राज्यात करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी भीती कायम आहे. त्यामुळे अजूनही काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. आज ९ हजार ३५६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत ६१ लाख ३९ हजार ४९३ बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.७२ टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे आज राज्यात ६ हजार ६१ नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात ७१ हजार ५० रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या ४ लाख ३१ हजार ५३९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर २ हजार ७६१ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९३ लाख ७२ हजार २१२ नमुन्यांपैकी ६३ लाख ४७ हजार ८२० जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे १२.८६ टक्के इतकं आहे. शनिवारी १२८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के इतका आहे.

मुंबई शनिवारी ३३१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तर ४७३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आहे ७ लाख १४ हजार ६३९ इतका झाला आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. सध्या मुंबईत ४ हजार १९६ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर १ हजार ६४२ दिवसांवर पोहोचला आहे. ३१ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत कोविड वाढीचा दर हा ०.०४ टक्के इतका होता.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

केंद्र सरकारने Johnson and Johnson च्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे. त्यामुळे आता भारताकडे करोनाविरोधात एकूण ५ लसी असणार आहेत. याआधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यासंदर्भात ट्विटरवरून घोषणा केली आहे. “भारतानं आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात करोनाविरोधात ५ लसीचा परवानगी आहे. यामुळे देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल”, असं ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.