राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे. राज्यात आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा जवळपास दुप्पट रूग्ण करोनातून बरे झाल्याचे समोर आले आहे. मागील २४ तासात राज्यभरात १५ हजार २७७ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ७ हजार ६०३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, राज्यात ५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,२७,७५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.१५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४१,८६,४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,६५,४०२ (१३.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८२,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,०८,३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातून करोना लाट ओसरेना?; जुलैच्या पहिल्या १० दिवसात राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी

करोनाची दुसरी लाट येऊन सहा महिने पूर्ण होत असतानाही अद्याप महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या १० दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या १० दिवसांत तब्बल ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत.

Story img Loader