Uddhav Thackeray vs Eknath Shinde Latest News : शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षावरील दाव्याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेला. यावर आता निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि भाजपा, मनसेच्या नेत्यांनीही यावरून टीका केली आहे. एकूणच या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. दुसरीकडे पुण्यात पोटनिवडणुकीने राजकारणाचा पारा चढला आहे. विशेष म्हणजे आज (१८ फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील एका पुस्तकाच्या प्रकाशान कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या पार्श्वभूमीवर राज्यात नेमकं काय घडतं आहे याचा हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Live Updates, 18 February 2023 : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…

10:50 (IST) 18 Feb 2023
“आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे – संजय राऊत

10:47 (IST) 18 Feb 2023
रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे – संजय राऊत

शिवसेना ही शिवसेना आहे. त्यांनी कितीही पाट्या पुसण्याचा प्रयत्न केला तरीही रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही. तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे – संजय राऊत

10:44 (IST) 18 Feb 2023
पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही – संजय राऊत

समाज माध्यमांवर लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात एका म्हणीचा उल्लेख आहे की, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही – संजय राऊत

10:38 (IST) 18 Feb 2023
“फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला…”, संजय राऊतांचा राणेवर हल्लाबोल

सकाळी वृत्तपत्रात जल्लोष करत असल्याचं पाहिलं. फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का? – संजय राऊत

10:25 (IST) 18 Feb 2023
“उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घ्या”, समता पार्टीची मागणी

शिवसेनेला त्यांचं गोठवलेलं धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे त्यांना मशाल चिन्ह देण्याचं कोणतंही कारण राहिलेलं नाही. कारण महाराष्ट्र किंवा इतर दुसऱ्या राज्यात पक्षाला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे आलो आहे. शिवसेनेला त्यांचं धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्हा काढून घ्यावं आणि समता पार्टीचं मशाल हे चिन्ह सुरक्षित करावं. आम्ही सातत्याने निवडणुका लढत आहोत. समता पार्टीला जेव्हा ६ टक्के मतदान होईल तेव्हा आम्हाला हे चिन्ह परत मिळावं – कैलाश कुमार (समता पार्टी)

10:03 (IST) 18 Feb 2023
विश्लेषण : ईपीएस-९५च्या वाढीव पेन्शनसाठी काय करावे?

शासकीय नोकऱ्यांची कमतरता आणि राज्य शासनाचे जुनी पेन्शन योजना लागू न करण्याचे धोरण, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या एका निकालानंतर शासकीय उपक्रम, महामंडळ, खासगी कंपन्या, असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (ईपीएस-९५) पूर्ण वेतनावर निवृत्ती वेतन मिळू शकणार आहे. पण त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला पर्याय अर्ज (ऑप्शन फार्म) कंपनीकडे भरून देणे अनिवार्य आहे. बहुतांश नोकरदारवर्ग खासगी, असंघटित क्षेत्रात काम करणारा असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात काय नमूद करण्यात आले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

सविस्तर वाचा…

10:02 (IST) 18 Feb 2023
विश्लेषण : ठाण्यातील प्रशाकीय अव्यवस्थेचे पाप कुणाचे? कोण आहेत महेश आहेर?

सांस्कृतिक नगरी असे बिरूद मोठ्या अभिमानाने मिरविणाऱ्या ठाणे शहराला राजरोसपणे उभी रहाणारी बेकायदा बांधकामे, त्या माध्यमातून सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे भ्रष्ट व्यवहार, या व्यवहारांना राजाश्रय देणारी व्यवस्था आणि त्याभोवती आखल्या जाणाऱ्या सुडाच्या राजकारणाचा बट्टा लागत असल्याची प्रतिक्रिया सध्या सुजाण ठाणेकरांमधून उमटू लागली आहे. अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना बुधवारी झालेल्या मारहाणीमुळे ठाण्यातील राजकीय परिघात ठराविक अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणांच्या होत असलेल्या वापराची चर्चाही नव्याने सुरू झाली आहे. महापालिकेत अभिजीत बांगर यांच्यासारखा शिस्तप्रिय आणि शहराच्या विकासासाठी दिवस-रात्र मेहनत घेणारा अधिकारी आयुक्तपदी नियुक्त असताना त्यांच्याच प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सातत्याने होणारे आरोप, वाढत्या तक्रारी, संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या वापराची जाहीर चर्चा होत असेल तर ठाणेकरांसाठी हा दुर्दैवी योगायोग म्हणायला हवा. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना संपविण्याचा कट रचल्याचा आरोप करत बुधवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाच्या आवारातच जो काही धुडघूस घातला त्यामुळे सुसंस्कृत ठाण्याचे राजकारण किती गढूळ झाले आहे हे दिसून आलेच. परंतु राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर ठाण्यात सुरू असलेल्या प्रशासकीय कारवायांबद्दलही शंका-कुशंकाना वाव मिळू लागला आहे.

सविस्तर वाचा…

10:01 (IST) 18 Feb 2023
ठाकरे कुटुंबाने शिवसेनेवरील दावा गमावला, संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मागील दोन तीन वर्षांतील…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षावरील दाव्यावर अखेर निर्णय दिला आहे. यानुसार आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावर माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा…

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं.