Uddhav Thackeray vs Eknath Shinde Latest News : शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षावरील दाव्याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेला. यावर आता निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि भाजपा, मनसेच्या नेत्यांनीही यावरून टीका केली आहे. एकूणच या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. दुसरीकडे पुण्यात पोटनिवडणुकीने राजकारणाचा पारा चढला आहे. विशेष म्हणजे आज (१८ फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील एका पुस्तकाच्या प्रकाशान कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या पार्श्वभूमीवर राज्यात नेमकं काय घडतं आहे याचा हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Live Updates, 18 February 2023 : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…

19:59 (IST) 18 Feb 2023
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्र; म्हणाले, “त्यावेळी घेतलेला निर्णय…”

निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांत टीका केली आहे. वाचा सविस्तर

19:35 (IST) 18 Feb 2023
“२०२४ च्या निवडणुकीत शिंदे गट हरला आणि ठाकरे गट जिंकला तर…”, श्रीहरी अणेंचं महत्त्वाचं विधान

शिवसेना पक्षाचा निधी असेल, तर तो निधी शिंदे गटाला जाईल. कारण पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. ते बँक खातं केवळ शिवसेनेचं असेल, तर त्याचे सर्व अधिकार आज तरी शिंदे गटाला आहेत. त्यामुळे शिंदे गट अर्ज करून तो निधी आमच्याकडे वर्ग करा अशी मागणी करू शकेल. तसेच त्या बँक खात्यावर आपले प्रतिनिधी नेमेल. २०२४ च्या निवडणुकीत शिंदे गट हरला आणि ठाकरे गट जिंकला तर तेव्हा ठाकरे गट या निधीवर दावा करू शकतो.

– विधिज्ञ श्रीहरी अणे

19:33 (IST) 18 Feb 2023
शिवसेनेची कार्यालयं, देणग्या, संपत्ती आणि निधीवर कोणाचा अधिकार? श्रीहरी अणे म्हणाले…

शिवसेनेकडे पक्षनिधी आहे. याशिवाय संपत्ती, संस्था, कार्यालयं, शाखा आहेत. त्यावर कोणाचा हक्क याकडे न्यायालय अगदी वेगळ्या प्रकारे पाहतं. सामान्य लोकं त्याकडे भावनिकपणे पाहतात. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे बाबरी मशीद खटला. सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण हिंदू-मुस्लीम, त्यांचा इतिहास-यांचा इतिहास असं न हाताळता संपत्तीविषयक प्रकरण म्हणून याकडे पाहिलं. तसेच त्या जमिनीचे मालक कोण याप्रमाणे निकाल दिला. त्यामुळे शिवसेनेची संपत्ती कोणती, शिवसेना भवन कोणत्या शिवसेनेचं आहे हे पाहिलं जाईल. तसं हे शिवसेना भवन दोघांचंही नाही. ती एका विश्वस्त संस्थेची इमारत आहे. त्यामुळे ही इमारत कोणाला जायला हवी हा वाद धर्मादाय आयुक्तांपुढे चालेल.

– विधिज्ञ श्रीहरी अणे

19:12 (IST) 18 Feb 2023
“निवडणूक आयोगाच्या निकालात न पटणारे मुद्दे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात…”, श्रीहरी अणेंचं सूचक विधान

निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे त्यांना वाटलं तर ते निर्णय देऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाने रोखलं असतं तर त्यांना निर्णय देता आला नसता. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे काँग्रेस, भाजपा आणि इतर अनेक पक्षांचे पक्षचिन्हाबाबतचे वाद आले होते. त्या प्रकरणांमध्ये आयोगाने जसे निर्णय दिले त्यापेक्षा हा निर्णय वेगळा आहे. त्यामुळे आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देणं अगदी क्रमप्राप्त आहे. ठाकरेंची बाजू हरली म्हणून आव्हान द्यावं असं नाही, तर या निर्णयातच काही न पटणारे मुद्दे आहेत. हे मुद्दे सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यायोग्य आहेत, असं मला वाटतं.

– विधिज्ञ श्रीहरी अणे

19:05 (IST) 18 Feb 2023
“शिंदे गटाला ठाकरे गटावर व्हिप वापरता येणार नाही, कारण…”, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणेंचं महत्त्वाचं वक्तव्य

व्हिप वापरता येणार नाही, असं मला वाटतं. कारण शिवसेना शिंदे गटाची आणि शिवसेना ठाकरे गटाची हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत असा निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्यानुसार शिंदेंचा मुख्य पक्ष आणि ठाकरे गट वेगळा पक्ष आहे. त्यामुळे जसा भाजपाचा व्हिप शिवसेनेवर चालत नाही, शिवसेनेचा व्हिप राष्ट्रवादीवर चालत नाही किंवा त्या दोघांचेही व्हिप काँग्रेसवर चालत नाही, तशी स्थिती आहे. कायद्याप्रमाणे हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत.

– विधिज्ञ श्रीहरी अणे

19:01 (IST) 18 Feb 2023
“फोटोची कॉपी करण्यापेक्षा..,” चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; बाळासाहेबांचे नाव घेत म्हणाले, “आज…”

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्यावर शिवसैनिकांना संबोधित केले. हे भाषण त्यानी कारवर उभे राहून केले. याच मुद्द्याला घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. वाचा सविस्तर

19:01 (IST) 18 Feb 2023
शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाला लागू होणार का? विधिज्ञ श्रीहरी अणे म्हणाले…

अर्थसंकल्पाचं अधिवेशन हे मनी बिल असतं. त्याचा संबंध खालच्या सभागृहाशी असतो. तिथं त्यांच्यासमोर होणाऱ्या अर्थसंकल्पावरच मतदान होतं. इतर बाबी त्यात येत नाहीत. अर्थसंकल्पावर मतदान होतं तेव्हा 'कट मोशन' होऊन एक रुपयाचाही फरक झाला तरी सरकार पडतं. याचा अर्थ सरकारला स्वतःचा अर्थसंकल्प मांडता आला नाही किंवा पारित करता आलं नाही. आकड्यांचं गणित पाहिलं तर सरकार पडण्याची स्थिती नाही. भाजपा-शिंदे गटाकडे सगळ्या विरोधकांची मतं मिळाली नाही तरी अर्थसंकल्प मंजूर होऊ शकेल. त्यामुळे त्यांना भीती नाही. अशावेळी व्हिप कशासाठी वापरायचा याचं प्रयोजन नाही. कारण व्हिपचा उद्देश आमच्या बाजूने मतदान करा असा असतो. आत्ता या उद्देशाला फारसं स्थान नाही.

– विधिज्ञ श्रीहरी अणे

18:17 (IST) 18 Feb 2023
उद्धव ठाकरेंबरोबरचे दोन खासदार, १० आमदार एकनाथ शिंदेंबरोबर येणार – कृपाल तुमाने

मी दसऱ्याच्या दिवशीच सांगितलं होतं की, ठाकरे गटातील दोन खासदार आणि १० आमदार एकनाथ शिंदेंबरोबर येतील. मात्र, काही कारणांमुळे तो पक्षप्रवेश राहिला. त्यावेळी आमच्याबरोबर १२ खासदार होते. त्यानंतर गजानन किर्तीकर आमच्याबरोबर आले. त्यामुळे आमच्याकडील खासदारांची संख्या १३ झाली. आणखी दोन खासदार येणार आहेत. त्यामुळे आमच्या खासदारांची संख्या १५ होईल. याशिवाय १० आमदारही आमच्या शिवसेनेत प्रवेश घेताना लवकरच दिसतील.

– खासदार कृपाल तुमाने

18:13 (IST) 18 Feb 2023
…त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत – खासदार कृपाल तुमाने

निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना आम्हाला दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण काम करत आहोत. आम्हाला विश्वास होता की, ज्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात आमदार-खासदार जातात त्याच्या बाजूने निकाल येतो. हा निर्णय अपेक्षित होता. सर्वोच्च न्यायालयातही आम्हीच जिंकू. एकनाथ शिंदेंनी २० जूनला शिवसैनिकांसाठी जे काम केलं त्यात आत्ता आम्ही पूर्णपणे विजयी झालो आहोत. आता आम्ही त्यांच्या नेतृत्वात पुढे जाऊ.

– खासदार कृपाल तुमाने

18:07 (IST) 18 Feb 2023
निवडणूक आयोगाच्या निकालावर बोलताना रावसाहेब दानवेंनी राऊतांना डिवचलं; म्हणाले, “त्यांच्या टीकेला…”

भाजपाचे नेते तथा केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. वाचा सविस्तर

16:30 (IST) 18 Feb 2023
पुण्यात ठाकरे गट – शिंदे गटात राडा, पोलिसांकडून कारवाई

पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा, महिला कार्यकर्त्याही भिडल्या, घोषणाबाजी करत बाचाबाची झाल्याने तणाव, पोलिसांकडून कारवाई

16:17 (IST) 18 Feb 2023
“शिवसैनिक चिन्हासोबत नसतो, तर…”, आमदार नितीन देशमुखांचं वक्तव्य

शिवसैनिक आणि मतदार कधीच चिन्हाबरोबर नसतो. ते शिवसेनेच्या नेतृत्वाबरोबर असतात. शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आहेत. हिंदुत्ववादी, मराठी विचाराचा मतदार ठाकरेंबरोबर आहे, चिन्हाबरोबर नाही. जेव्हा ही लढाई जनतेच्या मैदानात येईल, तेव्हा यांचा सर्वनाश होईल.

– नितीन देशमुख

15:52 (IST) 18 Feb 2023
‘शिवसेना’ पक्षनाव अन् ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा थेट शिवसेना भवनावर दावा? संजय शिरसाट म्हणाले, “ती इमारत…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवनावरही दावा करणार का? याबाबत विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यााबाबत एक मोठं विधान केलं आहे. शिवसेना भवनावर आम्ही कधीही दावा सांगणार नाही, असं ते म्हणाले. एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा –

15:10 (IST) 18 Feb 2023
“हे आपलं मशाल पक्षचिन्हही काढून घेऊ शकतात”, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

शिवसेना हे नाव चोरांना देण्यात आलं. आपला पवित्र धनुष्यबाण चोरांना देण्यात आला. ज्या कपट कारस्थानाने हे राजकारण करत आहेत त्यावरून हे आपलं मशाल हे निशाणही काढून घेऊ शकतात. मात्र, माझं आवाहन आहे की, ज्यांनी धनुष्यबाण चोरले ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या, मी मशाल घेऊन तुमच्यासमोर येतो. पाहू कोण जिंकतं ते. कारण धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो.

– उद्धव ठाकरे

15:07 (IST) 18 Feb 2023
“मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागत आहे, मात्र…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

धनुष्यबाण कोणाचा हे जनतेला ठरवू द्या. शिवसेना कोणाची हे कोणालाही विचारा. यांचा एक डाव सुरू आहे. त्यांना ठाकरे नाव हवं आहे, बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे. मात्र, शिवसेनेचं कुटुंब नको आहे. आमच्यावर मोदींचं नाव सांगून आरोप करत होते. तेव्हा आमची युती होती. तेव्हा लोक मोदींचा मुखवटा घालून सभेला यायचे, आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागत आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही. मुखवटा कोणता आणि खरा चेहरा कोणता हे जनतेला माहिती आहे.

– उद्धव ठाकरे

14:56 (IST) 18 Feb 2023
निवडणूक आयोगाने काल गुलामी केली, या गुलामांनी मी आव्हान देतो की… – उद्धव ठाकरे

निवडणूक आयोगाने काल गुलामी केली. निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यावर एखाद्या राज्याचे राज्यपाल होऊ शकतात. कारण आत्ताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. असे गुलाम त्यांनी अवतीभोवती ठेवले आहेत. मी या गुलामांना आव्हान देतो की, शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राच्या मालकांनी ठरवण्याची वेळ आली आहे.

