राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. आज दिवसभरात १० हजार ३५३ जणांनी करोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.०२ टक्के इतकं झालं आहे. त्याचबरोबर राज्यात आज ९ हजार ७७१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोनाबाधिक रुग्णांची एकूण संख्या ६० लाख ६१ हजार ६०४ इतकी झाली आहे. तर करोनामुळे १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.०१ टक्के इतका आहे. राज्यात १ लाख १६ हजार ३६४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात ६ लाख १७ हजार ९२६ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ४ हजार १७३ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईतही करोना रुग्ण संख्येत कमालीची घट होत आहे. गेल्या २४ तासात ६९२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण आकडा ६ लाख ९६ हजार १०५ इतका झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण हे ९६ टक्के आहे. सध्या मुंबईत ८ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ७१६ दिवसांवर पोहोचला आहे. २३ जून ते २९ जूनदरम्यान कोविड रुग्ण वाढीचा दर हा ०.००९ टक्के इतका होता. ठाण्यात (१६, ११५), पालघर (१,४१८), पुणे (१७,४०७), कोल्हापूर (११,४४४), नाशिक (३,४९४), औरंगाबाद (१,३००), नागपूर (३,००३) करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
#CoronavirusUpdates
३० जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ६९२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ६८०
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९६१०५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%एकूण सक्रिय रुग्ण- ८३५१
दुप्पटीचा दर- ७१६ दिवस
कोविड वाढीचा दर ( २३ जून ते २९ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 30, 2021
देशात मंगळवारी ३६ लाख ५१ हजार ९८३ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यापैकी २७ लाख ४२ हजार ६३० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ९ हजार ३५३ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३३ कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ वर पोहोचली आहे.