Mumbai Maharashtra Breaking News Live : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकलं आहे. या अनुषगांने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत राज्यव्यापी मेळावा घेतला. या मेळाव्यातून अजित पवारांनी आ निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केलं. तसेच मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिल्याच्या मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला १३ जुलैपर्यंत दिलेला अल्टिमेटम संपला आहे. त्यामुळे राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यासंदर्भात काही निर्णय घेतं का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच सध्या अनेक भागात पाऊस पडत असल्याने त्याचा फटका रेल्वेला बसत आहे. पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प आहे. कोकण रेल्वेकडून सात ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Live Updates

Marathi News Updates

20:16 (IST) 15 Jul 2024
पैठणमधील ४० ग्राहकांवर वीज चोरीचा गुन्हा

छत्रपती संभाजीनगर - पैठण तालुक्यातील आपेगाव येथील महावितरणच्या लघुदाब वीज वाहिनीवर आकडे टाकून घरगुती उपकरणे वापरासाठी वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहायक अभियंता संतोष गिरजाबा सुर्वे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात ४० वीज ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. गुन्हे दाखल झालेले नवगाव (रामनगर) या एकाच गावातील ४० ग्राहक आली. ४० ग्राहकांविरुद्ध ७ लाख १९ हजार ९० रुपयांच्या वीज चोरीप्रकरणी विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून करण्यात आली आहे.

19:12 (IST) 15 Jul 2024
नाशिकरोड कारागृहातील लाचखोरी उघड - दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

वयाचे आणि शिक्षेचे निकष पूर्ण करणाऱ्या कैद्याला सोडण्यासाठी लागणारे योग्यता प्रमाणपत्र देण्याकरिता ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आबिद अत्तार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सविस्तर वाचा…

18:36 (IST) 15 Jul 2024
"छगन भुजबळांनी परतीचे प्रयत्न केले तरी...", अनिल देशमुखांचा खोचक टोला

छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र, भेटीनंतर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत ही भेट राज्यातील मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात असल्याची माहिती दिली. यावर आता शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. 'छगन भुजबळ यांनी परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना पक्षात घेतले जाणार नाही. छगन भुजबळ हे दुटप्पी भूमिका घेतात', अशी टीका अनिल देशमुख यांनी केली.

18:35 (IST) 15 Jul 2024
‘हमीभावा’चा राजकीय हत्यारासारखा वापर; शेतकऱ्यांना अत्यल्प मदत; ‘एसबीआय’च्या अहवालातील माहिती

किमान आधारभूत किंमत (हमीभाव) योजना चांगली असली तरीही राजकीय पक्ष त्याचा एक राजकीय हत्यार म्हणून वापर करतात. सविस्तर वाचा…

18:34 (IST) 15 Jul 2024
पूजा खेडकरने ‘वायसीएम’ रुग्णालयातून अंपगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे उघड

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून देखील २०२२ मध्ये अपंगत्वाचेे प्रमाणपत्र घेतल्याचे उघडकीस आले आहे. सविस्तर वाचा…

18:05 (IST) 15 Jul 2024
हवामान खात्याचा ‘हायअलर्ट’, १८ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार

जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहूतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सविस्तर वाचा…

17:40 (IST) 15 Jul 2024
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार

येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या वसाहतीत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पोलीस अकादमी मध्ये स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीतील कर्मचाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यावर हा अत्याचार झाला. सविस्तर वाचा

17:26 (IST) 15 Jul 2024
साखरेचे दर क्विंटलला ४२०० रु. करण्याची राष्ट्रीय साखर संघाची मागणी - हर्षवर्धन पाटील

सांगली : साखरेचे बाजारातील मूल्य ४ हजार २०० रुपये करण्याची मागणी केली असून लवकरच यावर केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वाळवा येथे बोलताना सोमवारी व्यक्त केला. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मौत्री शिवाजीराव नाईक होते. यावेळी खा. धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी स्व. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळी जाऊन सर्वांनी अभिवादन केले. कार्यक्रमात हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

श्री. पाटील म्हणाले, ऊसाची एफआरपी वाढत असताना त्या तुलनेत साखरेचे दर वाढत नाहीत. यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम तुटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे. सहकारी साखर कारखानदारीवर बरेच घटक अवलंबून असून रोजगारक्षम व्यवसाय आहे. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल ४२०० रुपये करण्यात यावे अशी मागणी ५२४ सहकारी साख कारखान्याच्या राष्ट्रीय संघाने केली आहे. हा प्रस्ताव आता केंद्रिय मंत्रीमंडळासमोर आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल.

17:12 (IST) 15 Jul 2024
सायबर गुन्हेगाराच्या खात्यातून व्यावसायिकाला परत मिळाले ४ लाख २८ हजार…

सायबर गुन्हेगाराने पळवलेली रक्कम परत मिळविणे फार कठीण असते, मात्र शहरातील एका प्रकरणात सायबर गुन्हेगाराकडे गेलेली रक्कम यशस्वीपणे व्यावसायिकाला परत मिळाली.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 15 Jul 2024
उच्च शिक्षण संचालकांविरुद्ध १० रुपयांचा जामीनपात्र वॉरंट….पण, माफी मागितल्याने….

मागील महिन्यात उच्च न्यायालयाने उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्याविरोधात १० रुपयाचा जामीनपात्र वॉरंट काढला होता.

सविस्तर वाचा...

17:07 (IST) 15 Jul 2024
खेड जवळील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे २० तासांपासून ठप्प

कोकण रेल्वे गेल्या २० तासांपेक्षा जास्त काळापासून ठप्प झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील खेड जवळ कशेडी बोगद्यापाशी दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा २० तासांपासून ठप्प झाली आहे. दरम्यान, रेल्वे रूळावर आलेली माती काढण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच रेल्वे सुरळीत सुरु होईल, असं सागितलं जात आहे. खेड जवळील दिवाण खवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे वाहतूक रविवार १४ जुलै दुपारपासून बंद करण्यात आली होती.

17:05 (IST) 15 Jul 2024
कोकण रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना एसटीचा आधार, विशेष बस सोडण्यात आल्याने दिलासा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या भागात पूर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे रेल्वे रुळावर आल्याने, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:59 (IST) 15 Jul 2024
दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून; विद्यार्थी नोंदणीमध्ये यंदा घट

पुणे : राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून (१६ जुलै) सुरू होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

16:33 (IST) 15 Jul 2024
‘संविधान हत्या दिवसा’च्या विरोधात; थेट सरन्यायाधीशांना पत्र... काय आहेत मागण्या?

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संविधान हत्या दिवसाला विरोध करून सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आणि वकील असीम सरोदे यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. गृहमंत्रालयाने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याबाबत नुकतीच घोषणा केली. सविस्तर वाचा…

16:15 (IST) 15 Jul 2024
कल्याणमध्ये तरूणींना वेश्या व्यवसायात आणून पैसे कमविणारी महिला अटकेत

कल्याण : २० ते ३० वयोगटातील तरूणींना विविध ठिकाणी काम देण्याचे आमिष दाखवून इतर शहरांमधून कल्याणमध्ये आणायचे. त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्या माध्यमातून पैसे कमविणाऱ्या एका महिलेला खडकपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे.

सविस्तर वाचा...

15:57 (IST) 15 Jul 2024
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….

लोकसभा निवडणुकीनंतर ही आघाडी आक्रमक होण्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी महायुतीही डावपेच रचत आहे. त्याची पावती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या चालीने मिळाली आहे.

सविस्तर वाचा...

15:36 (IST) 15 Jul 2024
तळोजा कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर तिसर्‍या डोळ्याची नजर

पनवेल : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील २९६८ कैदी आणि बंदींच्या हालचालींवर यापुढे एआयच्या मदतीने ४५१ तिसर्‍या डोळ्यांची नजर असणार आहे. सोमवारी राज्याचे कारागृह व सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरिक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते कळ दाबून तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सीसीटिव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला.

सविस्तर वाचा...

14:54 (IST) 15 Jul 2024
"छगन भुजबळांच्या भूमिकेचं स्वागत, पण...", संजय शिरसाटांचा टोला

छगन भुजबळांनी आज शरद पवारांची भेट घेतली. ही भेट राज्यातील मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात असल्याची माहिती त्यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले, "छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आजच्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलं. आता छगन भुजबळ यांच्या उद्याच्या भूमिकेवर आज बोलणं गैर आहे", असा खोचक टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.

14:45 (IST) 15 Jul 2024
मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात तरूणीची आत्महत्या

मुंबई : मरीन ड्राईव्ह येथे सोमवारी एक तरूणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समुद्रातून तरूणीला बाहेर काढून जी.टी. रुग्णालयात नेले.

सविस्तर वाचा...

14:29 (IST) 15 Jul 2024
कॅम्लिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

सुभाष दांडेकर हे चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीतील अग्रेसर अशा कॅम्लिन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा व आधारस्तंभ होते.

सविस्तर वाचा...

14:25 (IST) 15 Jul 2024
कोकण रेल्वेला मुसळधार पावसाचा मोठा फटका; अडकलेले चाकरमानी बसने रवाना

खेड जवळील दिवाण खवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे वाहतूक रविवार १४ जुलै दुपारपासून बंद करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे ही दरड हटविण्यात अडथळे येत असल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रत्नागिरीसह इतर काही स्थानकावर रेल्वे गाड्या उभ्या असल्याने त्या गाड्या तेथेच रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र अशा रेल्वे स्थानकावर अडकलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी राज्य परिवहन मंडळाची बसेस सोडण्यात आल्या आहेत.

