Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,७५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८०० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१७ रुपये आहे.

Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.