स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून गुरुवारी (१८ जानेवारी) ४२ हजार ८२५ कोटींचे करार होणार आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (१७ जानेवारी) समाजमाध्यमांतून दिली. याव्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले आहेत. या करारांमुळे राज्यात दोन लाख रोजगारांची निर्मिती होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे जानेवारी रोजी सहा उद्योगांसमवेत एक लाख दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारी रोजी आठ उद्योगांशी दोन लाख आठ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून एक लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. गुरुवारी, सहा उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती आणि रोजगार

१६ जानेवारी

आयनॉक्स एअर प्रोडक्ट – २५ हजार कोटी (५ हजार रोजगार), बी. सी. जिंदाल ४१ हजार कोटी (५ हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील – २५ हजार कोटी (१५ हजार रोजगार), एबी इन बेव्ह – ६०० कोटी (१५० रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट – १००० कोटी (६५० रोजगार) अमेरिका स्थित डेटा कंपनी – १० हजार कोटी (२०० रोजगार)

१७ जानेवारी

अदानी ग्रुप – ५० हजार कोटी (५०० रोजगार), स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स – १,१५८ कोटी (५०० रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क – ५० हजार कोटी (१ लाख रोजगार), वेब वर्क्स ५ हजार कोटी (१०० रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस, इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून ३,५०० कोटी (१५ हजार रोजगार), नैसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी २० हजार कोटी (४ हजार रोजगार)

महाप्रीतने हरित उर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचे करार केले.

अमेरिकास्थित प्रेडीक्शन्स समवेत ४ हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जीने ८ हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जीने ४० हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत ४ हजार कोटी रुपयांचे करार केले.

Story img Loader