– उद्धव ठाकरे

14:45 (IST) 18 Feb 2023
धनुष्यबाण चोरला आहे त्यांनी मधमाशांच्या पोळावर दगड मारला आहे, आता… – उद्धव ठाकरे

ज्यांनी धनुष्यबाण चोरला आहे त्यांनी मधमाशांच्या पोळावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेल्या मधाचा स्वाद घेतला आहे. अद्याप त्यांना मधमाशांचे डंख लागले नाहीत. आता हे डंख मारण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे

14:12 (IST) 18 Feb 2023
“दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटणारी माणसं…”, शिंदे गटाच्या जल्लोषावर सुषमा अंधारेंची खोचक टीका; म्हणाल्या, “फितूर अन् बदमाश…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून शुक्रवारी जल्लोष करण्यात आला. पुण्यातील सारसबाग परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला पुष्पहार अर्पण करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरात आरती केली. पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याबरोबरच ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही फटाक्यांची आतषबाजी करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं. दरम्यान, शिंदे गटाच्या जल्लोषावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक टीका केली आहे. पुण्यात माध्यामांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

14:11 (IST) 18 Feb 2023
“ठाकरेंनी धनुष्यबाण राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता” म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आरशासमोर…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. सविस्तर वाचा

14:11 (IST) 18 Feb 2023
“शिवधनुष्य चोरीला गेलं आहे”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

“शिवधनुष्य चोरीला गेलं आहे”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार

13:52 (IST) 18 Feb 2023
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा…”

ठाकरे गटाशी युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी निवडणूक आयोगाचा निकाल तसेच ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

13:51 (IST) 18 Feb 2023
‘निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली,’ कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांचे मोठे विधान; म्हणाले, “हा निर्णय…”

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आगामी काळात काय-काय गोष्टी बदलणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क बांधण्यात येत आहेत. असे असतानाच कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालावर महत्त्वाचे विधान केले आहे. वाचा सविस्तर

13:11 (IST) 18 Feb 2023
मराठीतून शपथ घेत राज्यपाल रमेश बैस यांनी स्वीकारला पदभार

रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपाल पदाची शपथ घेतली. बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

12:31 (IST) 18 Feb 2023
शिवसेनेबाबत आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात गेल्यास…”

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी. पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निर्णय घेण्याचा आयोगाला अधिकार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आयोगाला निवडणूक घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मात्र, त्यात पक्षांमधील वादाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? यावर उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले, तर त्यांना न्याय मिळेल – प्रकाश आंबेडकर

12:22 (IST) 18 Feb 2023
आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचं कोल्हापुरात आंदोलन

आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचं कोल्हापुरात आंदोलन, बिंदू चौकात जोरदार घोषणाबाजी, भाजपा केंद्रातून यंत्रणांचा वापर करत असल्याचाही आणि लोकशाही संपुष्टात आणत असल्याचा आरोप

11:39 (IST) 18 Feb 2023
“एकनाथ शिंदे आता शिवसेनाप्रमुख”; निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य; म्हणाले, “घराणेशाही…”

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, या निकालानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही या निकालानंतर प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे आता केवळ मुख्यमंत्री नाही, तर शिवसेनाप्रमुखही झाले आहेत, असं ते म्हणाले. तसेच या निकालावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. सविस्तर वाचा –

11:39 (IST) 18 Feb 2023
निवडणूक आयोगाच्या निकालावर पंकजा मुंडेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या, “ज्यांना चिन्ह नाही मिळालं, त्यांना…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा

11:36 (IST) 18 Feb 2023
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ‘शिवसेना भवन’ शिंदे गटाच्या ताब्यात जाणार? संजय राऊत म्हणाले, “आयोगाने शेण खाल्लं म्हणून…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही या निर्णयानंतर शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. राऊत सध्या कोकणाच्या दौऱ्यावर असून ते आज कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा –

11:22 (IST) 18 Feb 2023
भाजपची काँग्रेस होईल ही भीती फडणवीस यांना का वाटते?

अमित शहा यांच्या नागपूर दौऱ्याच्या वेळी एखाद्या शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणे रांगेत उभे राहून एकजुटीचे दर्शन घडवणारे स्थानिक भाजप नेते प्रत्यक्षात परस्परांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण करण्यातच अधिक व्यस्त दिसतात.

सविस्तर वाचा

11:21 (IST) 18 Feb 2023
उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता पर्याय कोणते?

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे गटाकडे सोपविण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे कायदेशीर आघाडीवर किल्ला लढवायचा असतानाच दुसरीकडे शिवसैनिकांचे मनोधैर्य उंचावण्याबरोबरच शिवसेनेचे सामान्य मतदार आपल्याबरोबरच राहतील यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सविस्तर वाचा

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं.