Maharashtra MLC Election, 12 july: लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. या अनुषंगाने आज विधानपरिषदेत ११ जागांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झालं असून कुणाचे आमदार कुणाच्या उमेदवाराला मत देणार? यासंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. १२ आमदार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे कुणाचा उमेदवार पराभूत होणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा!
येथे येणाऱ्या पर्यटकांना पूर्वी कधी एखाद्या वाघाचे दर्शन व्हायचे पण हल्ली प्रत्येक एक दोन दिवसांनी येथे वाघांचे दर्शन मागील एप्रिल, मे आणि जून महिन्यात व्हायचे.
त्या रेल्वेमध्ये चढताना खाली कोसळल्या. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
जिल्ह्यातील राळेगाव येथे सराफा दुकान गॅस कटरने फोडून मुद्देमालासह चोरटे पसार झाले. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
पोलिसांनी टॉवर लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण केले. अट्टल चोरटा लखन राठोड हा याच पारिसरातील मोरगव्हाण येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरक्षित भूखंडावरील हे कार्यालय प्रशस्त पत्रे, ताडपत्र्यांनी बांधलेले आणि वातानुकूलित आहे.
महायुतीचे उमेदवार
भाजपा – पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना एकनाथ शिंदे गट – भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी अजित पवार गट – राजेश विटेकर, शिवाजीरावर गर्जे
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस – प्रज्ञा सातव
शिवसेना उद्धव ठाकरे गट – मिलिंद नार्वेकर
राष्ट्रवादी शरद पवार गट – जयंत पाटील यांना पाठिंबा
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीचं मतदान संपलं असून सर्व पात्र २७४ विधानसभा आमदारांनी मतदान केलं आहे. आता निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून कुणाच्या पारड्यात आमदारांनी आपला कौल दिला आहे आणि पराभूत उमेदवार कुणाचा ठरणार आहे? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
विधानभवनात संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची नजरानजर झाली. पायऱ्यांवर एकमेकांसमोर दोन्ही नेते आल्यानंतर संजय राऊतांनी “अरे व्वा, आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकांसोबत”, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यापाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनी “हे तुमचं वाक्य असेल तर मी ही लाईन घेणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर संजय राऊतांनी “मी नेहमी लाईनच देतो”, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
काँग्रेसचे लोक संविधान मानतात का? गणपत गायकवाड यांचा तो अधिकार आहे. त्यापासून तुम्ही त्यांना वंचित ठेवू शकत नाहीत. लोक जेलमध्ये राहून निवडणूक लढवतात, जिंकून येतात – गणपत गायकवाड यांच्या मतदानावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया
विधान परिषदेसाठी मतदान करताना ठाकरे गटानं आपल्या आमदारांचे पाच-पाच जणांचे गट केले आहेत. त्यामुळे गटा-गटाने ठाकरे गटाचे विधानसभा आमदार मतदानासाठी विधानभवनात जात आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपला मतदानाचा अधिकार बजावला.
दुपारी १२ वाजेपर्यंत विधानभवनात २०० आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे.
मी तुरुंगात असताना परवानगी मागितली होती. पण मला ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातो हे यातून स्पष्ट होतंय – अनिल देशमुख</p>
काँग्रेसनं मला कालच्या बैठकीला निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यांनी मला बैठकीला का बोलवलं नाही, हे त्यांनी सांगावं. मी काँग्रेसचा सदस्य आहे. आजही मी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात जाईन. नेतृत्वाकडून जो आदेश येईल, त्या व्यक्तीला मी मत देईन. पण मला कालच्या बैठकीला न बोलावण्यामागचा हेतू काय होता, हे पक्षच सांगू शकेल. मला जर त्यांनी बैठकीला बोलावलंच नाही, तर मी तिकडे जाणार कसा? – झिशान सिद्दिकी, काँग्रेस आमदार
जेलमध्ये एखादा आरोपी असेल, तर तो निवडूनही येऊ शकतो. याआधी असं घडलंय. लोकसभेतही आरोपी तुरुंगात असताना तो निवडून आल्यानंतर शपथ घेण्याची परवानगी देण्यात आली होती. गणपत गायकवाड फक्त आरोपांखाली तुरुंगात आहेत. त्यामुळे कायद्याने त्यांना मतदान करण्याचा पूर्ण अधिकार आहे – अतुल भातखळकर
छगन भुजबळ हे काल राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर नव्हते, अशी चर्चा आहे. यावर अजित पवार म्हणाले, “सभागृहात काल कॅबिनेटची बैठक होती. त्यामुळे त्या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक प्रतिनिधी तेथे असावे. त्यामुळे छगन भुजबळ यांना त्या ठिकाणी थांबायला सांगितलं होतं”, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
भाजपा आमदार गणपत गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांना मतदान करू दिलं जाऊ नये, अशी मागणी काँग्रेसनं केली असून त्यासंदर्भात निवडणूक आयोगासी सल्लामसलत केली जाणार असल्याचं समोर आलं आहे.
