राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेसकडूनही उमेदवार उभा केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता नव्या राष्ट्रपतींची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. विरोधकांकडूनही उमेदवार देण्यास उशीर झाल्याने भाजपा हा प्रयत्न करताना दिसत आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाला धमकीची चिठ्ठी मिळाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरेंनी फेसबुकवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राजकारणामध्ये काम करताना कोण कधी वैरी होतो हेच समजत नाही असं भावनिक वक्तव्य करतानाच वसंत मोरेंनी नेमकं काय घडलं आणि ही चिठ्ठी रुपेश मोरेंना कधी सापडली याबद्दलचा तपशील पोस्टमध्ये मांडलाय.
महाराष्ट्राला शूरवीरांचा गौरवशाली इतिहास लाभला असून अनेक महापुरुषांनी महाराष्ट्र घडविला आहे. अशा या महाराष्ट्राचा आणि शूरवीरांचा, महापुरुषांचा, नेत्यांचा गौरवशाली इतिहास आता राज्यातील विविध पर्वतरांगांवर शिल्पाच्या रुपात मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पर्वतरांगांवर इतिहास जतन करण्याची ही अनोखी संकल्पना मांडली आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे तसेच सविस्तर आराखडा तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा विविध घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट
जवळपास सर्व महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पाऊस दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत पाऊस होत नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. अशातच आता मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. सध्या कोकण विभागात हलक्या पावसाला सुरुवात झाली असून, दोन दिवसांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांतही पाऊस जोर धरणार असून, मराठवाडा, विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२साठी अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यासाठी एमपीएससीने अर्ज सादर करण्यास २४ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एमपीएससीने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वाचा सविस्तर बातमी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बारामती येथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. ‘बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान केंद्र उभारण्यात आलं आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोहित पवार यांनी अदानींचं सारथ्य केल्याने भाजपाकडून टीका होत आहे. भाजपाच्या या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.
गौतम अदानींसाठी 'ड्रायव्हर' झाल्याची टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले "आम्ही खुल्या पद्धतीने…" https://t.co/HSTpwEY2Eu @RRPSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra #GautamAdani Gautam Adani
— LoksattaLive (@LoksattaLive) June 17, 2022
औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करतांना कोणत्याही अडचणी येणार नाही, याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार आहे असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर बातमी…
विवाहाच्या आमिषाने एका शिक्षिकेची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत शिक्षिकेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार सुशीलकुमार दुबे (रा. दिल्ली), विजया रेखीश्वर चेतिया (रा. आसाम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकेच्या पतीचे निधन झाले होते.
राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे काम करणारे मजूर जेसीबीमध्ये झोपले असतांना मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे जेसीबी नाल्यात कोसळले. त्यातील चार मजूर पाण्यात अडकले. स्थानिकांच्या मदतीने तीन मजुरांना वाचवण्यात यश आले तर एक १८ वर्षीय मजूर वाहून गेला.

महापालिका क्षेत्रात करोना तसेच साथ रोग नियंत्रणासाठी पालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या असून त्याचबरोबर ठाणेकरांना पावसाळयात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
यंदाच्या वर्षीचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात ९७.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, जिल्ह्यातील ६४१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजेच १३१ शाळांचा समावेश आहे.
गोंदियात दोन मजुरांच्या अपघाती मृत्यूनंतर संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. यात पोलीस अधिकारी व काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस आंदोलक सुरु असताना पांगवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
हिंमत असेल तर समोरासमोर या, आपण दोघेही ईडीच्या चौकशीला जाऊ. पहिली चौकशी माझी होऊ द्या असे खुले आव्हान उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता दिले आहे. “माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करता, पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. मंत्री, संत्री कोण काय बोललं मला माहित नाही. खंडणी, टक्केवारीची भाषा करता, पण हिंमत असेल तर समोरासमोर ईडीच्या चौकशीला आपण दोघेही सामोरे जाऊ. पहिली चौकशी माझी होऊ द्या,” असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
देशात गुन्हेगार महत्वाचे आहेत काय, पोलीस नाही काय?, असा प्रश्न विचारत बिटरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत जमादाराने आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. विष्णू सखाराम कोरडे (५४) असे मृत पोलीस जमादाराचे नाव आहे. कोरडे यांनी आपल्या आत्महत्येस जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप मृत्यूपूर्व चिठ्ठीत केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून संताप व्यक्त केला आङे. विरोधकांना नोटीसा पाठवताना जी तत्परता दाखवली जात आहे, तिच तत्परता हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दाखवणार आहात काय? असा सवाल नितेश राणे यांनी पत्रातून केला आहे. सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीने राज्य चालते. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो अशी झाली आहे अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.
"सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर…," नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

"अन्यथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठरावीक पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांसाठी आहे की काय? असा संदेश जनमानसात दृढ होईल"https://t.co/LqrQhu2Mhn @NiteshNRane @BJP4Maharashtra @OfficeofUT
दगडफेक तसेच वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या टोळी विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी एका विरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी तरुण सुनील रॉय (रा. आर्च स्मिथ सोसायटी, धानोरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राॅय याची पीडीत महिलेची ओळख झाली होती.
यंदा दहावीच्या परीक्षेत पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के लागला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील १ लाख २८ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पुणे विभागातील पाच विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले.करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कठडे ओलांडून जाण्याच्या प्रयत्न करणारे काँग्रेस कार्यकर्ते आणि त्यांना थांबवणारे पोलीस यांच्यात धक्काबुकी झाली. यामध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांच्यासह दोन कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. नागपूर विभागाचा निकाल ९७ टक्के लागला. यामध्ये नागपूर जिल्हा ९७.९३ टक्क्यांसह विभागात पहिला आला तर सर्वात कमी निकाल (९५.६२टक्के) गडचिरोली जिल्ह्याचा आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी तसेच दुचाकी चोरीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून दागिने, तीन दुचाकी असा चार लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९६.८१ टक्के लागला असून नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावतीचे स्थान सातवे आहे.
दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९७.१३ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील विविध भागांमधून यंदाच्या वर्षी १ लाख १७ हजार १८३ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख १३ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात सुमारे दोन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५ व्या समाधी संजीवन वर्षानिमित्त व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त आळंदीत अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील संत भगवानबाबा मंगल कार्यालयात शनिवारी (१८ जून) व रविवारी (१९ जून) हे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पाऊस धारा कोसळतील, असे भाकीत हवामान विभागाने केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बारामती येथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. ‘बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान केंद्र उभारण्यात आलं आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोहित पवार यांनी अदानींचं सारथ्य केल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांच्या या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. सलग तिसऱ्या दिवशी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुण आंदोलन करत असून यावेळी ट्रेनला आग लावण्यात आली. ट्रेनला आग लावण्यात आल्यानंतर इतर डब्यांना आग लागू नये यासाठी पोलीस हाताने डबे ढकलत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. तरुणांच्या असंतोषामुळे केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेत या योजनेंतर्गत वयोमर्यादा २३ वर नेली आहे. मात्र यानंतरही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक रस्त्यावर उतरले असून ट्रेनला आग लावली आहे.
नॅशनल हेराल्डशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान तीन दिवस सलग चौकशी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ईडीकडे २० जूनपर्यंत चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली. ईडीने राहुल गांधी यांची विनंती मान्य केली आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रुपये देण्यासंबंधी नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आयोजित इंडस्ट्रियल डेकार्बोनायझेशन समिटमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पार्किंग ही फार मोठी समस्या असल्याचं सांगितलं. दरम्यान नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्य उपहासात्मकपणे होतं की खरंच गांभीर्याने विचार सुरु आहे याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही.
पुण्यात मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणाने मित्राशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले तसेच ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणासह त्याचे मित्र, आई आणि बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जलदगती बससेवेसाठीच्या (बस रॅपीड ट्रान्सपोर्ट- बीआरटी) मार्गातून मोठ्या प्रमाणावर होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी बीआरटी स्थानकांवर स्वयंचलित बूम बॅरिअर्स बसविण्यात आले आहेत. बीआरटी मार्गातील प्रवास वेगाने आणि विनाअडथळा होण्यासाठी विविध मार्गांवर १४८ ठिकाणी बूम बॅरीअर्स बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी बॅरिअर्सला कॅमेरे बसविण्यात आले असून खासगी गाड्यांचे क्रमांक त्याद्वारे कळणार आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या खासगी वाहनांवरील कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.