Mumbai News Updates : अलीकडच्या काही दिवसांपासून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आमदारांसह भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी एक वृत्तपत्राने अजित पवारांनी गृहमंत्री अमित शाहांची ८ एप्रिलला भेट घेतली असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यासह देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्राइम, राजकीय घडामोडी जाणून घेणार आहोत.
Mumbai Pune News Update : देश-विदेशातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासंदर्भात पक्ष सोडणार, कुणाला जाऊन मिळणार या बातम्या म्हणजे ‘मीडिया’ने रंगवलेले कपोलकल्पित चित्र आहे. दादांच्या मनात ‘असं काही’ असेल असे मला अजिबात वाटत नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे विदर्भातील प्रमुख नेते, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे.
अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१७ मध्ये भाजपची खासदारकी सोडून आलो आहे. त्यामुळे भाजप कसा पक्ष आहे, याची पूर्ण जाणीव आहे. भाजपबद्दल नागरिकांमध्ये पहिल्यासारखी सहानुभूती राहिलेली नाही. भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. त्याचा प्रत्यय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आला.
सोमवारी गोपनीय माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पथक व केंद्रीय राखीव पोलीस जवानांनी गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात अभियान राबवले होते. दरम्यान, जंगलात लपून बसलेल्या संजय नरोटे या नक्षल्याला जवानांनी अटक केली.
धरणात पाण्याचा साठा अपुरा आणि कमी असल्याची सबब सांगत महानगराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यासाठी आणि त्यादृष्टीने सुरू झालेल्या हालचालींमागे राजकीय वास असल्याचा संशय ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.
नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी तपासणी, विलगीकरण व उपचार या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने कार्यवाहीचे निर्देश पालिका आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले होते.
"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे, ते मला माहिती नाही. दुसऱ्यांच्या घरात काय सुरू आहे, हे डोकावून पाहत नाही. अजित पवार भाजपाबरोबर जातील, असं मला वाटत नाही. भाजपाने राजकारणातील हा खेळ बंद करावा. तसेच, काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडणार नाही," असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.
पुणे: मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महादेव बापू पिंगळे (वय २५, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
"संजय पाटील आणि बंटी पाटील यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्यास आम्ही राजाराम कारखाना बिनविरोध करू, असा शब्द मला दिला होता. पण, बंटी पाटलांनी शब्द फिरवून सभासदांवर निवडणूक लादली," असा आरोप आमदार विनय कोरे यांनी केला आहे.
नाट्यगृह उभारणे सोप्पे आहे; परंतु त्याची देखभाल करणे अवघड आहे. नाट्यगृहाच्या विज बिलापोटी मोठी रक्कम खर्च करावी लागते. ही बाब विचारात घेऊन पंतप्रधान सौर उर्जा योजनेतून राज्यातील ४८ नाट्यगृहांना मदत करावी, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली. यासाठी दामले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना साकडे घातले आहे.
मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक कक्षाने (एएनसी) गेल्या वर्षभरात मुंबईतून जप्त केलेले सुमारे एक हजार किलो अंमलीपदार्थ नष्ट करण्यात आले. त्यात गांजा, चरस, मेफेड्रॉन (एमडी), कोकेन, हेरॉईन, मेथॅक्युलॉन, एमडीएमए, एक्सटॅसी गोळ्या या अंमलीपदार्थांचा समावेश आहे.
सातबारा उतार्यावर शेतीची नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकार्यांच्या नावाने १२ हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या कोतवालासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली.
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे, चऱ्या भरण्याची कामे वर्षानुवर्ष पालिकेत काम करणाऱ्या ठराविक ठेकेदारांना स्पर्धा न करता देण्यात आली आहेत. शहरातील निकृष्ट दर्जाची कामे रोखण्यासाठी खड्डे, चऱ्या भरण्याचे ठेके तातडीने रद्द करावेत, अशी मागणी उल्हासनगर येथील जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.
पुणे: वडारवाडी भागातील पांडवनगर महापालिका वसाहतीत गुंडांच्या टोळीने दहशत माजवून वीस वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्यातून ठाणे येथे होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन मुंबई ३० दिवस पाणी कपात लागू करण्यात आली होती.
कल्याण येथील न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीतील अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करुन १९ जणांनी विमा कंपनीची १४ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
ठाणे: गर्दीचे ठिकाण असलेल्या ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पदपथावर बेकायदा लोखंडी शेड उभारण्यात आली आहे. या बेकायदा शेडमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही.
मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील विशेष कार्य अधिकारी पदावरून सेवा निवृत्त झाल्यानंतरही ओळखपत्र दाखवून कर्मचाऱ्यांवर अधिकार गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे.
ठाणे : राज्यात एकत्रित सत्तेवर असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांच्या ठाण्यातील दिवा भागातील पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद रंगला असतानाच, आता रुग्णालय उभारणीच्या मागणीवरून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटले आहे.
थकित पगार न झाल्यास १९ एप्रिल रोजी कोणत्याही क्षणी आपल्या दालनासमोर आत्मदहन करू ,असा इशारा महापालिकेच्या संजय अग्रवाल यांच्यासह २१ कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना दिला आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते व जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर पुलवामा घटनेबाबत व संघाचे राम माधव यांच्यावर ३०० कोटींच्या प्रस्तावाबाबत केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत.
चंद्रपूर यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा तथा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक राहिले आहे.
मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल – रीवा (मध्य प्रदेश) दरम्यान २० साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गोमूत्रात ‘ई-कोलाय’सह १४ प्रकारचे हानिकारक जिवाणू असतात. त्यामुळे थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे.
"माझ्या भूमिकेवर बोलण्याचा शिंदे गटातील आमदारांचं अधिकार काय?", अशा शब्दांत अजित पवारांनी खडसावलं आहे.
आगामी काळात प्रगतीतील नळ योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरींची खोली वाढविणे या उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे. अल निनोच्या प्रभावाने पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप धारण करू शकते हे लक्षात घेऊन प्रशासनाने १५०१ गाव-वाड्यांना संभाव्य टंचाईची झळ बसू शकते असे गृहीत धरून २० कोटी ६७ लाख रुपये खर्चाचा विशेष कृती आराखडा तयार केला आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यात अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्रच तयार असल्याचं वृ्त्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता अजित पवार स्वत: पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडणार आहेत.
राज्यातील तापमानाने एकीकडे चाळीशी पार केली असताना दुसरीकडे राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई: तब्बल १४ वर्षांनंतर चिंचपोकळी येथील बावला कंपाऊंडमधील रहिवाशांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाने प्रस्ताव मान्य केला असून खासगी विकासकामार्फच पुनर्विकास योजना राबविली जाणार आहे. रहिवाशांना ५५० चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
पुणे: वाळत घातलेले कपडे खालच्या मजल्यावरील गॅलरीत पडल्याने ते काढत असताना चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात घडली.
मुंबई: क्षयरुग्णांवर चांगले उपचार करता यावेत यासाठी केईएम रुग्णालयामध्ये स्वतंत्र क्षयरोग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील क्षयरोग बाह्यरुग्ण विभागामध्ये ये-जा करताना अन्य रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवे केंद्र तळमजल्यावर सुरू करण्यात येणार आहे. लवकरच हे केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.
आपल्या सैनिकांचे रक्षण करता येत नसेल, तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केंद्र सरकारवर तोफ डागली. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या दाव्याच्या संदर्भात पवारांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.