करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत राज्यातल्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे, तो म्हणजे ९९.८४ टक्के. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात आलं. त्यापैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.

लाईव्ह अपडेट्ससाठी वाचा- Maharashtra SSC Result 2021 Live : दहावीचा निकाल ९९.९५ टक्के

राज्यातल्या इतर विभागांचा निकाल खालीलप्रमाणे (निकालाची टक्केवारी)-  पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर ९९.९६, कोकण १००.

नक्की पाहा >> Viral Memes : ९९.९५ पास… अरे निकाल आहे की डेटॉल? ती ०.०५ पोरं नापास झालीच कशी?

राज्यातल्या एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत हा निकाल ४. ६५ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाणून घ्या – Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ssc result 2021 updates press conference total result of ssc in percentage vsk