Maharashtra Politics Updates : सोमवारी पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचे राजकीय पडसाद आता दिवसभर उमटण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Marathi News Today, 30 April 2024 : मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या

13:23 (IST) 30 Apr 2024
महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्तीला आव्हान देण्याचा अधिकार दमानिया, कांदे यांना आहे का? उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान भुजबळ यांच्याकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयाने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा समीर आणि पुतण्या पंकज यांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना नेते सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, या दोघांना सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न भुजबळ कुटुंबीयांनी सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी उपस्थित केला.

वाचा सविस्तर…

13:20 (IST) 30 Apr 2024
नवी मुंबई: निम्मे शहर सीसीटीव्ही कक्षेबाहेरच, आयुक्तांनी ठरवलेल्या मुदतीतही काम अपूर्णच

शहरात परिमंडळ एकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियंत्रण कक्षाशी ते जोडण्यात आले. परंतु, अद्याप कोपरखैरणे ते दिघा या परिमंडळ दोनच्या क्षेत्रात मात्र फक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम झाले आहे.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 30 Apr 2024
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

पालिकेच्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर उदंचन केंद्रातील पाणी नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात सोडून ते डोंबिवली पूर्व, पश्चिम शहरांना पुरवले जाते.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 30 Apr 2024
मविआ नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर, जे. पी. गावितांविरोधात तक्रारीची शरद पवार गटाकडून तयारी

नाशिक : प्रचार पत्रकावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची छायाचित्रे वापरून माकपचे माजी आमदार तथा दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार जे. पी. गावित हे जनतेची दिशाभूल करीत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावित यांचा नामोल्लेख न करता या माजी आमदाराची उमेदवारी ही भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप केला.

वाचा सविस्तर…

13:01 (IST) 30 Apr 2024
पुणे रेल्वे स्थानकातून बालकाचे अपहरण करणारा गजाआड; बालकाची सुखरुप सुटका

तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बालकाचे अपहरण करणाऱ्या चोरट्यांना कर्नाटकातील विजापूर परिसरातून अटक केली.

सविस्तर वाचा…

12:53 (IST) 30 Apr 2024
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोनदा प्रसुती; पहिल्या बाळाची केली विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

हे प्रकरण मिटविण्यासाठी तिच्या पालकांनी आपले घर बदलले. मात्र तेथेही एका तरुणाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 30 Apr 2024
मुंबईतील ११ हजार घरांची एप्रिलमध्ये विक्री, मार्चच्या तुलनेत घर विक्रीत घट

मुंबई : एप्रिलमध्ये मुंबईतील ११ हजार १६० घरांची विक्री झाली. या घरविक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १०११ कोटी रुपये महसूल मिळाला. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये मुंबईतील घरविक्रीत घट झाली आहे. मार्चमध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता.

वाचा सविस्तर…

12:37 (IST) 30 Apr 2024
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ पुन्हा चर्चेत, कुलगुरूपद बळकावणारे लेल्ला निलंबित

वर्धा : वादाचे दुसरे नाव म्हणजे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ. विद्यार्थ्यांची गटबाजी, मस्ती, पोलीस तक्रारीने हे विद्यापीठ सतत चर्चेत राहिले. आता ते कमी की काय, गुरुजनवर्गही द्वाडपणा करू लागला असल्याचे चित्र आहे. कुलगुरुपदाची खुर्ची बळकावली, असा ठपका ठेवून विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने प्रा. लेल्ला कारुण्यकरा यांना प्रोफेसर पदावरून निलंबित केले आहे.

वाचा सविस्तर…

12:36 (IST) 30 Apr 2024
शरद पवार आणि विजयसिंह मोहिते यांच्या एकत्र येण्यावरून देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका; म्हणाले, “हे लोक जनतेसाठी नाही तर…”

शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील हे जनतेच्या भविष्यासाठी नाही तर त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी एकत्र आले, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा येथील प्रचारसभेत बोलत होते.

सविस्तर वाचा –

12:23 (IST) 30 Apr 2024
नाशिक : राजाभाऊ वाजेंच्या संपत्तीत पाच वर्षात पाच कोटींनी वाढ

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाच वर्षांपूर्वी केवळ आठ ग्रॅम सोने होते. वार्षिक २० लाखांचे उत्पन्न असणाऱ्या वाजेंनी या काळात सोन्यात कुठलीही गुंतवणूक केली नाही. कारण, यावेळच्या शपथपत्रात त्यांच्याकडे तेवढेच सोने आहे. परंतु, या काळात त्यांची एकूण संपत्ती सुमारे पाच कोटींनी वाढून जवळपास १५ कोटींवर पोहोचली आहे.

वाचा सविस्तर…

11:47 (IST) 30 Apr 2024
माढ्यातील ३६ गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवू, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्यानंतर माढा येथे अनेक विकासकामे केली. आता येथील ३६ गावाच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, तो प्रश्नही आम्ही लवकरच सोडवू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत बोलताना दिले.

11:38 (IST) 30 Apr 2024
‘रील्सस्टार’द्वारे निवडणूक प्रचारासाठी २५ लाख रुपयांपर्यंत खर्चाची उमेदवारांची तयारी

मुंबई : मोठमोठ्या मुलाखती आणि चर्चासत्रांऐवजी मोबाइलमधील काही सेकंदांच्या ‘रील्स’वरून आपले मत ठरवणाऱ्या एका मोठ्या वर्गावर सध्या राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्यूब वाहिन्यांवर हजारो-लाखो अनुगामींची (फॉलोअर) संख्या मिरवणारे स्थानिक प्रभावक आणि लोकप्रिय ‘रील्सस्टार’ यांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक ‘रील्सस्टार’साठी पाच ते २५ लाखांहून अधिक खर्च प्रचारासाठी केला जात आहे.

वाचा सविस्तर…

11:36 (IST) 30 Apr 2024
राज्यात ‘या’ भागाला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

राज्यावर असलेले अंशतः ढगाळ वातावरण निवळले आहे. राज्यभरात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 30 Apr 2024
सततच्या खोकल्याचं कारण निघालं हळकुंड! वृद्धानं झोपताना तोंडात ठेवल्यानं गेलं फुफ्फुसात अन्…

ब्रॉन्कोस्कोपी करताना रुग्णाच्या फुप्फुसात अडकलेल्या वस्तूभोवती पिवळ्या रंगाचे थर तयार झाल्याचे दिसले.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 30 Apr 2024
पुण्यात घरभाडे वाढता वाढता वाढे…! जाणून घ्या सर्वाधिक घरभाडे कोणत्या भागात…

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत हिंजवडीत ४ टक्के आणि वाघोलीत ७ टक्के घरभाडे वाढले आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 30 Apr 2024
नाशिक : चांदवडनजीक बस अपघातात पाचपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडलगत मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याची भीती व्यक्त आहे. मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस जळगावहून वसईकडे निघाली होती.

वाचा सविस्तर…

11:35 (IST) 30 Apr 2024
बासमती तांदळाची विक्रमी निर्यात; जाणून घ्या कोणत्या देशांना झाली निर्यात

ही विक्रमी निर्यात केवळ वजनाच्या बाबतच नाही, तर मूल्याच्या बाबतही विक्रमी निर्यात ठरली आहे.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 30 Apr 2024
‘शिक्षण हक्क’च्या नावाने फसवणूक! ‘आरटीई’च्या नव्या नियमावलीविरोधात पालक आक्रमक

राज्य सरकारने यंदा या प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीत बदल केले असून विद्यार्थी राहत असलेल्या एक ते तीन किमी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा प्रशासनाच्या किंवा अनुदानित शाळांमध्येच प्राधान्याने मुलांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 30 Apr 2024
नागपूर : ऊन-पावसाचा खेळ, उष्माघाताचे तीन संशयित मृत्यू!

नागपूर : उपराजधानीत ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने वारंवार हजेरी लावली आहे. अशातच गेल्या महिन्याभरात नागपुरातील वेगवेगळ्या भागात उष्माघाताचे तीन संशयित मृत्यू नोंदवले गेले आहे. परंतु, मृत्यू विश्लेषण अहवालातूनच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

वाचा सविस्तर…

11:33 (IST) 30 Apr 2024
डॉ. महेंद्र कल्याणकर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी डॉ. कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२००७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले डॉ. कल्याणकर हे आज पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांच्या जागी सामाजिक न्याय विभागात बदली होऊनही सूत्रे न स्वीकारलेल्या पी. वेलारसू यांची विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. डॉ. कल्याणकर हे मूळ सहकार विभागातील अधिकारी असून याधी त्यांनी ठाणे रायगड जिल्हाधिकारी आदींसह अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. काही काळ ते कामगार आयुक्तही होते.

11:32 (IST) 30 Apr 2024
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी कोंडी, मुंब्रा बायपासवर अवजड वाहन उलटल्याचा परिणाम

पोलिसांनी अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला केले असले तरी वाहनांचा भार अधिक असल्याने सकाळी ९.३० वाजेनंतरही कोंडी फुटलेली नव्हती.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 30 Apr 2024
“मोदींनी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणणे हे पटते का?”, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांना सवाल

महाराष्ट्र एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 30 Apr 2024
सहा वर्षांत परदेशांत ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

गेल्या तीन वर्षांत संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांसह २३,९०६ भारतीय नागरिकांची परदेशांतून सुटका करण्यात आली.

सविस्तर वाचा…

10:48 (IST) 30 Apr 2024
“गुजरातचे आत्मे महाराष्ट्रात भटकत असले तरी…”; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला!

अफझल खानासारख्या महाराष्ट्राच्या शत्रुचा आत्मा ४०० वर्षांपासून महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यात आता नवीन गुजरातच्या आत्मांची भर पडली आहे. हे आत्मे महाराष्ट्रात भटकत असले आणि त्यांच्याकडून काहीही व्यक्तव्ये होत असली, तरी असा व्यक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

10:41 (IST) 30 Apr 2024
“महाराष्ट्रात येऊन त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले, आता ४ जूननंतर…”; रोहित पवारांचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

सोमवारी पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे. दोघांनीही एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा –

10:40 (IST) 30 Apr 2024
उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर, “नकली शिवसेना म्हणायला ती काही तुमची डिग्री नाही”

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. या दोन्ही टप्प्यांबाबत बोलताना आम्ही इंडिया आघाडीच्या पुढे २.० या फरकाने आहोत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तसंच उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना असा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या प्रचारसभेत करत आहेत. सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेंच्या प्रचाराची सभा घेतली. त्या सभेत त्यांनी नकली शिवसेना या मोदींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

सविस्तर वाचा –

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

मुंबईत प्रेयसीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरून एका टॅक्सी ड्रायव्हरने घरकाम करणाऱ्या तरुणीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत नाल्यात फेकून दिले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी नजिम खान याला अटक केली आहे.