कराड : शिवसंग्राम संघटनेचे सर्वेसर्वा माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर गेली दोन वर्षे शिवसंग्राम संघटना मी टिकवून ठेवली. मात्र, मेटे कुटुंबीयांनी संघटना वाटून घेतल्याचा आरोप करीत ‘शिवसंग्राम’चे प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी त्यांच्या ‘स्वराज्य संग्राम’ या नव्या संघटनेची घोषणा केली.

कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित बानुगडे, अनंत देशमुख, विक्रांत आम्रे यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. ‘शिवसंग्राम’च्या कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नसल्यानेच नवी संघटना उभारत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, की शिवसंग्राम संघटना २००१ मध्ये स्थापन झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यात संघटनेचे लाखो कार्यकर्ते आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर ही संघटना बांधून ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला. मात्र, अलीकडे मेटे कुटुंबीयांनीच शिवसंग्राम संघटना वाटून घेतल्याने सोबतच्या कार्यकर्त्यांसाठी ‘स्वराज्य संग्राम’ संघटनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. ही संघटना गौरवशाली ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी दिला.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ajit Pawar Sabha Mohol, Ajit Pawar news,
अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Protest against obscene remarks of BJP leader Pasha Patel in Karjat Jamkhed by burning effigy
भाजप नेते पाशा पटेल यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये महिलांचा एल्गार, पुतळा जाळून निषेध
mahayuti will win 160 seats in maharashtra assembly election 2024
पदाची लालसा नाही!‘लोकसत्ता’च्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
eknath shinde challenge to mahavikas aghadi,
“तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर येऊन चर्चा करा”; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!

हेही वाचा : Kiran Mane Post : “अफजलखान असो वा कृष्णा… औरंग्या असो वा…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत!

देशात समान नागरी कायदा लागू करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक समुद्रामध्ये उभारावे, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे, शेतकरी वाचविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करावी, वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालावा, यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत. किल्ले रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराची होत असलेली पडझड थांबवण्यासाठी मंदिराची डागडुजी अथवा जीर्णोद्धार करण्यात यावा. कंत्राटी भरती थांबवून कायमस्वरूपी भरती करावी. सारथी संस्थेची व्याप्ती वाढवून सर्व विभागांत काम सुरू करावे. महिलांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी कायमस्वरूपाच्या योजना आखाव्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने थेट कर्ज योजना सुरू करावी, अशा प्रकारची भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम संघटना सर्वदूर कार्यरत राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : रायगडात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली,जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ३ हजार २९५ मिमी पावसाची नोंद

पंढरपूरला पहिले अधिवेशन

स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन पंढरपूरला १५ सप्टेंबर रोजी होणार असून, त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येतील. आणि त्यात संघटनेची पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे तानाजी शिंदे यांनी सांगितले.