राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला असून, याचबरोबर आता ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही दररोज वाढ सुरू झाली आहे. आज दिवसभरात राज्यात ११ हजार ८७७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५० ओमायक्रॉन बाधितही आढळले आहेत. याशिवाय ९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागणार आहे. राज्य सरकार देखील आता निर्बंध अधिकच कठोर करत असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या ५१० वर पोहचली आहे. सध्या राज्यातील अॅक्टीव्ह करोनाबाधित रूग्णांची संख्या ४२,०२४ आहे. याशिवाय राज्यात आज २ हजार ६९ रूग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाल आहे. आजपर्यंत राज्यात ६५,१२,६१० रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के आहे.

राज्यात आजपर्यंत आढळून आलेल्या एकूण करोनाबाधितांची संख्या ६६, ९९,८६८ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १४१५४२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर २.११ टक्के आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या ६,९२,५९,६१८ नमुन्यांपैकी आजपर्यंत ६६,९९,८६८ नमूने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २,४३,२५० जण गृह विलगिकरणात आहेत, तर १ हजार ९१ जण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.

मुंबईत मागील २४ तासात ८ हजार ६३ करोनाबाधित आढळले, तर ५७८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. याचबरोबर मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या ७,५०,७३६ झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण ९४ टक्के आङे. तर, अॅक्टिव्ह केसेसची संख्या २९८१९ आहे.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

राज्यात आज ५० नवीन ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी ३८ रूग्ण हे आयआयएसईआर येथे रिपोर्ट झाले आणि १२ रूग्ण एनसीसीएस येथे रिपोर्ट झाले आहेत. पुणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ३६ रूग्णांचा नोंद झाली आहे. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये ८, पुणे ग्रामीण – २, सांगली-२, ठाणे -१, मुंबई- १ असे रुग्ण आढळून आले आहेत.

आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या ५१० झाली असून, या पैकी १९३ जणांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 11 7 new corona cases and 50 patients with omicron infection have been reported in the state today msr
Show comments