Mumbai Maharashtra Breaking News Live : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकलं आहे. या अनुषगांने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत राज्यव्यापी मेळावा घेतला. या मेळाव्यातून अजित पवारांनी आ निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केलं. तसेच मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिल्याच्या मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला १३ जुलैपर्यंत दिलेला अल्टिमेटम संपला आहे. त्यामुळे राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यासंदर्भात काही निर्णय घेतं का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच सध्या अनेक भागात पाऊस पडत असल्याने त्याचा फटका रेल्वेला बसत आहे. पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प आहे. कोकण रेल्वेकडून सात ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Updates
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या आगामी अंदाजे २००० घरांच्या सोडतीत गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील रिक्त ८८ घरांचा समावेश आहे.
दररोज सकाळ, संध्याकाळ हा प्रकार गर्दीच्या वेळेत सुरू असतो. अनेक प्रवासी हे लोखंडी रोधक ओलांडताना पडतात.
या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, असे ‘आयडॉल’कडून स्पष्ट करण्यात आले.
जेवण न आवडल्याने बांधकाम मजुराला हातोडा मारून खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील उंड्री परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली.
समुद्रपूर येथे एका भागात लग्नासाठी लॉन व मंगल कार्यालय आहे. त्यासमोर विद्युत पुरवठ्याचे नियमन करणारे रोहित्र आहे.
जलजीवन मिशनची मुदत मार्च महिन्यातच संपुष्टात आली. मात्र, अजूनही काही कामांचा वेग फारसा वाढला नाही.
आजारी प्राण्यांची रुग्णालयात ने-आण करणाऱ्या वाहनाच्या (ॲम्ब्युलन्स) धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव भागात घडली.
नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली गावात असणाऱ्या बाळाराम वाडी येथे महावितरणाच्या रोहित्राला ( ट्रान्स्फॉर्मर) ला आज सकाळी ९ च्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याने सुमारे २ हजार घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
छगन भुजबळ आज शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे या म्हणाल्या, “छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. याबाबत मला माहिती नाही. मी पुण्यात आहे. मात्र, आज शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटरला जाणार नव्हते. त्यामुळे छगन भुजबळ हे शरद पवार यांच्याभेटीबाबत आपल्याला माहिती नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कल्याण : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्याने विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचच्या रेल्वे रुळाजवळ मुसळधार पावसाचे पाणी तुंबले आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका नसल्याने मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले की हे पाणी फलाट क्रमांक पाचच्या रूळांवर येत आहे.
वसई : वसई पश्चिमेच्या भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी पाच च्या सुमारास ही घटना घडली. यात कोणीही प्रवासी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
अलिबाग : अलिबाग पेण मार्गावर कार्लेखिंड येथे एस टी बसला अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी एका बाजूला बॅरीगेटवर कलंडली.
सविस्तर वाचा…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय झाला. त्यानंतर आज मिलिंद नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. याच भेटीदरम्यान छगन भुजबळ हे देखील शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थांनी दाखल झाले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे.
“पैशांच्या बळावर ज्या पद्धतीने क्रॉस व्होटिंग करून घेतलं, ती सुद्धा संविधानाची हत्या आहे. यावर न्यायालय काही करणार आहे की नाही? अमित शाह या देशाचे गृहमंत्री असून त्यांना संविधानाची चिंता आहे. मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील असं त्यांचं सरकार वागत आहेत का? ते महाराष्ट्रात गैरसैविधानिक सरकार चालवत आहेत. हे राज्याचं दुर्दैवं आहे.”, अशी टीका करत संजय राऊत यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत.
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिल्याच्या मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांच्यावर टीका करत शरद पवार यांनी फोन केल्यामुळे विरोधक सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, अशी टीका केली होती. मात्र, त्यानंतर आज छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत त्यांच्या निवासस्थांनी दाखल झाले असल्याचे वृत्त माध्यमांत आहे.
गेल्या जवळपास दोन वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.