Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मुंबई आणि ठाणे भागात तुरळक पाऊस आहे. तर आजची सकाळ उजाडली ती गोळीबाराच्या बातमीने. जयपूर एक्स्प्रेसने एका आरपीएफ कॉन्स्टेबलने B 5 या डब्यात गोळीबार केला. या घटनेत एक ASI आणि इतर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे हे त्यांच्या महात्मा गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होते आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही. या आणि अशा सगळ्या महत्वाच्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Rain Today Live Update |Maharashtra News Live :संभाजी भिडे वक्तव्यावर ठाम, जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार आणि इतर महत्त्वाच्या बातम्या

11:29 (IST) 31 Jul 2023
कार्यकर्ते टिकवण्यासाठी ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो! राजकीय विवशतेबाबत नितीन गडकरींची कबुली

नागपूर : नेत्यांचे कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम हीच त्यांची संपत्ती आहे. पण, हे प्रेम सहजासहजी मिळत नाही. शरद पवारांकडे पाहून प्रत्येक कार्यकर्त्याला असे वाटते की त्यांनी मलाच सांगितले की कामाला लागा, मात्र तिकीट भलत्यालाच मिळते, अशी मिश्किल टिप्पणी नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर केली.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 31 Jul 2023
Go Back Mr Crime Minister: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याला युवक काँग्रेसकडून विरोध, पुण्यात बॅनरबाजी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौर्‍याला पुणे शहर युवक काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यात येत असून त्यांच्याकडून ‘गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर’ अशा आशयाचे फ्लेक्स शहरातील अनेक भागांत लागले आहेत.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 31 Jul 2023
वर्धा : भिडेंविरोधात गांधीवादी संतप्त, सुरू केले ‘प्रश्न विचारा’ आंदोलन

वर्धा : महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्याबद्दल मनोहर भिडे उर्फ कुलकर्णी यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. वर्धा जिल्ह्याची गांधी जिल्हा म्हणून ओळख आहे. म्हणून गांधी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची ही नैतिक जबाबदारी ठरते की त्यांनी अशा प्रवृत्तीचे तोंड बंद पाडले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण जिल्ह्यातील खासदार, आमदार याबद्दल एक शब्दही बोलत नाही, म्हणून प्रश्न विचारा, हे आंदोलन करीत असल्याचे भारतीय लोकशाही अभियान व जिल्हा सर्वोदय मंडळाने आज स्पष्ट केले.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 31 Jul 2023
नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये महत्त्व अबाधित

मुंबई : पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करीत दोन महिने सुट्टीवर जात असल्याचे जाहीर करणाऱ्या पंकजा मुंडे यांना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत सचिवपदी कायम ठेवण्यात आल्याने पक्षात त्यांचे महत्त्व अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात राज्यातील तावडे, मुंडे व रहाटकर यांचे स्थान कायम राहिले आहे.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 31 Jul 2023

नागपूर : नेत्यांचे कार्यकर्त्यावर असलेले प्रेम हीच त्यांची संपत्ती आहे पण, हे प्रेम सहजासहजी काही मिळत नाही. शरद पवार हे असे नेते आहेत ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक कार्यकर्त्याला असे वाटते की त्यांनी मलाच सांगितले की कामाला लागा, मात्र तिकीट भलत्यालाच मिळते, अशी मिश्किल टिप्पणी नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर केली.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 31 Jul 2023
“एक-एक करून काय फोडता, सगळेच घ्या”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर श्रीकांत शिंदेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही…”

भाजपा आणि शिंदे गटाने प्रत्येक आठवड्याला आमचा एक-एक माणूस फोडत राहावा. बिनकामी सगळी माणसे तुम्हाला घ्या, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर शनिवारी ( २९ जुलै ) केला होता. याला आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही काळजी करू नका एक-एक करून सगळेच आमच्याकडे येणार आहेत, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

वाचा सविस्तर…

11:22 (IST) 31 Jul 2023
VIDEO : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? एसी कोच अटेंडंटने सांगितला थरारक प्रसंग; म्हणाले, “जवान…”

जयपुरहून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये ( गाडी क्र. १२९५६ ) सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या धक्कादायक घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. यात एएसआयसह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफ जवानाला पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा सविस्तर…

11:21 (IST) 31 Jul 2023
महात्मा फुलेंसंदर्भात संभाजी भिडेंचा ‘यू टर्न’; अमरावतीमध्ये टीका अन् अकोल्यात अभिवादन

अकोला : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींसह महात्मा जोतिबा फुले यांच्यावरही खळबळजनक टीका केली होती. याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर दोनच दिवसात संभाजी भिडे यांनी यू टर्न घेतला.

सविस्तर वाचा

11:21 (IST) 31 Jul 2023
पंतप्रधानांचा दौरा: मध्यभागातील वाहतुकीत बदल; शाळा, दुकाने बंदबाबत संभ्रम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (१ मे)शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यभागात मोदी यांचे विविध कार्यक्रम आहेत. मध्यभागात शाळा, तसेच व्यापारी पेठ आहे. शाळा बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने निर्णय न घेतल्याने पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा

11:21 (IST) 31 Jul 2023
संभाजी भिडेंवर कारवाई करुन त्यांना तातडीने अटक करा-छगन भुजबळ

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत अत्यंत गलिच्छ वक्तव्य केलं आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे ? याचाही विचार करणं आवश्यक आहे आणि त्यांना तातडीने अटक केली पाहिजे अशी मागणी आता छगन भुजबळ यांनी केली आहे.

11:21 (IST) 31 Jul 2023
“देवेंद्र फडणवीसांच्या मनात आले म्हणून…”, ठाकरे गटाचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!

“फडणवीस सरकारने त्यांना काल क्लीन चिट दिली. या सर्व प्रकरणांची चौकशी कोणत्या तपास यंत्रणेने केली, हे समोर आलेले नाही!”

वाचा सविस्तर

11:20 (IST) 31 Jul 2023
“इतरांना JEE Advance चे गुण विचारू नका, जातीभेदाला खतपाणी मिळेल”, IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना सूचना!

जात, धर्म, लिंगाच्या आधारावर भेदभाव टाळण्यासाठी आयआयटी मुंबईनं विद्यार्थ्यांसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना!

वाचा सविस्तर

11:20 (IST) 31 Jul 2023
पावसाची विश्रांती! आता काही दिवस सूर्यनारायण डोकावणार

नागपूर: मागील दोन आठवडे पावसाने महाराष्ट्रात चांगलेच थैमान घातले होते. संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस आता पुढील काही दिवसांसाठी विश्रांती घेणार आहे.

सविस्तर वाचा…

11:00 (IST) 31 Jul 2023
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधे गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक, मृत्यू झालेले चार जण कोण?

जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सोमवारी अंधाधुंद गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या RPF कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. या घटनेत RPF च्या ASI सह चार जणांचा मृत्यू झाला.

या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून RPF ASI टीकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार ज्या RPF जवानाने केला त्याचं नाव चेतन असून त्याला अटक करण्यात आली आहे. गोळीबार केल्यानंतर त्याने उडी मारली. मात्र त्याला मीरा रोड ते बोरीवलीच्या दरम्यान अटक करण्यात आली. त्याची बंदुकही जप्त करण्यात आली.

मुसळधार पाऊस ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई ठाण्यात पावसाने रविवारी रात्री विश्रांती घेतली आहे. त्यानंतर पावसाच्या काही सरी मुंबई आणि ठाण्यात कोसळत आहेत. तर दुसरीकडे जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाला आहे. त्यासंदर्भातल्या बातम्या समोर येत आहेत.