Maharashtra News Updates Today, 27 May 2022: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि संजय पवार या दोघांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची भूमिका निर्णयाक ठरणार आहे. या संदर्भातील भूमिका संभाजीराजे छत्रपती आज स्पष्ट करणार आहेत. तर दुसरीकडे ईडीने शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर कारवाई केली असून छापे टाकल्याच्या मुद्यावरुन राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचे पडसादही आज उमटण्याची शक्यात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनस्र्थापित करण्यासाठी समर्पित आयोगाचा सांख्यिकी अहवाल तसेच इतर बाबींची लवकर पूर्तता करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिल्यात. कर्नाटकातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शीवकुमार यांच्याविरोधात गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. तर दिल्लीमधील आयएएस अधिकाऱ्याने कुत्रा फिरवण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढल्याच्या प्रकरणावरुन कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. तर तिकडे शेजराच्या पाकिस्तानमध्ये हिंसक आंदोलन सुरु असतानाच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदी सरकारवर स्तृतीसुमनं उधळताना इंधनदर कपातीच्या निर्णयाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये गेले पाच दिवस रखडलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर सहाव्या दिवशी भारतभूमीच्या दिशेने आगेकूच सुरू केली. पुढील ४८ तासांत मोसमी वारे आणखी प्रगती करतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates: राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या
नागपूरमध्ये राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस हनुमान चालिसा पठणावरून आमनेसामने येताना दिसत आहे. राष्ट्रवादीने नागपूरच्या ज्या मंदिरात ज्या दिवशी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याच दिवशी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा देखील हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यासाठी दोन्ही गटांकडून पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली.
“छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजांना माहिती आहे. सर्वांनी छत्रपती संभाजी राजांचा ठरवून गेम केला,” अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
लग्नाच्या वऱ्हाडासोबत आलेल्या दोन सख्ख्या भावांसह तीन मुलांचा अंघोळीसाठी उतरलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२७ मे) सकाळी जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द गावात कोल्हापुरी बंधाऱ्यावर घडली.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना छातीत दुखू लागल्यामुळे केईएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्यांचा रक्तदाब वाढला असून त्यांची लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आयसीस ( ISIS ) या जिहादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी परभणीतील २९ वर्षीय तरुणाला एनआयएच्या विषेश न्यायालयाने ७ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे.
लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची गाडी दरीत कोसळ्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर अन्य जवान जखमी झाले आहेत. या गाडीत एकूण २६ जवान प्रवास करत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आजच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाला. विद्यापीठ परिषदेचे सदस्य, उस्मानाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर यांना काळे फासण्यात आले. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निंबाळकर यांना काळे फासले आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाने चार वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.
आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात सूचक ट्वीट करण्यात आलं आहे. “आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर पाच जणांना या प्रकरणात आता क्लीनचिट मिळाली आहे. त्यामुळे आता एनसीबी समीर वानखेडे, त्यांची टीम आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीविरोधात कारवाई करेल का? की गुन्हेगारांना ते पाठिशी घालतील?” असा सवाल या ट्वीटमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली. एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळली आहेत. तसेच या प्रकरणी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली आहे. एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले नाही.
भिवंडी येथील अक्सा उपाहारगृह परिसरात भररस्त्यात नागरिकांमागे सुरा घेऊन धावणाऱ्या इरफानला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. इरफानला ताब्यात घेत असताना त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की केली. तर, त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात येऊन आरडाओरड करत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणात दोघांविरोधातही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मैं यहाँ का दादा हूँ, किसी को नही छोडूँगा’, भिवंडीत दाम्पत्याचा हैदोस, सुरा घेऊन मागे लावल्याने लोकांची धावपळ https://t.co/huZGH19SUq Thane Bhiwandi
— LoksattaLive (@LoksattaLive) May 27, 2022
शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा नाकारल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. संभाजीराजे काय भूमिका घेणार? याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यातच आज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ही राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच, यापुढे ‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून मावळ्यांना, गोरगरीब समाजघटकांना एकत्र करण्यासाठी मी मोकळा झालो आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली असून शिवसेनेवर टीका केली आहे.
संभाजीराजेंनी माघार घेतल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले "पक्षाच्या नावात 'शिव' वापरायची लायकी…" https://t.co/o1cVV08Vau @YuvrajSambhaji @mnsadhikrut @RajThackeray @GajananKaleMNS #SambhajiRajeChatrapati

राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. “ज्या आमदारांनी ड्राफ्टवर सह्या केल्या, त्या आमदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. त्यांनी केव्हाही हाक द्यावी. शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्षात प्रवेश करा आणि खासदार व्हा. पण मी सांगितलं होतं की मी जाणार नाही.
संभाजीराजे म्हणतात, "शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पण मी सांगितलं…!" #Maharashtra #ShivSena #SambhajirajeChhatrapati https://t.co/biE7HRPOux

लोकलमध्ये चढताना, फलाटावरील प्रवाशांचे भुरट्या चोरांनी चोरलेले मोबाईल उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये विकले आहेत. तांत्रिक माहितीच्या आधारे कल्याण, ठाणे येथील लोहमार्ग पोलिसांच्या पथकांनी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये जाऊन चोरीचे आठ लाख ५८ हजार रूपये किमतीचे ५२ मोबाईल जप्त केले आहेत.
लोकलमध्ये चढताना प्रवाशांचे मोबाईल चोरुन उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये विक्री; रेल्वे पोलिसांनी केली मोठी कारवाई

चोरीचे आठ लाख ५८ हजार रूपये किमतीचे ५२ मोबाईल जप्तhttps://t.co/O497g4MYiM
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल झाले आहेत. नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांना दोन दिवस विश्रांतीसाठी रुग्णालयात ठेवलं जाऊ शकतं.
भाजपा नेते नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल https://t.co/iQXDPzXisM Narayan Rane #NarayanRane

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस. आपल्या कामाबरोबरच मनमिळवू स्वभावामुळे सर्वपक्षीय मित्रपरीवार आहे. मागील काही काळापासून भाजपा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरु असल्याने दोन्ही पक्षांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र आज हे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नितीन गडकरींबद्दल भाष्य केलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला अहमदनगर प्रशासन परवानगी देत नसल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
"बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्या मनगटात…," पडळकर ठाकरे सरकारवर संतापले; म्हणाले "अन्यथा संघर्ष अटळ" https://t.co/gp1ukkaUOg @GopichandP_MLC

पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी तेथील सर्व स्टॉल आणि गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली. अजित पवारांनी राजकारणात येण्यापूर्वी शेती आणि दूध उत्पादक म्हणून काम केल्याचं अनेकवेळा भाषणातून सांगितलं आहे. आज त्याची प्रचिती येथील अधिकारी वर्गाला पाहण्यास मिळाली.
"काटेवाडी आणि बारामतीमधला माझा गोठा येऊन पहा"; अजित पवारांकडून अधिकारी वर्गाची कानउघाडणी
— Shivraj Yadav | शिवराज यादव ???️ (@shiva_shivraj) May 27, 2022
"तुम्ही अधिकार्यांनी मला बोलवताना दहावेळा विचार करा. मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन"@NCPspeaks @AjitPawarSpeaks pic.twitter.com/h2LO0wKVIC
शिवसेना हाच ध्यास आणि श्वास असे व्यक्तिमत्व असलेले सामान्य शिवसैनिक म्हणजे संजय पवार. शिवसेनेने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देवू करून सामान्य शिवसैनिकांचा गौरव केला आहे. गेली ३४ वर्षे एकनिष्ठ राहून सेनेचा भगवा उंचावण्यासाठी प्राणपणाने लढणारे पवार यांना आजवर शिवसेनेने लोकप्रतिनिधी होण्याची संधी दिली नव्हती. आता थेट त्यांना नवी दिल्लीत खासदार म्हणून पाठवण्याची तयारी केली असल्याने सामान्य शिवसैनिकांना ही हुरूप चढला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
रेल्वे पोलिसांच्या ठाणे पथकाने नांदेडहून मुंबईत येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून एक कोटीची रोख रक्कम आणि नऊ लाख रूपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. एक्स्प्रेसमधून प्रवासी म्हणून प्रवास करत असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय घमासान सुरु असताना इंधनाच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारने सर्वसामान्यांना झटका देत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीलिटर ३० रुपयांनी वाढवले आहेत. हे दर रात्रीपासून लागू झाले आहेत. यानंतर इस्लामाबादमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत १७९ रुपये ८६ पैसे झाली असून डिझेलसाठी १७४ रुपये १५ पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय केरोसिनच्या किंमतीतही ३० रुपयांनी वाढ झाली असून दर १५५ रुपये ५६ पैसे झाला आहे.
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढ झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे तर दुसरीकडे भारत सरकारचं कौतुक केलं आहे.
मोदी सरकारने केलेल्या इंधन दरकपातीचं इम्रान खान यांच्याकडून कौतुक; म्हणाले, "आता आपल्या देशाला…"

पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक इंधन दरवाढhttps://t.co/7WaalcpeJh #Pakistan #petrolPrice #Petrol #PetrolDieselPriceHike #ImranKhan @ImranKhanPTI
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाली असल्याने उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक १५ ते २० मिनिटाने सुरु आहे. ठाणे ते कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस. आपल्या कामाबरोबरच मनमिळवू स्वभावामुळे सर्वपक्षीय मित्रपरीवार असणाऱ्या नितीन गडकरींची भाषणं ही विषेश गाजतात. राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा किस्से आणि मजेदार गंमतीजमती सांगत गडकरी अनेक कार्यक्रमांमध्ये लक्ष वेधून घेताना दिसतात. करोना कालावधीमध्येही नितीन गडकरींनी युट्यूबवरुन वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांची युट्यूबवरील भाषणंही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतात. मात्र ते या युट्यूबवरील भाषणांमधून किती कमाई करतात हे जाणून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. यासंदर्भात त्यांनीच साधारणपणे वर्षभरापूर्वी खुलासा केला होता. येथे वाचा सविस्तर वृत्त
दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये गेले पाच दिवस रखडलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर सहाव्या दिवशी भारतभूमीच्या दिशेने आगेकूच सुरू केली. पुढील ४८ तासांत मोसमी वारे आणखी प्रगती करतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनस्र्थापित करण्यासाठी समर्पित आयोगाचा सांख्यिकी अहवाल तसेच इतर बाबींची लवकर पूर्तता करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिल्या. येथे वाचा सविस्तर वृत्त
राजधानी दिल्लीमध्ये आयएएस अधिकाऱ्याने पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांना स्टेडियम सोडण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण या आयएएस अधिकारी असणाऱ्या दांपत्याला महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारित येणाऱ्या गृहखात्याने या प्रकरणातील आयएएस दांपत्याची बदली केली आहे. येथे क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर वृत्त
राज्य परिवहन मंडळाची भुसावळ-बोईसर मार्गावरील एसटी बस पालघरच्या वाघोबा खिंडीत आज सकाळी सहाच्या सुमारास उलटी आहे. या अपघातामध्ये किमान १५ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता