राज्यात करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी भीती कायम आहे. त्यामुळे अजूनही काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. आज ९ हजार ३५६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत ६१ लाख ३९ हजार ४९३ बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.७२ टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे आज राज्यात ६ हजार ६१ नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात ७१ हजार ५० रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या ४ लाख ३१ हजार ५३९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर २ हजार ७६१ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९३ लाख ७२ हजार २१२ नमुन्यांपैकी ६३ लाख ४७ हजार ८२० जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे १२.८६ टक्के इतकं आहे. शनिवारी १२८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के इतका आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा