Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मुंबई आणि ठाणे भागात तुरळक पाऊस आहे. तर आजची सकाळ उजाडली ती गोळीबाराच्या बातमीने. जयपूर एक्स्प्रेसने एका आरपीएफ कॉन्स्टेबलने B 5 या डब्यात गोळीबार केला. या घटनेत एक ASI आणि इतर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे हे त्यांच्या महात्मा गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होते आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही. या आणि अशा सगळ्या महत्वाच्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Mumbai Rain Today Live Update |Maharashtra News Live :संभाजी भिडे वक्तव्यावर ठाम, जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार आणि इतर महत्त्वाच्या बातम्या

18:38 (IST) 31 Jul 2023
जिवंत वीज प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू? तीन दिवसात दोन वाघीण दगावल्या

चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील आष्टी काकडे गावातील गावशिवरात एका पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना ३१ जुलै रोज सोमवारला सकाळी उघडकीस आली.

सविस्तर वाचा...

18:27 (IST) 31 Jul 2023
आमदार यशोमती ठाकूर यांना ठार मारण्‍याची धमकी देणाऱ्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल

अमरावती: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अमरावती येथील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते.

सविस्तर वाचा...

18:15 (IST) 31 Jul 2023
बुलढाणा: भिडे गुप्तपणे सभास्थळी पोहोचले परंतु राडा झालाच! वंचित, पँथरच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बुलढाणा: हिंदुस्थान प्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्या अगोदरच वादग्रस्त ठरलेल्या खामगावच्या आजच्या सभेनिमित्त पुन्हा राडा झालाच.

सविस्तर वाचा...

18:14 (IST) 31 Jul 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात, पाच तासांच्या दौऱ्यात काय काय होणार?

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमानिमित्ताने उद्या (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. सुमारे दीड वर्षांनंतर पंतप्रधान पुण्यात येत असून, या दौऱ्यात मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन, विविद विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत.

सविस्तर वाचा

17:22 (IST) 31 Jul 2023
वाशिम : कोतवाल परीक्षा वादाच्या भोवऱ्यात! गुणाची टक्केवारी कमी आल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप

वाशिम : जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या ८२ जागांसाठी १ हजार ९४५ अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. व लगेच निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आक्षेप घेतला आहे. नियमित अभ्यास करणारे व इतर परीक्षेत ७० टक्के गुण घेणाऱ्यांना कोतवाल परीक्षेत कमी गुण कसे, असा त्यांचा आरोप आहे.

सविस्तर वाचा...

17:08 (IST) 31 Jul 2023
“संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे म्हणाले, “महायुतीत आमच्या मंचावर ते येतील, त्यांच्या मंचावर..’

नागपूर : संभाजी भिडे प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिडे आमचे कार्यकर्ते नाही आणि सरकारने त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने त्यांची दखल घेतल्यावर आंदोलन करण्याची गरज नाही. नियमात असेल त्याप्रमाणे कारवाई होईल, असे मत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

17:08 (IST) 31 Jul 2023
ठाण्यात रस्ते कामात घेतली जाते १६ टक्के दलाली; ठाणे काँग्रेसचा गंभीर आरोप, खड्डे आणि दुभाजकांविरोधात काँग्रेस आंदोलन

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि विविध रस्त्यांवर लावण्यात आलेले अनावश्यक दुभाजक याविरोधात शहरात पडसाद उमटत असतानाच, सोमवारी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याचमुद्द्यावरून ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. सविस्तर वाचा

17:05 (IST) 31 Jul 2023
ठाण्यात अजित पवार गटाचे धरणे आंदोलन; संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी

साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले असून ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाने (अजित पवार गट) सोमवारी धरणे आंदोलन करत भिडे यांचा निषेध केला.

सविस्तर वाचा

16:24 (IST) 31 Jul 2023
VIDEO: महापुरुषांचा अपमान करणारे संभाजी भिडे गजानन महाराजचरणी नतमस्तक

बुलढाणा: आपल्या विदर्भ दौऱ्यात थेट राष्ट्रपिता महात्मा गांधीसह अनेक महापुरुषांचा आक्षेपार्ह भाषेत अपमान करणारे संभाजी भिडे आज बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले.

सविस्तर वाचा...

15:12 (IST) 31 Jul 2023
अमरावती : संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक

अमरावती : श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्‍थान संघटनेचे संस्‍थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्यावरून कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भिडे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्‍यात आली. पोलिसांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली.

सविस्तर वाचा...