मांडवी एक्स्प्रेस, दिवा पॅसेंजर यातील प्रवाशांना मुंबई येथे सोडण्याकरिता रेल्वे उपप्रबंधक यांनी केलेल्या मागणी नुसार रत्नागिरी स्टेशन येथे ४० बस, चिपळुण स्टेशनसाठी १८ बस तसेच खेड स्टेशनसाठी १० बसेस सोडण्यात आल्या आहेत.

14:03 (IST) 15 Jul 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अडकली संकेतस्थळाच्या कोंडीत, रात्रभर जागुनही ग्रामीण बहिणींना नेट नसल्याने अर्ज भरण्यास मिळेना

दिवसा संकेतस्थळ व्यस्त राहून अर्ज भरण्यास उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक महिला रात्री १२ ते पहाटेपर्यंत या योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी धडपडत आहेत.

सविस्तर वाचा...

13:45 (IST) 15 Jul 2024
"...तर राहुल गांधींचीही भेट घेईल", छगन भुजबळांचं विधान

छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. ही भेट राज्यातील मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात असल्याची माहिती त्यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले, "मराठा-ओबीसींच्या प्रश्नांवर सध्या राज्यात स्फोटक परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात शांतता राहिली पाहिजे. यासाठी प्रयत्न केला पाहिजेत, असं सांगितलं. त्यावर शरद पवार हे दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ओबीसी आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडावा म्हणून यासाठी मी प्रयत्न करत आहे. यासाठी मी कोणालाही भेटायला तयार आहे. उद्या मला वाटलं की राहुल गांधी यांना भेटलं पाहिजे. किंवा पंतप्रधान मोदी यांना भेटलं पाहिजे तर त्यांनाही भेटेल", असं छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले.

13:03 (IST) 15 Jul 2024
शरद पवारांची भेट का घेतली? छगन भुजबळांनी कारण सांगितलं

छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची'सिल्व्हर ओक' येथे भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता छगन भुजबळांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "मी आज शरद पवारांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती. मी १० वाजता गेलो. पण त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आराम करत होते. त्यानंतर मग मी त्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्याकडे राजकीय नेता म्हणून किंवा कोणतीही राजकीय भूमिका घेऊन गेलो नव्हतो. तर राज्यातील एक जेष्ठ नेते आहेत. यासाठी गेलो होतो. मराठा-ओबीसींच्या प्रश्नांवर सध्या राज्यात स्फोटक परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात शांतता राहिली पाहिजे. यासाठी प्रयत्न केला पाहिजेत, असं सांगितलं. त्यावर शरद पवार हे दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे", अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

12:42 (IST) 15 Jul 2024
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ निघाले; बाहेर येताच म्हणाले, “बंगल्यावर…”

छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची'सिल्व्हर ओक' येथे भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. जवळपास एक तास छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. यानंतर छगन भुजबळ हे आता'सिल्व्हर ओक'वरून निघाले असून यावेळी त्यांनी दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली. या भेटीबाबत त्यांना विचारलं असता सविस्तर बंगल्यावर जाऊन बोलतो, असं छगन भुजबळ म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

12:34 (IST) 15 Jul 2024
दुष्टचक्र कायम…दिवसागणिक एक आत्महत्या; १२० शेतकऱ्यांनी…

शेतकरी आत्महत्येचा कलंक माथी लागलेल्या कृषी प्रधान बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची दुर्देवी मालिका चालू वर्षातही कायम आहे.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 15 Jul 2024
कुपोषण निर्मूलनाचा ‘वाशीम पॅटर्न’, वाशीम जिल्हा राज्यात अव्वल; पाच महिन्यांत…

कुपोषण निर्मूलनात वाशीम जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी कुपोषण मुक्तीची मोहीम सुरू झाली.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 15 Jul 2024
“भिक्खू बनवून देतो, तेही थायलंडला,” इंजिनियरने वृद्धाला दोन लाखाने गंडविले…

थायलंडला जाण्यासाठी पासपोर्ट बनवून देतो आणि समाज कल्याण विभागातून घर मिळवून देतो असेही आमिष देत त्यांच्याकडून दोन लाख १० हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 15 Jul 2024
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार

येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या कैद्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 15 Jul 2024
शाळा बुडवून खासगी शिकवणीला जाता, बारावी परीक्षेला मुकाल… नवा नियम जाणून घ्या…

खासगी क्लास चालक आणि महाविद्यालय यांच्या संगनमताचे (टाय-अप) पेव फुटले असून त्यावर आळा बसला पाहिजे, हा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे.

सविस्तर वाचा...

गेल्या जवळपास दोन वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

MP Sanjay Raut

खासदार संजय राऊत

Story img Loader