Maharashtra News Live, 04 June 2022 : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना उन्हाच्या चटक्यांना सहन करावे लागत आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या अरबी समुद्रातील शाखेच्या प्रवासास पोषक वातावरण नसल्याने त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मोसमी पाऊस कर्नाटकच्या कारवापर्यंत येऊन थबकला आहे.

तडजोडीचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपाने फेटाळल्याने राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना की भाजपाचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होणार याचीच आता उत्सुकता आहे. महाविकास आघाडीला १६ तर भाजपाला अतिरिक्त २० मतांची आवश्यकता असल्याने जास्त आमदार कोण अधिक ‘गळा’ला लावतील त्यावरच दोन्ही पक्षांचे भवितव्य ठरणार आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

13:15 (IST) 4 Jun 2022
“खोटं सांगत नाही, कधी कधी अती व्यायाम वर घेऊन जातो, त्यामुळे…”; अजित पवारांचा तरुणांना सल्ला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यायामशाळेत (जीम) येऊन व्यायाम करणाऱ्या तरुणांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “व्यायाम करताना कसाही करून चालत नाही. त्यामुळे व्यायामशाळेत आल्यावर प्रशिक्षकाच्या सल्ल्याशिवाय व्यायाम करू नका. कधी कधी अती व्यायाम वर घेऊन जातो,” असा इशारा अजित पवार यांनी व्यायाम करणाऱ्यांना दिला.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

13:15 (IST) 4 Jun 2022
काहींना दिवसाही सत्तेची स्वप्न पडतात!; नाना पटोलेंचा धनंजय मुंडेंना टोला

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असे म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाने तशी अपेक्षा ठेवली पाहिजे. लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र काहींना दिवसाही स्वप्न पडतात, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला. वाचा सविस्तर…

13:15 (IST) 4 Jun 2022
कलिंगडातून साडेतीन, तर भाजीपाला रोपांतून साडेसहा लाखांचे उत्पन्न, ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेला बारामतीत यश

बारामती तालुक्यातील शेतकरी नेहमीच शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून चांगले उत्पादन घेण्यात आघाडीवर असतात. बाजारात मागणी असलेला शेतमाल पिकवावा या संकल्पनेतून कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकरी अजित पोमणे यांनी अत्याधुनिक रोपवाटिका आणि शेडनेट हाउसची उभारणी केली आहे. त्यातून ते परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध करून देत आहेत.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

13:14 (IST) 4 Jun 2022
विश्लेषण : जम्मू-काश्मीरचा बडगाम जिल्हा टार्गेट किलिंगचे केंद्र का बनला?

मध्य काश्मीरचा बडगाम जिल्हा दहशतवादी कारवायांचे एक नवीन केंद्र बनला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हत्यांच्या मालिकेमुळे बडगाम जिल्हा चर्चेत आला आहे. हत्यासत्रामुळे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर…

13:06 (IST) 4 Jun 2022
महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती? राजेश टोपे म्हणतात…

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल होत असून त्यावरून राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी मास्कबाबत राज्य सराकरचं नेमकं आवाहन काय आहे, याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.

वाचा सविस्तर

12:45 (IST) 4 Jun 2022
पुढच्या काळामध्ये माणसे गाडीत साखर किती टाकू हा प्रश्न विचारतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ूट यांच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वाचा सविस्तर…

12:21 (IST) 4 Jun 2022
प्रेषित मोहम्मद यांचा अवमान: कानपूरमध्ये दंगल; १२ जखमी

एका टीव्ही कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी कानपूरमध्ये दंगल उसळली आहे. शुक्रवारी नमाजनंतर एका गटाने शहरातील नई सडक आणि यतीमखाना भागात दुकानदारांना शटर खाली करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन गटांत वादाला सुरुवात झाली आणि दंगल उसळली. संतप्त जमावाने एकमेकांवर बॉम्ब आणि दगडफेक केली. या दंगलीत एकूण १२ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सविस्तर बातमी

11:21 (IST) 4 Jun 2022
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक

हैदराबादमध्ये इंटरमिजिएटची एक १७ वर्षीय विद्यार्थिनी गत शनिवारी रात्री पबमध्ये वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. तेथून तिला घरी सोडण्याची बतावणी करून कारमधून नेताना पाच अल्पवयीन मुलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित आरोपींमध्ये काही राजकारण्यांची मुलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हैदराबाद पोलीस कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. सविस्तर बातमी

11:12 (IST) 4 Jun 2022
“आम्ही ‘भ’ची भाषा सुरू केली, तर….”, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले, “आम्हालाही बरंच बोलता येतं”!

गेल्या काही दिवसांपासून राज्याच सुरू असलेल्या वादाच्या मुद्द्यांवर अजित पवारांनी तळेगावमध्ये बोलताना टोलेबाजी केली आहे. तळेगाव नगरपरिषद इमारतीचं आज अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर बोलताना भाजपावर टीकास्त्र सोडलं.

10:42 (IST) 4 Jun 2022
“भाजपानं उगीच त्यांचे पैसे वाया घालवू नयेत”

“महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषं दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत. ईडी, काही जुनी प्रकरणं उकरून काढून त्रास देण्याच्या भूमिका आहेत”, असं राऊत म्हणाले.

वाचा सविस्तर

09:52 (IST) 4 Jun 2022
झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा डाव – अजित पवार

झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला उद्देशून केली. विकासाचे दावे फोल ठरल्याने भावनेला हात घालून, जातीय तेढ निर्माण करून लोकांच्या मनात विष कालवण्याचे काम केले जात आहे, असेही ते म्हणाले.

वाचा सविस्तर

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.