४.३० वाजता बिघाड झाला. त्यामुळे साएसएमटी – भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
पुणे: पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ आणि इतिहास संशोधक डॉ. विवेक देबरॉय यांना भांडारकर प्राच्यविद्या संशाेधन संस्थेच्या वतीने यंदाचा सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्या दरम्यान आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राणा दाम्पत्याने गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले होते, पण पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र, कार्यकर्त्यांनी नजीकच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण केले.
रेल्वे स्थानकातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पुलांच्या कामांसाठी मंजुर असलेला निधी गेल्या दोन वर्षांपासून पालिकेने रेल्वे विभागाला दिला नाही. यामुळे पुलाचे काम रखडल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत असून याच मुद्द्यावरून खासदार राजन विचारे यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.
शहरातील बहुतांश वृक्ष काँक्रीटमुक्त आहेत तर, उर्वरित काँक्रीटच्या फासात अडकलेल्या वृक्षांचे परिक्षण करण्यात येत असल्याचा दावा उच्च न्यायालयात करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी पोलखोल केली आहे.
ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली असून त्याची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीने बैठक घेतली. ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजविण्याचे नियोजन करा, अशा सुचना त्यांनी प्राधिकरणांना दिल्या आहेत.
पावसाळी वातावरण आणि येथील धावपट्टीवर पाणी साचल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान धुळ्याऐवजी जळगाव येथील विमानतळावर उतरवून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाहनातून धुळ्याकडे निघणे भाग पडले.
वाशीम : उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकात नवं चैतन्य संचारले असून आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांच्या विरोधात कुणाच्या नावावर शिक्का मोर्तब होणार हे मात्र, अजूनही कोडेच आहे.
नागपूर: शहरात ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावावर ‘ऑनलाईन सेक्स रॅकेट’ चालवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अनेक संकेतस्थळांवर तरुणींचे छायाचित्र ‘अपलोड’ करून खुलेआम देहव्यापार सुरू आहे.
भंडारा : सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आणि मध्य प्रदेशातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून पातळी नियंत्रित करण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे २५ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहेत. यातून २८३८ क्यूमॅक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक धरण परिसरात गर्दी करीत आहेत. प्रशासनाने धरणावरील भागात असलेल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
अकोला : महाराष्ट्रातील सत्ताकारणात सातत्याने राजकीय भूकंपाचे धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फाटाफूट झाली. त्याचे परिणाम जिल्ह्यात उमटले. जिल्हा राष्ट्रवादीत शहर व ग्रामीण असे दोन गट पडले आहेत. दोन गटांतील विभागणीमुळे पक्ष अधिक कमकुवत झाल्याचे चित्र असून निवडणुकांच्या तोंडावर अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाट अधिक बिकट झाली आहे.
नागपूर : सध्या शाळा सुरू झाल्या असून जवळपास ६५ टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी स्कूलबस, स्कूलव्हॅन किंवा ऑटोने शाळेत जातात. सुसाट धावणाऱ्या या वाहनांमुळे मुलांचे जीव धोक्यात आले आहे.
कल्याण: मुसळधार पावसामुळे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, असा गैरसमज करुन पिसवली भागात सरकारी जमिनीवर बेकायदा चाळी उभारणाऱ्या भूमाफियांची नव्याने उभी राहत असलेली बांधकामे आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी जमीनदोस्त केली.
नागपूर : जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यावरही ७६२ स्कूलबस, स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी झाली नसल्याचे जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पुढे आले होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारपासून या नियमबाह्य वाहनांवर कारवाई सुरू झाली. पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत १८ वाहने जप्त केली गेली.
शासन आपल्या दारी उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन करणारे आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. जनतेच्या प्रश्नासाठी होणाऱ्या आंदोलनाची धास्ती घेत मध्यरात्रीपासूनच पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या दडपशाहीला शरण जात आपणास ताब्यात घेतल्याचा आरोप लोंढे यांनी केला.
प्रचंड महागाई वाढविणाऱ्या भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करुन सोमवारी धुळे जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डयांमध्ये माती, खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये चिखल होऊन वाहनांचा वर्दळीमुळे खडी रस्त्यावर येत आहे.
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर गोळवली गावाजवळील प्रवेशव्दारासमोर मुख्य वर्दळीच्या काँक्रीटच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामधील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. या सळ्या वाहनांच्या टायरला अडकून मोठा अपघात होण्याची भीती या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या प्राध्यापकांच्या किरकोळ रजा जुन्या कायद्याप्रमाणे १५ ठेवाव्या की नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आठ ठेवाव्यात, यावरून महाविद्यालयीन स्तरांवर गोंधळाचे वातावरण आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीला वर्षभराची मुदतवाढ दिली गेली आहे.
ठाणे: रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे केवळ पाऊण तासात लोकलमध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग प्रवाशाला मिळाली आहे.
अमरावती : “भगवान शंकराच्या त्रिशुळाचा अपमान करू नका. त्याची तीन टोके कुठे बोचतील, हे तुम्हाला कळणारही नाही. याच त्रिशुळाने महिषासुराचा वध करण्यात आला होता. तुम्हाला आता तीन तोंडे झाली आहेत. दहा तोंडे होतील, तेव्हा त्या रावणाचा वध करण्यासाठी आमचा एकच रामबाण पुरेसा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नागपूर: कोकणसह आता विदर्भालाही पावसाचा “येल्लो अलर्ट” देण्यात आला आहे. यादरम्यान, मुसळधार पावसासह काही भागांत विजांचा कडकडाट होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
“माझ्यावर टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कुणाची घरं फोडली नाहीत. घरफोडे तुम्ही (भाजपा) आहात. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जातं आहे कारण कुणी दारातच उभं करत नाही. कुठे पोलिसांना बसवलं जातं आहे, कुठे शिक्षकांना कामं सोडून बसवलं जातं आहे.” असं म्हणत शासन तुमच्या दारी या मोहिमेवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षावर फोडाफोडीची वेळ का आली आहे? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
कल्याण: येथील पूर्व भागातील जागृती मंडळ संचलित शासन अनुदानित नालंदा प्राथमिक विद्यालयातील एक शिक्षिका शोभा खैरनार यांनी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.) आणि इतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन शाळेत २८ वर्षापूर्वी नोकरी मिळवली.
मुंबई : २० वर्षीय महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आरे पोलिसांनी २४ वर्षीय रिक्षाचालकाला रविवारी अटक केली. हा प्रकार मे महिन्यात घडला होता, परंतु महिलेने नुकतीच तक्रार दाखल करताच पोलिसांनी रिक्षाचालकाला रविवारी उत्तर प्रदेशामधून अटक केली.
महाराष्ट्रातल्या राजकारणात २ जुलैपासून उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड करुन शरद पवारांविरोधातच दंड थोपटले आहेत. तर शरद पवार यांनी कुणावरही टीका करणार नाही, नव्या जोमाने पक्ष बांधणी करणार असं म्हणत पुन्हा एकदा मैदानात उतरुन तयारी सुरु आहे. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे की काँग्रेस पक्षही लवकच फुटणार आहे.