Maharashtra News Updates, 05 June 2022 : गेल्या काही दिवसांपासून दररोज दुपटीने वाढणारी करोना रुग्णसंख्या आणि उपचाराधीन रुग्णसंख्येचा चढता आलेख यामुळे राज्याच्या आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून राज्यभर दक्षतेच्या सूचना देण्याबरोबरच नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.  

तर काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडित आणि हिंदुंना लक्ष्य करत त्यांचे हत्याकांड काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

22:58 (IST) 5 Jun 2022
विदर्भासह राज्यभर पावसाळापूर्व काहिली, सोमवारपासून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या महाराष्ट्रातील प्रवेशाची प्रतीक्षा सुरू असतानाच राज्यभरात तापमानाचा पारा वाढून पावसाळापूर्व काहिली निर्माण झाली आहे. उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भासह आता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारपासून राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

22:57 (IST) 5 Jun 2022
विवाहित महिलेसोबतचे प्रेमसबंध जिवावर बेतले, पहिल्या प्रियकराकडून युवकाची हत्या

अमरावती : एका विवाहित महिलेचा दोन युवकांशी असलेल्या अनैतिक सबंधाचा शेवट एका ३२ वर्षीय युवकाच्या हत्येत झाला. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांगापूर फाट्याजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली. युवकाच्या हत्येनंतर आरोपीने स्वत:वर चाकूचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

22:56 (IST) 5 Jun 2022
कोल्हापूरमध्ये मोटार दरीत कोसळून भीषण अपघात, दोन तरूणांचा मृत्यू, तर दोघे जखमी

कोल्हापूरमध्ये मोटार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले. जखमींना सीपीआर जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

19:58 (IST) 5 Jun 2022
सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

18:24 (IST) 5 Jun 2022
प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपाने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना केलं निलंबित

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर भाजपानं मोठी कारवाई केली आहे. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्येतेतून निलंबित करण्यात आलं आहे. नुपूर शर्मा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथितपणे अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कानपूर याठिकाणी दंगल देखील उसळली होती. सविस्तर बातमी

17:47 (IST) 5 Jun 2022
"आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काय काम केले?", अजित पवारांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

उपमुख्यमंत्री अजित पवार विकास कामांमधील गुणवत्तेबाबत आग्रही असल्याचं नेहमीच दिसतं. असाच अनुभव पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हिलियन इमारत, अद्यावत सिंथेटिक ट्रॅक व इनडोअर हॉल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात आला. हॉलच्या सिलिंगच्या उंचीत त्रुटी दिसताच अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. तसेच आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काय काम केलं अशी विचारणा केली.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

17:46 (IST) 5 Jun 2022
केंद्र सरकार नवनीत राणा यांना सुरक्षा देऊ शकते, तर मग काश्मिरी पंडितांना का नाही? : डॅा. नीलम गोऱ्हे

"गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत. केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांसाठी पुकारलेली घरवापसी मोहीम पूर्णपणे अपयशी झाली आहे. नवनीत राणा व रवी राणा यांना झेड सुरक्षा दिली जाते. हीच सुरक्षा काश्मिरी पंडितांना का देण्यात आली नाही?" असा प्रश्न विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विचारला.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

17:42 (IST) 5 Jun 2022
"राज्यात २ लाख ३४ हजार नागरिकांमागे एक रूग्णालय", श्रमजीवी संघटनेचा दावा

राज्यात प्रत्येकी २ लाख ३४ हजार नागरिकांमागे केवळ एक रुग्णालय तर आरोग्य विभागात २० हजारहून अधिक पदे रिक्त असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केला आहे. श्रमजीवी संघटनेने काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांना अचानक भेट दिली. तसेच संपूर्ण राज्याच्या आरोग्य विभागावरील एक अहवाल श्रमजीवी संघटनेने केला आहे.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

17:41 (IST) 5 Jun 2022
रविवारीही शीळफाटा वाहन कोंडीत, काटई ते देसाई पाच मिनिटांच्या अंतरासाठी प्रवाशांची पाऊण तास रखडपट्टी

डोंबिवली- रविवारी कार्यालयांना सु्ट्टी असते. त्यामुळे कल्याण-शीळफाटा रस्ता रविवारी वाहन कोंडीतून मुक्त असेल असा विचार करून घराबाहेर वाहने घेऊन बाहेर पडून शीळफाटा रस्त्याने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना काटई ते देसई गावा दरम्यान रविवारी वाहन कोंडीत अडकावे लागले. हे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकाला पाऊण ते एक तास लागत होता. उन्हाचा चटका, त्यात वाहनात रखडपट्टी त्यामुळे प्रवासी हैराण झाले होते.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

17:08 (IST) 5 Jun 2022
पडळकर म्हणतात, "रोहित पवारांची एवढी लायकी नाही...!"

“घरात जसं शेंबड्या पोराला मोठी माणसं आवरतात, तसं भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं”, असं रोहित पवार म्हणाले होते. यावर आता गोपीचंद पडळकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचा सविस्तर

16:51 (IST) 5 Jun 2022
‘…तर मलाही वाटतं उद्धव ठाकरेंनी देशाचं पंतप्रधान व्हावं’, गुलाबराव पाटलांचा धनंजय मुंडेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा, यासाठी तुळजाभवानी समोर नवस बोलला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असं वक्तव्य केलं होतं. आता शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी धनंजय मुंडे यांना खोचक टोला लगावला आहे. सविस्तर बातमी

16:33 (IST) 5 Jun 2022
एकाशी लग्न, दुसऱ्याशी संसार अन् पुन्हा तिसऱ्यात गुंतले मन!

एका तरुणीचे वस्तीत राहणाऱ्या युवकावर प्रेम जडले. दोघांनी काही दिवसांच्या ओळखीतच प्रेमविवाह केला. काही वर्षानंतर तिचे मिसकॉल आलेल्या दुसऱ्याच एका युवकाशी सूत जुळले. तिने पहिल्याला सोडून दुसऱ्याशी प्रेमविवाह केला. काही दिवसांतच ती पुन्हा तिसऱ्याच्या प्रेमात पडली आणि तिने तिसऱ्याशीच घरठाव केला. प्रेमात दगा मिळाल्याने दुसऱ्या पतीने तिच्या पहिल्या पतीचा शोध घेतला. दोघेही भरोसा सेलला तक्रार करायला आले आणि न्यायाची मागणी करू लागले. त्यांची तक्रार ऐकून आता पोलीसही चक्रावले आहेत.

वाचा सविस्तर, नेमकं काय आणि कसं घडलं...!

15:28 (IST) 5 Jun 2022
विकासनिधीसाठी लोकांचे खासदार रामदास तडस यांना स्मशानभूमी, लग्नसमारंभात अर्ज

करोनाकाळात आवश्यक कामासाठी विकासनिधी वळविण्यात आल्याने खासदारांना अडीच वर्षे विकासकामांवर खर्च करता आला नव्हता. आता विकासनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून तसे पत्र आल्यामुळे विकासकामांसाठी लोकांची झुंडब उडत आहे. निधीसाठी लोक खासदारांना लग्नसमारंभ आणि स्मशानभूमीतही गाठत असल्याने खासदार रामदास तडस भांबावून गेले आहे. वाचा सविस्तर....

14:01 (IST) 5 Jun 2022
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेची टीका

राज्यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काल (४ जून) संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील सरकार असल्याचे वक्तव्य केले. त्याच वक्तव्यावरुन आता मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. वाचा सविस्तर

13:33 (IST) 5 Jun 2022
‘पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार’, बीडमध्ये धनंजय मुंडे यांचं पुन्हा वक्तव्य

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा, यासाठी तुळजाभवानी समोर नवस बोलला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. सविस्तर बातमी

13:04 (IST) 5 Jun 2022
देशात करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता

देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ४२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. या महिन्यात करोनाबाधितांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

12:36 (IST) 5 Jun 2022
आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप फक्त गाढवचं करु शकतो - किरीट सोमय्या

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील अपक्ष आमदारांचे वजन चांगलेच वाढले आहे. शिवसेना आणि भाजपाकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा या निवडणुकीत ‘घोडेबाजार’ करेल, असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. याबाबत आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी केली आहे. वाचा सविस्तर...

12:33 (IST) 5 Jun 2022
बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग, २५ कामगारांचा होरपळून मृत्यू

बांगलादेशमधील चितगॉंग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला असून साधारण ४५० जण जखमी झाले आहेत. ४ जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले असून अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. वाचा सविस्तर

12:29 (IST) 5 Jun 2022
जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; नो फ्लाय झोनमध्ये खासगी विमान शिरलं, बायडेन दांपत्य सेफ हाऊसमध्ये!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. जो बायडेन यांच्या रेहोबोथ बीचजवळील घरावरून शनिवारी एक छोटं विमान नो-फ्लाय झोनमध्ये घुसलं होतं. या धक्कादायक प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सेफ हाऊसमध्ये हलवलं आहे. याबाबतची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. सविस्तर बातमी

12:05 (IST) 5 Jun 2022
“स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवू शकले नाही आणि…”; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला वारंवार विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह सध्या उत्तर प्रदेशात जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंचा अहंकार अजूनही कमी झालेला नाही अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

11:55 (IST) 5 Jun 2022
"गेल्या ४०० वर्षातील चुकांचे खापर आताच्या मुस्लिम समाजावर का फोडता?"

औरंगजेब हा एमआयएम पक्षाचा कधीच ‘आदर्श’ नव्हता. गेल्या ४०० वर्षातील चुकांचे खापर आताच्या मुस्लिम समाजावर का फोडता? असा सवाल करत तसे करणे चुकीचे आहे, अशी भूमिका ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये इम्तियाज जलील यांनी मांडली. त्याचबरोबर आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वादाचा मुद्दा चालणार नाही, कारभारावरून मतदान होईल, असे भाकितही जलील यांनी वर्तवले.

वाचा सविस्तर मुलाखत

11:41 (IST) 5 Jun 2022
इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. असे असताना आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची येथे अफवा पसरली आहे. या चर्चेनंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या इस्लामाबाद येथील बनी गाला या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी

11:23 (IST) 5 Jun 2022
‘सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात लावला तर…’, नाना पटोलेंचा ईडीला धमकीवजा इशारा

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात अलीकडेच ईडीने नोटीस जारी केली आहे. २०१५ साली सबळ पुरावे न आढळल्याने हे प्रकरण बंद करण्यात आलं होतं. पण आता पुन्हा नव्याने ईडीने हे प्रकरण उकरून काढत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या ईडी समन्सवरुन ईडीला मोठा इशारा दिला आहे. सविस्तर बातमी

10:43 (IST) 5 Jun 2022
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी इंधन दर काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

10:40 (IST) 5 Jun 2022
Gold- Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी कायम, जाणून घ्या आजचा भाव

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याची तसेच चांदीची महाराष्ट्रातील आजची किंमत काय ते जाणून घ्या.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

10:39 (IST) 5 Jun 2022
“एक मराठी माणूस अयोध्येत…”; मनसेच्या अविनाश जाधव यांनी घेतले रामलल्लांचे दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली. वाचा सविस्तर...

10:29 (IST) 5 Jun 2022
‘काश्मिरी पंडितांवरील अत्याचार थांबवा,’ मुंबईत रझा अकादमीची निदर्शने

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंगमुळे जम्मू-काश्मीरमध्ये अस्थितरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. येथे हिंदू, काश्मिरी पंडितांच्या तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. असे असताना काश्मिरी पंडितांसाठी जे शक्य आहे ते करू अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तर दुसरीकडे रझा अकादमीदेखील काश्मिरी पंडितांच्या बाजूने उभी राहिली असून मुंबईतील मिनारा मशिदीसमोर अकादमीतर्फे निदर्शने करण्यात आली. वाचा पूर्ण बातमी

10:28 (IST) 5 Jun 2022
विदर्भात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण

राज्यात सध्या काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट असे परस्परविरोधी वातावरण आहे. हवामान खात्याने सांगितल्यानुसार पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस तर विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. वाचा पूर्ण बातमी

10:27 (IST) 5 Jun 2022
दुचाकीवरील ताबा सुटल्याने सांगलीत भीषण अपघात

जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन तरुण ठार झाले असून एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. वाचा सविस्तर बातमी

10:21 (IST) 5 Jun 2022
“गोपीचंद पडळकरांचं कर्तृत्व काय हे सांगलीतल्या पोलीस…”, आमदार रोहित पवारांचा खोचक टोला!

“आपल्या कुटुंबातही जेव्हा लहान मुलं एखाद्या मोठ्या व्यक्तीला चुकून बोलतात, तेव्हा आई-वडील त्याला सांगतात तू गप, तू लहान आहेस. जेव्हा भाजपाचा एक नेता असा सुसाट सुटतो आणि त्यांच्यासोबत इतरही आजी-माजी आमदार असतात, जे विचित्र पातळीवर जाऊन मोठ्या नेत्यांच्या बाबतीत टीका करतात. त्यावेळी त्यांचे मोठे नेते शांत बसतात. टीका करणाऱ्या लोकांना मोठे नेते सहकार्य करतात, त्यांची पाठराखण करतात”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी टीका केली आहे.

https://twitter.com/LoksattaLive/status/1533295123542724608

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Story img Loader