तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व अरुणाचल प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अरुणाचल येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण साळुंखे (आयपीएस) व सहसचिव सुभाष पाटील (पनवेल) यांनी जाहीर केलेला महाराष्ट्र राज्याचा मुला-मुलींचा तायक्वांडो संघ अरुणाचलला रवाना झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तायक्वांडो पंच, पनवेलस्थित कर्नाळा स्पोर्टस असो.चे तथा न्यू होरायझन पब्लिक स्कूलचे प्रशिक्षक सुभाष पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राचा जाहीर करण्यात आलेला मुला-मुलींचा संघ असा- ४५, ४८, ५१, ५५, ५९, ६३, ६८, ७३, ७८ किलो वजनाखालील व ७८ किलो वजनावरील गटांत निवड झालेल्या तायक्वांडोपटू मुलांची नावे अनुक्रमे अशी- तेजस माळी (रायगड), संकेत फगे (रत्नागिरी), शुभम बनकर (बीड), हर्षल बोरसे (पुणे), आदित्य येनपुरे (पुणे), मयूर जोग (मुंबई उपनगर) सूरजसिंग (औरंगाबाद), चिन्मय पाध्ये (रत्नागिरी), योगेश वायाल (मुंबई उपनगर) व अमोल विभुले (सांगली). मुलांच्या संघाच्या प्रशिक्षकपदी सचिन माळी (रायगड) व व्यवस्थापकपदी जयदीप कदम (मुंबई उपनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ४२, ४४, ४६, ४९, ५२, ५५, ५९, ६३, ६८ किलो वजनाखालील व ६८ किलो वजनावरील गटात निवड झालेल्या तायक्वांडोपटू मुलींची नावे अनुक्रमे अशी- अनुजा पाठक (पुणे), ईश्वरी चंदक (पुणे), शिवानी पाटील (बीड), करुणा पाटील (कोल्हापूर), श्रेया शेट्टी (मुंबई उपनगर)- प्रियांका धुमाळ (पुणे), स्नेहा भट (पुणे), सोनल कानडे (पुणे), ऐश्वर्या रावडे (पुणे) व पूजा राणे (पुणे). मुलींच्या संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापकपदी अनुक्रमे लाला भिंगारे (पुणे), ममता बहादूर (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी राज्याच्या मुला-मुलींच्या संघाला कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी पनवेल येथे दहा दिवसांचे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणारे विजेते तायक्वांडोपटू आगामी एशियन तायक्वांडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, असा खुलासा सुभाष पाटील यांनी शेवटी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा