Maharashtra News Updates, 05 June 2022 : गेल्या काही दिवसांपासून दररोज दुपटीने वाढणारी करोना रुग्णसंख्या आणि उपचाराधीन रुग्णसंख्येचा चढता आलेख यामुळे राज्याच्या आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून राज्यभर दक्षतेच्या सूचना देण्याबरोबरच नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तर काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडित आणि हिंदुंना लक्ष्य करत त्यांचे हत्याकांड काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात ईडी आणि सीबीआयने छापेमारी केली आहे. काही नेत्यांना अटक झाली असून ते तुरुंगात देखील आहेत. ईडी किंवा सीबीआयच्या छापेमारीचा त्रास होतो का? असा सवाल विचारला असता संजय राऊत यांनी हटके उत्तर दिलं असून एक घटनाक्रम सांगितला आहे. सविस्तर बातमी
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने केलेल्या विकासकामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन करून उपमुख्यमंत्री अजित पवार आयते श्रेय लाटत आहेत. प्रशासक राजेश पाटील यांना हाताशी धरून अजित पवारांनीच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे राजकारण सुरू आहे, अशा शब्दांत भाजपाने अजित पवारांवर टीका केली आहे. सविस्तर बातमी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातल्या कासेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि कंटेनरची धडक झाल्यामुळे हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही कार पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील उंद्री गावाचे नाव नुकतेच बदलण्यात आले. आता उंद्री हे गाव उदयनगर या नावाने ओळखले जाणार आहे. ‘उंद्री’ शब्दामुळे गावाचे नाव सांगण्यात ग्रामस्थांना संकोच वाटत होता. त्यामुळे नामांतरणासाठी ५० वर्षांचा मोठा लढा द्यावा लागल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. वाचा सविस्तर बातमी
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.