Maharashtra MLC Election, 12 july: लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. या अनुषंगाने आज विधानपरिषदेत ११ जागांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झालं असून कुणाचे आमदार कुणाच्या उमेदवाराला मत देणार? यासंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. १२ आमदार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे कुणाचा उमेदवार पराभूत होणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा!
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे – २६ (विजयी)
परिणय फुके – २६ (विजयी)
योगेश टिळेकर – २६ (विजयी)
अमित गोरखे – २६ (विजयी)
सदाभाऊ खोत – २६ (विजयी)
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी – २४ (विजयी)
कृपाल तुमाने – २५ (विजयी)
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर – २३ (विजयी)
शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव – २५ (विजयी)
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर – २३ (विजयी)
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) – १२ (पराभूत)
घड्याळाची विजयी सलामी ! महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी आपली विजयी पताका रोवली. या दणदणीत विजयाबद्दल मी आमच्या दोन्ही शिलेदारांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकारी आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो - अजित पवारांची पोस्ट
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1811757312455143902
विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट!
विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत. राजेश विटेकर यांना २३ तर शिवाजीराव गर्जेंना २४ मतं मिळाली आहेत. ही पहिल्या पसंतीची मतं आहेत. या मतांची बेरीज ४७ होते. अजित पवार गटाकडे ४२ मतं होती. त्यामुळे वरची पाच मतं त्यांनी काँग्रेसची फोडली असल्याचं आता बोललं जात आहे.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत पिछाडीवर पडलेले भाजपाचे उमेदवार सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीच्या १२ मतांनी मदतीचा हात दिली असून ते विजयी झाले आहेत. त्यामुळे आता भाजपाचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे - २६ (विजयी)
परिणय फुके - २६ (विजयी)
योगेश टिळेकर - २६ (विजयी)
अमित गोरखे - २६ (विजयी)
सदाभाऊ खोत - २६ (विजयी)
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी - २४ (विजयी)
कृपाल तुमाने - २५ (विजयी)
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर - २३ (विजयी)
शिवाजीरावर गर्जे - २४ (विजयी)
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव - २५ (विजयी)
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर - २२
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) - ८
पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये भाजपाचे सदाभाऊ खोत वगळता इथर चारही उमेदवार जिंकले आहेत. शिवाय शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकून आले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव जिंकल्या असून मिलिंद नार्वेकरांना विजयासाठी एका मताची गरज आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे असणारे शेकापचे जयंत पाटील यांना १२च मतं मिळाली असून सदाभाऊ खोत किंवा जयंत पाटील यांच्यापैकी एकाचा पराभव होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे गटाकडून भावना गवळी व कृपाल तुमाने हे दोन्ही उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत.
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे - २६ (विजयी)
परिणय फुके - २६ (विजयी)
योगेश टिळेकर - २६ (विजयी)
अमित गोरखे - २६ (विजयी)
सदाभाऊ खोत - १४
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी - २४ (विजयी)
कृपाल तुमाने - २५ (विजयी)
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर - २३ (विजयी)
शिवाजीरावर गर्जे - २४ (विजयी)
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव - २५ (विजयी)
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर - २२
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) - १२
भरती घोटाळ्यामध्ये असलेला मुख्य आरोपी आता नव्याने होऊ घातलेल्या भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा उतरल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.
अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे - २६ (विजयी)
परिणय फुके - २३ (विजयी)
योगेश टिळेकर - २६ (विजयी)
अमित गोरखे - २२
सदाभाऊ खोत - १०
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी - १०
कृपाल तुमाने - १६
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर - २३ (विजयी)
शिवाजीरावर गर्जे - २४ (विजयी)
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव - १९
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर - २२
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) - ८
विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय झाला असून अखेर विधानभवनात जाण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे.
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे - २६ (विजयी)
परिणय फुके - २३ (विजयी)
योगेश टिळेकर - २६ (विजयी)
अमित गोरखे - २२
सदाभाऊ खोत - १०
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी - १०
कृपाल तुमाने - १६
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर - २१
शिवाजीरावर गर्जे - २०
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव - १९
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर - २२
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) - ८
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरात टाकलेल्या छाप्यात ३१४ किलो भेसळयुक्त पनीर साठ्यासह इतर साहित्य सामग्री जप्त करण्यात आली. पनीर नाशवंत असल्याने ते लगेच नष्ट करण्यात आले.
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे - १८
परिणय फुके - १८
योगेश टिळेकर - २३ - विजयी
अमित गोरखे - २२
सदाभाऊ खोत - १०
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी - १०
कृपाल तुमाने - १६
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर - २१
शिवाजीरावर गर्जे - २०
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव - १९
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर - १७
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) - ७
विधानपरिषद निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगेश टिळेकर विजयी झाले आहेत.