14:59 (IST) 31 Jul 2023
कल्याण मधील गौरीपाडा तलावातील शेकडो मासे मृत; प्रदुषित पाण्यामुळे मासे मृत झाल्याचा अंदाज

कल्याण- कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील तलावात गेल्या दोन दिवसांपासून शेकडो मासे मृत पावल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुसळधार पाऊस पडत असताना आजुबाजुच्या भागातील प्रदुषित पाणी तलावात शिरल्यामुळे ही घटना घडली असण्याचा प्राथमिक अंदाज या भागातील नागरिकांकडून काढला जात आहे.

सविस्तर वाचा

14:51 (IST) 31 Jul 2023
पनवेल: सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

पनवेल: तालुक्यातील चिंध्रण गावामध्ये सायंकाळी साडेसहा वाजता २१ वर्षीय तरुणाला नागाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला. अनिकेत कदम असे या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

14:36 (IST) 31 Jul 2023
डाेळे येऊ नये म्हणून घरातच करा हा साधा उपाय, काय आहे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला?

नागपूर : डोळे येऊ नये म्हणून आपली आजी अनेक उपाय करत होती. मात्र, आपण ते विसरत चाललो आहोत. डोळे येण्याची साथ आता सर्वत्र सुरू आहे. डोळे आले नसतील तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक गोष्ट करता येऊ शकते.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 31 Jul 2023
पंतप्रधान बंदोबस्ताची रंगीत तालीम; रस्ते बंद केल्याने वाहतुकीचा बोजवारा; नागरिकांना मनस्ताप

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांनी सोमवारी सकाळी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. अचानक मध्यभागातील रस्ते बंद केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 31 Jul 2023
मुंबई: मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था; आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएला केले लक्ष्य

मुंबईत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरु असून या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वांद्रे पश्चिम लिंकिंग रोड येथे मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून चिखल झाला आहे. त्याचा त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होत आहे. सविस्तर वाचा…

14:02 (IST) 31 Jul 2023
नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले… नेरूळ सेक्टर ४ येथे चालत्या गाडीवर झाड कोसळले

नवी मुंबई: नेरुळ सेक्टर ४ येथे रविवारी सायंकाळी ७.२० च्या दरम्यान चालत्या गाडीवर झाड पडल्याने दुर्घटना घडली. सुदैवाने या गाडीतील चौघांचे प्राण वाचले असून त्यातील एक जण जखमी झाला आहे.

सविस्तर वाचा...

13:49 (IST) 31 Jul 2023
पुणे: महापालिकेचा सर्व्हर डाऊन; मिळकतकर भरण्यास अडचणी

पुणे: पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने महापालिकेची सर्व्हर यंत्रणा सोमवारी कोलमडली. मिळकतकर भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आनलाइन कर भरताना महापालिकेचे संकेतस्थळही क्रॅश झाले. त्यामुळे मिळकतधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 31 Jul 2023
वर्धा : बजाज ऑटो समुहाची जागतिक दर्जाची कर्मशाळा देणार अत्याधुनिक प्रशिक्षण

वर्धा : जन्मभूमी वर्धा व कर्मभूमी पुणे असलेल्या बजाज समुहाने वर्धेशी आपली नाळ कायम जोडून ठेवली आहे. त्यांच्या समुहाची शिक्षा मंडल ही संस्था दर्जेदार शिक्षणाने परिचित आहे. आता याच संस्थेचे बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय हे राज्यात पहिल्या पाचमध्ये असल्याचा दावा संस्था करते. याच महाविद्यालयात ‘बजाज अभियांत्रिकी कौशल्य प्रशिक्षण’ दिले जाणार आहे.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 31 Jul 2023
कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्या जवळील रस्ता खड्ड्यात

कल्याण- कल्याण शहराचे मुंबई बाजूकडील मुख्य प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत. शहराच्या मुख्य प्रवेशव्दारावरील रस्त्यावर खड्डे पडून ते बुजविण्यात पालिका प्रशासन टंगळमंगळ करत असल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत .

सविस्तर वाचा

13:09 (IST) 31 Jul 2023
‘जाऊ या पक्ष्यांच्या गावात…’ सांगलीत ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन; ‘पक्ष्यांच्या आवाजा’वर होणार मंथन

नागपूर: पक्षीमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात.

सविस्तर वाचा...

12:57 (IST) 31 Jul 2023
आमदार यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी

आमदार यशोमती ठाकूर यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. असंच बोलत राहिलात तर दाभोलकर करु.अशी धमकी देण्यात आली आहे. त्यावर आम्हाला मारायाचं असेल तर मारुन टाका पण आम्ही गप्प बसणार नाही असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

12:38 (IST) 31 Jul 2023
‘चांदोबा चांदोबा…’ उद्या आकाशात दिसणार ‘सुपरमून’, पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; खगोलप्रेमींसाठी पर्वणी

अकोला : बालपणापासून मानवी जीवाला वेड लावणारा चंद्र रोज त्याच्या बदलत्या रुपांचे दर्शन देत असतो. १ ऑगस्टच्या मध्यरात्री व २ ऑगस्टला पहाटे आकाशात ‘सुपरमून’ अधिक मोठ्या प्रमाणात व चमकदार अशा स्थितीत असताना त्याचे हे आगळे-वेगळे स्वरूप दिसणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 31 Jul 2023
कल्याण डोंबिवली पालिकेचा कारभार ‘ऑटो मोड’वर सुरू; मनसे आ. प्रमोद पाटील यांची टीका

कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत खड्डेच काय. प्रशासनाचा एकूण कारभाराच धेडगुजरी पध्दतीने सुरू आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. या सगळ्या अराजकतेचे चटके खड्ड्यांच्या माध्यमातून नागरिकांना सोसावे लागत आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेचा एकूण कारभारच ऑटो मोडवर (स्वयंचलित ) सुरू असल्याची टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी रविवारी केली.

सविस्तर वाचा

12:29 (IST) 31 Jul 2023
जनसंपर्क, ब्रँडिंगसाठी विद्यापीठाकडून दहा लाखांची उधळपट्टी

पुणे: अमृत महोत्सवी वर्षात जनसंपर्क, समाजमाध्यमे, ब्रँडिंग चित्रफिती तयार करणे आदी कामांसाठी जनसंपर्क संस्था नियुक्त करण्यासाठीची निविदा विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे.

सविस्तर वाचा...

12:23 (IST) 31 Jul 2023
संभाजी भिडेंविरोधात विजय वडेट्टीवार यांची पोलिसांत तक्रार; चंद्रपुरातही काँग्रेस आक्रमक

चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली.

सविस्तर वाचा...

12:10 (IST) 31 Jul 2023
ठाकुर्ली रेल्वे स्थानकात दर सोमवारी एकच तिकीट खिडकी उघडी

डोंबिवली- ठाकुर्ली रेल्वे स्थानकात दर सोमवारी एकच तिकीट खिडकी सुरू राहत असल्याने प्रवाशांना रांगेचा मनस्ताप सहन करावा लागतो. कामावर जाण्याचा पहिलाच दिवस आणि त्यात रांगेत उभे रहावे लागत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.दर सोमवारी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात एक तिकीट खिडकीचा अनुभव प्रवासी घेत आहेत.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 31 Jul 2023
विट्यात कोण कोणाबरोबर?

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसत असून विट्यातील खासदार शरद पवार यांच्याशी निष्ठा व्यक्त केलेल्या माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गटच संभ्रमात दिसत आहे. ‘शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ अशी जाहीर भूमिका जयंत पाटील यांनी घेतली असताना विटा नगरीत वर्चस्व असलेल्या पाटील गटाने भाजप खासदार, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांना एका कार्यक्रमास खास निमंत्रित करून वेगळी दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

सविस्तर वाचा...

11:51 (IST) 31 Jul 2023
जळगाव आयुक्तांना सामाजिक संघटनांचे पाठबळ - अविश्वास ठराव मागे घेण्याची मागणी

जळगाव - ठेकेदारीची देयके निघत नाहीत, रस्त्यांची कामे होत नाहीत यांसह इतर विकासकामांना अडथळा येतो म्हणून प्रशासनाला दोषी धरून आयुक्तांविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत अविश्वास ठराव विशेष महासभेत आणण्याचे ठरविले आहे.

सविस्तर वाचा

11:44 (IST) 31 Jul 2023
जळगाव मनपा आयुक्तांविरोधात मंगळवारी अविश्वास ठराव ?

जळगाव - विकासकामे करण्यात दुर्लक्ष करीत असल्यामुळे आयुक्तांच्या बदलीसाठी महापालिकेतील सर्वपक्षीय सदस्य एकवटले आहेत. ५६ नगरसेवकांनी आयुक्तांच्या विरोधात अविश्वासाची हाक दिली असून, त्यासंदर्भात मंगळवारी विशेष महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

11:29 (IST) 31 Jul 2023
गडकरींनी सांगितले कार्यकर्त्याचे महत्त्व; म्हणाले, “सायकल कितीही चांगली असली तरी..”

नागपूर : निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांचे महत्त्व कळू लागले आहे. त्याला जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपाही त्याला अपवाद नाही. भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना नेत्यांना कार्यकर्त्यांचे महत्त्व समजावून सांगितले.

सविस्तर वाचा...

Rain Alert for State

मुसळधार पाऊस ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई ठाण्यात पावसाने रविवारी रात्री विश्रांती घेतली आहे. त्यानंतर पावसाच्या काही सरी मुंबई आणि ठाण्यात कोसळत आहेत. तर दुसरीकडे जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाला आहे. त्यासंदर्भातल्या बातम्या समोर येत आहेत.

Story img Loader