महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत ही परीक्षा झाली होती. फेरपरीक्षेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थांना पुनर्मुल्यांकन करता येईल. तसेच विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेशही घेता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव लागेल. या दोन्हींशिवाय निकाल पाहता येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेत २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५०, ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार १६१ एवढी आहे.

मार्चमधील परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या किंवा श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मंडळाने शुक्रवारी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

निकालासाठीची संकेतस्थळे

mahresult.nic.in
maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल आणि प्रिंट आऊटही घेता येईल.

असा पाहा निकाल –
वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ssc supplementary exam result declared nck