समान पसंती नोंद केल्यामुळे एक मत बाद झाल्याचं विधानपरिषद निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात मतमोजणी सुरू झाली असून एका मतामध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास आलं. शेवटी तपासणी करून ते मत भाजपाचे उमेदवार अमित गोरखे यांना देण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला.
पनवेल : रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या पनवेलमध्ये महापालिका प्रशासन वाहतूक नियमनाविषयी बालकांना साक्षर करणारे पहिले वाहतूक नियमनांचे (ट्रॅफीक) उद्यान खारघर वसाहतीमध्ये उभारणार आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ए येथील ९५०० चौरसमीटर जागेवर हे उद्याण उभारले जात आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरु केली. मात्र, ही योजना आता राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टीप्पणी करत आहेत. या योजनेवरून आज विधानसभेतदेखील गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी भाजपाचे आमदार राम कदम आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच चांगलीच खडाजंगी झाली.
विधानपरिषद निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून आधी बाद मतं मोजण्यात येणार आहेत. एकूण मतमोजणीसाठी २७४ मतांचे २५-२५ मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आले आहेत. असे एकूण ११ गठ्ठे झाले आहेत. मोजणीसाठी ८ ट्रे तयार करण्यात आले असून पसंतीक्रमानुसार या ट्रेमध्ये मतपत्रिका टाकल्या जाणार आहेत.
एकलविहीर येथील महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात वरूड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाला यश आले.
जेवढ्या जागा तेवढे पसंतीक्रम देण्याची आमदारांना मुभा असते. म्हणजे ११ जागांसाठी एखादा आमदार ११ पसंतीक्रमानुसार मते देऊ शकतो. १२ मते दिल्यास मतपत्रिका बाद होईल.
२२८४ मतांचा कोटा पूर्ण केलेला उमेदवार पहिल्या फेरीत विजयी घोषित केला जातो.
पहिल्या पसंतीची २६०० मते मिळालेल्या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात.
एक्स उमेदवाराला २६ तर वाय उमेदवाराला २० मते मिळाल्यास मते अशा पद्धतीने हस्तांतरित होतात.
‘एक्स’ उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची सर्व २६ मते ‘वाय’ उमेदवाराला मिळाल्यास अतिरिक्त मतांची भर पडते.
मतांचा कोटा – २२८४
एक्स उमेदवाराला मिळाली – २६०० मते
वाय उमेदवारांला सर्व २६०० मते हस्तांतरित झाली आहेत.
पण मतांचे मूल्य ठरते २६०० वजा २२८४ = ३१६
याचाच अर्थ ‘एक्स’ची ३१६ मते अतिरिक्त ठरली
पण ही मते हस्तांतरित होताना त्याचे मूल्य तेवढे नसते.
अतिरिक्त ३१६ मते भागीले पहिल्या पसंतीची २६ मते = १२.१५ (वरील .१५ मते गृहित धरली जात नाहीत)
-१२ मतांचे मूल्य ठरविले जाते
-पहिल्या पसंतीची २६ मते गुणिले १२ = ३१२ प्रत्यक्ष मतांची भर पडते
-वाय उमेदवाराला पहिल्या पसंतीची २००० मते मिळाली असल्यास त्यात ३१२ मतांची भर पडते.
वाय उमेदवाराची मते २३१२ झाल्याने २२८४ मतांचा कोटा पूर्ण केल्याने तो विजयी ठरू शकतो.
समजा वाय उमेदवाराला २२८४ मतांचा कोटा पूर्ण करता आला नसता तर दुसऱ्या उमेदवाराला २२८४ पेक्षा अधिक मते मिळाली आहेत त्याची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात.
-दुसऱ्या उमेदवाराची मते मोजूनही अपेक्षित मते न मिळाल्यास तिसऱ्या उमेदवाराची मते मोजली जातात
राज्य विधानसभेची सदस्यसंख्या २८८ असली तरी आमदारांचे राजीनामे, अपात्रता किंवा निधनामुळे १४ जागा सध्या रिक्त आहेत. परिणामी एकूण मतदार – २७४
२७४ भागिले ११ एक = २२.८३ १ = २२८४ (त्यातही वैध मतांच्या आधारे मतांचा कोटा ठरतो. एखादे मत बाद झाल्यास कोटा कमी होतो)
एका मताचे मूल्य हे १०० असते.
मतांचा कोटा हा शेकड्यात ठरतो. याचाच अर्थ २२८४ म्हणजेच पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता असेल.
सूचेता यांनी ४ कोटी ४० लाख २५ हजार एवढी रक्कम गुंतवली होती. त्यापैकी ५ लाख ९३ हजार ५५७ रुपये त्यांना परत मिळाले.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेकडे आठ हजार ५०० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.
मोबाईल ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्राम स्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रेल्वे रुळाला तडा गेला.
मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने श्वान आणि मांजरींच्या संदर्भातील तक्रारींसाठी एक मोबाइल ॲप तयार केले आहे.
aharashtra News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!