विकेट कुणाची जाणार हे माहिती नाही, पण महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील – रवींद्र धंगेकर
९ वाजता विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून पहिल्या तासाभरात ४६ आमदारांनी मतदान केलं आहे.
काँग्रेसची मतं फुटू शकतात तर मग भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट यांची मतंही फुटू शकतात. ते काय आकाशातून पडले आहेत का? त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूने आहे हे लोकसभेत दिसल्यामुळे त्यांचेही आमदार वेगळी भूमिका घेऊ शकतात ना? काँग्रेसचे आमदार फुटू शकतात या भ्रमात कुणी राहू नये – संजय राऊत

आमदार फुटेल, पैसे घेईल अशी धारणा व्यक्त करणं चुकीचं आहे. ज्यांनी काम केलं असेल त्यांना यश मिळेल. आमदार खरेदी वगैरेचा विचार चुकीचा आहे. लाखो लोकांच्या मतांवर निवडून आलेले लोक आहेत. ते पैशाने फुटणार नाहीत, विचारसरणी पटली नाही तर वेगळी भूमिका घेऊ शकतात – भाजपा आमदार गणेश नाईक
भाजपाचे कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसनं विरोध केला आहे. उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी सध्या गणपत गायकवाड तळोजा जेलमध्ये असून त्यांना विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी विधानभवनात पोलिसांच्या सुरक्षेत आणलं जाणार आहे. मात्र, काँग्रेसनं यासंदर्भात पत्र पाठवून गणपत गायकवाड यांच्या मतदानाला विरोध केला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
विधान परिषदेतील अत्यंत अभ्यासु व आक्रमक व तितकीच अभ्यासु मांडणी करणारे एक सन्माननीय सदस्य म्हणजे श्री अनिल परब साहेब.त्यांचा सभागृहातील एकंदर अभ्यास, विधिमंडळातील विविध आयुधांचा कसा वापर करायचा? विधेयकावर कसे बोलायचे?इ.त्यांचे ज्ञान अद्भुत आहे – अमोल मिटकरी
विधान परिषदेतील अत्यंत अभ्यासु व आक्रमक व तितकीच अभ्यासु मांडणी करणारे एक सन्माननीय सदस्य म्हणजे श्री अनिल परब साहेब.त्यांचा सभागृहातील एकंदर अभ्यास, विधिमंडळातील विविध आयुधांचा कसा वापर करायचा? विधेयकावर कसे बोलायचे?इ.त्यांचे ज्ञान अद्भुत आहे. pic.twitter.com/aHfpGZ2WoV
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 11, 2024
विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळामुळे महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी गेलेली काँग्रेसची मतं वगळून उर्वरीत मतं जरी जयंत पाटलांच्या पाठिशी उभी राहिली, तरीदेखील त्यांना किमान ७ ते ८ मतांची आवश्यकता राहील. अशावेळी सभागृहातील अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची राहील. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं १, एमआयएमची २, समाजवादी पक्षाची २ आणि शेतकरी कामगार पक्षाचं १ अशा ६ मतांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला सर्वात जास्त मतांची जुळवाजुळव करावी लागेल. कारण शरद पवार गटानं विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पण शरद पवार गटाकडे विधानसभेत फक्त १२ आमदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विजयासाठी शरद पवार गटाला एकूण १४ मतांची जुळवाजुळव करावी लागेल.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण आवश्यक संख्याबळ २३ असताना उद्धव ठाकरे गटाकडे मात्र विधानसभेत फक्त १५ आमदार आहेत. त्यामुळे विजयासाठी ठाकरे गटाला एकूण ८ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या अतिरिक्त १४ मतांपैकी ७ मतं ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास ठाकरे गटाचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो.
सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षांमधील उमेदवारांनाही जिंकून येण्यासाठी आकडेमोड करावी लागणार आहे. काँग्रेस हा लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. पण विधानसभेत महाविकास आघाडीपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक ३७ आमदार आहेत. काँग्रेसनं फक्त एक उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडे अतिरिक्त १४ मतं अतिरिक्त आहेत. हे १४ आमदार कुणाच्या पारड्यात त्यांची मतं टाकतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.
अलिकडे काही लोकांना काहीतरी बोलायला विषय नाही म्हणून ते काहीतरी बोलत असतात. आम्ही कुणाचीही मतं फोडण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. पण प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं कामच आहे – अजित पवार
aharashtra News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!