Maharashtra Politics Updates : सोमवारी पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचे राजकीय पडसाद आता दिवसभर उमटण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Today, 30 April 2024 : मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या
अकोला : अवकाळी पावसानंतर उन्हाचा पारा पुन्हा एकदा वाढला आहे. विदर्भात मंगळवारी अकोल्याचे सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेले. अकोल्यात सुर्य आग ओकत असून कमाल तापमान ४३.९ अं.से.वर पोहोचले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस बरसला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा उन्ह तापण्यास सुरुवात झाली. सकाळी ९ वाजातपासूनच अकोलेकरांना उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होते. दुपारनंतर रस्ते निर्मनुष्य होतात. तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. अकोल्यात मंगळवारी कमाल तापमान ४३.९ अं.से.वर पोहोचले. किमान तापमान २७.५ अं.से. होते. अकोल्यासह विदर्भातील इतर शहरांमध्ये देखील तापमान वाढले आहे. अमरावती ४२.८, बुलढाणा ४०.८, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४२.८, गडचिरोली ४२.४, गोंदिया ३९, नागपूर ४१.४, वर्धा ४२.५, वाशिम ४२.४ व यवतमाळ येथे ४० अं.से. कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याची याचिका अरविंद केजरीवाल यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला प्रश्न करत लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना अटक का करण्यात आली? याबाबत उत्तर मागवलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहे. यामुळे शेकडो गावांतील लाखो ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे.
सांगली : भाजप थापेबाजांचा पक्ष झाला असून अब की बार मोदी सरकार ऐवजी अब की बार भाजप का म्हटले जात नाही. पक्षात व्यक्तीस्तोम माजले असल्याची टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुययात विविध ठिकाणी झालेल्या सभेत केली. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव, डफळापूर आदी परिसरात प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी उमेदवार पाटील हेही उपस्थित होते.
जगताप म्हणाले, विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा भाजपची उमेदवारी देण्यास आमचा विरोध होता. तसे पक्ष श्रेष्ठींना स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तरीही उमेदवारी देण्यात आली. दुष्काळी फोरमने त्यांच्या उमेदवारीला विरोध करत पहिल्यांदा मी पक्ष्यातून बाहेर पडलो. खासदार पाटील गेली दहा वर्षे या भागाचे नेतृत्व ते करत आहेत. मात्र, त्यांनी एकदाही संसदेत या भागाचे प्रश्न मांडल्याचे दिसले नाही. त्यांचे मराठी भाषा व्यतिरिक्त अन्य भाषेवर प्रभुत्व नाही. रांजणीचा ड्रायपोर्ट, कवलापूरचा विमानतळ याबाबत त्यांनी संसदेत ठोसपण ेमागणी केली नाही. पंढरपूर- विजापूर ब्रॉडगेजचा सर्व्हे झाला होता. पण त्याचाही पाठपुरावा केला नाही. आता तिसर्यांदा मत मागायला संजयकाका येत आहेत. त्याचा विचार जनतेने करावा.
यवतमाळ : दीड वर्षापूर्वीच्या वादाचा बदला म्हणून शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना आज, मंगळवारी दुपारी शहरानजीक लोहारा येथे घडली.
नागपूर : उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असलेली निराशा त्यांच्या भाषणातील टीकेतून दिसत आहे. मी नागपुरी असल्यामुळे मला त्याच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येत. पण मला ते शोभत नाही. अनुभवी राजकारणी तसे बोलत नसतात. मात्र ते बोलत असल्यामुळे त्यांची राजकारणी म्हणून पातळी घसरली, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केली.
पनवेल : कळंबोली लोखंड बाजाराच्या रस्त्यावर सोमवारी पहाटे सहा वाजता डिझेल इंधन सदृष्य द्रव्यपदार्थाचा साठा कळंबोली पोलीसांनी जप्त केला. पोलीसांनी टॅंकरसह ७६ लाख रुपयांचा साठा जप्त केल्याची माहिती दिली.
रात्रीच्यावेळी रस्त्याकडेला अवजड वाहने उभी करण्यास मनाई असताना सुद्धा वाहनचालक रस्त्याकडेला वाहने उभी करतात यामुळे अपघात होतात. त्यामुळे कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांनी वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी पोलीसांना घातक अवजड वाहने वाहनतळा व्यतिरीक्त ठिकाणी दिसल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस शिपाई वैभव कदम हे सोमवारी पहाटे गस्त घालत असताना त्यांना रोडपाली चौकातील फुडलॅण्ड कंपनीजवळ दोन टॅंकर धोकादायक वळणावर लावल्याचे दिसल्याने त्यांनी टॅंकरचालकांकडे चौकशी केली. या चौकशीमध्ये दोनही टॅंकर गुजरात राज्यातील असून यांच्याकडे कागदपत्र नसल्याचे आढळले. टॅंकरचालकांकडे माहिती घेतल्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्याचा भंग करुन टॅंकरमध्ये पेट्रोलियम सदृष्य पदार्थ असल्याचे समजले. पोलीसांनी टॅंकरचालक व ज्यांच्या मालकीचे हा टॅंकर आहे तसेच या टॅंकरमध्ये विना परवाना माल भरणा-या कंपनी मालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलीसांचे एक पथक हा माल कोणाला विक्रीसाठी कळंबोलीत आणला होता याच्या शोधात आहेत.
पनवेल शहर पोलीसांनी सोमवारी सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन रुटमार्च करुन शांततेत लोकसभा निवडणूकीत निर्भय वातावरणात नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
हिंदू मुस्लिमांसह विविध धर्म आणि जाती प्रवर्गातील नागरिक पनवेल शहरामध्ये शांततेत राहतात. काही महिन्यांपूर्वी एका धर्माच्या फेरीमध्ये काहींना मारहाण झाली होती. त्यानंतर दोन्ही धर्माच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शहराची शांतता राखण्याचे आवाहन समाजमाध्यमांवर केले होते. याच प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी काढलेल्या रुटमार्चमध्ये (फेरी) एसआरपीएफ कंपनीचे जवान आणि पोलीसांचा समावेश होता. एसआरपीएफ कंपनीचे तीन अधिकारी, ६५ अंमलदार या फेरीत होते. तसेच पोलीस ठाण्यातील २ पोलीस निरिक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, ३० अंमलदार या फेरीत सहभागी झाले होते. पोलीस ठाणे परिसरातील महत्त्वाची व संवेदनशील मतदान केंद्र परिसराला पोलीसांच्या तुकडीने भेट दिली.
सोमवारची फेरी पोलीस ठाणे येथून सुरू झाली. त्यानंतर बावन्न बंगला-सुफा मज्जीत- मुसलमान नाका मोहल्ला- पटेल मोहल्ला -कोळीवाडा- उरण नका पंचरत्न चौक-तक्का गाव-रेल्वे स्टेशन -शिवाजीनगर -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या आगारापर्यंत फेरी काढण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड वादळासह झालेल्या पावसामुळे वीज यंत्रणा विस्कळीत झाली. पहाटे तीन वाजताच्या सुमारास खंडीत झालेला सहा उपकेंद्राचा आणि त्यावर अवलंबून असलेल्या २४३ गावाचा वीज पुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नामुळे १० तासानंतर पूर्ववत करण्यात आला.
शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतमधून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आणि महायुतीच्या यामिनी जाधव यांच्यात सामना होणार आहे.
अर्चना पाटील यांना मत म्हणजे मोदींचे हात मजबूत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिवमध्ये प्रचारसभेत उपस्थित असलेल्या मतदारांना ग्वाही दिली.
“इंडिया आघाडीने दरवर्षी एक पंतप्रधान, दुसऱ्या वर्षी दुसरा पंतप्रधान, तिसऱ्या वर्षी तिसरा पंतप्रधान, असे ठरवले आहे. मी जेव्हा एक भारत, श्रेष्ठ भारत बोलतो, तेव्हा काँग्रेसच्या राजकुमाराला ताप चढतो, एक भारत श्रेष्ठ भारत बोलल्यावर राहुल गांधींना आवडत नाही. देशाला तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहणाऱ्या या लोकांची आता पंतप्रधानपदालाही विभागायचे काम करण्याची योजना आहे. याचा अर्थ बारीबारीने देशाला लुटण्याचे काम काँग्रेस करणार आहे. या अशा लोकांना संधी दिली नाही पाहिजे. आता आपण पुन्हा एकदा देशाला अस्थिरतेकडे घेऊन जाऊ शकत नाही”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरमधील भाषणात बोलताना केली आहे.
मुंबई : जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे या आठवड्यात गुरुवारी रात्रीपासून कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, २ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी ३ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण : टिटवाळा जवळील बनेली गाव येथे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका पाच मध्यस्थांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सोमवारी छापा टाकून अटक केली. या टोळीकडून एक लाख १६ हजाराची लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसची ४८ ई रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
थायलंडचे आर्थिक सल्लागार, ‘गोकुळ’चे संचालक व यूथ बँकेचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांनी आज श्रीमंत शाहू महाराज यांना पाठिंबा दिला.
नागपूर : पर्यटनाचा हंगाम अगदी शिगेला पोहोचला असताना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची अक्षरश: गर्दी उसळली आहे. वाघांच्या एका दर्शनासाठी आसुसलेल्या पर्यटकांच्या नजरा ताडोबातील गाभा क्षेत्रातच नाही तर बफर क्षेत्रातही दिसून येतात. त्यातही आता बफर क्षेत्रातील वाघांनी जणू गाभा क्षेत्रातील वाघांशी स्पर्धा सुरू केली. परिणामी पर्यटक गाभा क्षेत्राऐवजी बफर क्षेत्रातच अधिक दिसू लागले आहेत. येथील वाघांनाही जणू हे कळले आहे आणि याच बफर क्षेत्रातून पर्यटकांना वाघाच्या नवनव्या करामती पाहायला मिळत आहेत.
नाशिक : इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात बाल आयोगाला यश आले. आतापर्यंत जिल्ह्यात वर्षभरात १० बालविवाह रोखण्यात आले आहेत. प्रशासकीय पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
डोंबिवली : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेतील उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात उमेदवारी अर्ज भरला.
डोंबिवली : कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला.
मुंबई: मानखुर्द परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रियकराने तिची उरण येथे हत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. या घटनेनंतर मानखुर्दमध्ये संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
ज्या कांग्रेसने कधी संविधान दिवस साजरा केला नाही, ती काँग्रेस आज संविधानाबाबत बोलत आहे, हे दुर्दैव आहे. काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला आहे. या देशातील संविधान कोणीही बदलू शकत नाही. हे मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ४०० जागा जिंकल्यावर भाजपा संविधान बदलेल, आरोप चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाववरून हवाई दलाचा टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता.
टीएएसएलच्या हैदराबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या पिंपरीतील हॉटेल कॅरिअडमध्ये होणार आहेत.
मुंबई : विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मानखुर्दला मुंबईच्या गुन्हेगारीचा अड्डा बनवला आहे. तर काही नेते मुंबईला मिनी पाकिस्तानच बनवू लागले आहे. मात्र मी हे कदापी होऊ देणार नाही अशा इशारा मुंबई उत्तर पूर्व मतदार संघातील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना दिला.
सोमवारी मानखुर्दमधून प्रचार मिरवणूक सुरू असताना परत एकदा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मला इजा पोहचविण्याच्या उद्देशाने माझ्यावर दगड भिरकवला.पण दुर्दैवाने माझ्या भगिनी भाजपाच्या कार्यकर्त्या निहारिका प्रकाशचंद्र खोंदले यांना मानेवरती दगड लागला व त्यांना मार बसला आहे. त्याबाबत त्यांनी रितसर पोलिसात तक्रार देखील केली आहे. विरोधी पक्षानी मानखुर्दला मुंबईच्या गुन्हेगारीचा अड्डा बनवला असून विरोधी पक्षाना आव्हान देतो की उद्या महाराष्ट्र दिनी मी परत एकदा खुलेआम मानखुर्दमधे येणार आहे. हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा, पाठीमागून नाही असा इशारा कोटेचा यांनी विरोधकांना दिला.
डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्या लगतच्या २७ गावातील सोनारपाडा गावातील अतिशय अडचणीच्या ठिकाणी उभारण्यात आलेली महारेरा गुन्ह्यातील एक बेकायदा इमारत ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार आणि त्यांच्या पथकाने गेल्या महिनाभर अथक मेहनत घेऊन शक्तिमान कापकाम यंत्र, जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केली.
नागपूर : शहरी भागात राहणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी यवतमाळमधील ग्रामीण भागातून प्रवेश मिळविला. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने विद्यार्थीनींवर कारवाई केली. विद्यार्थीनींनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयाने दोन्ही विद्यार्थीनींना दिलासा देत प्रवेश कायम ठेवला आहे.
सतेज पाटील हे कोल्हापूरचे दोन वेळा पालकमंत्री झाले आहेत. तर गेल्या वेळचे पालकमंत्री पद कसे घडले यावरून धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले.
नरेंद्र मोदी हे स्वत: भटकती आत्मा असून ते दिवसरात्र फिरत असतात. ते पंतप्रधान कमी आणि प्रचार जास्त आहेत, अशी टीका नाना पटोल यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांना ऑटोरिक्षा तर मारूती कांबळे यांना तुतारी हे चिन्ह मिळाले आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची सुरुवात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह
मुंबईत प्रेयसीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरून एका टॅक्सी ड्रायव्हरने घरकाम करणाऱ्या तरुणीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत नाल्यात फेकून दिले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी नजिम खान याला अटक केली आहे.