महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवल्यानंतर राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी राहुल नार्वेकरांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १४ आमदारांना ही नोटीस जारी केली आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

आमदरांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार अध्यक्षांना

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यावर निर्णय घेऊ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही प्रत त्यांना पाठवली आहे.

Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Decision to pay salaries of municipal employees and officers based on biometric attendance
वेळ पाळा, तरच पूर्ण वेतन! का घेण्यात आला हा निर्णय ?
high court ordered election notification in one month and imposed restrictions on Chandrapur District Banks board
हायकोर्टाच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ नामधारी; एक महिन्यात…
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Dr Baba Adhav demand for strict implementation of the Constitution
राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी

राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये

राहुल नार्वेकर हे आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतं आहे. त्यांनी शिवसेनेला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नोटीस बजावली आहे. शिवसेनच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एकमेकांच्या आमदारांच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला आहे. यावेळी आमदारांना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे.

Story img Loader