2024 Maharashtra Vidhan Sabha Election Updates : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचाराच्या तोफा १८ नोव्हेंबरला थंडावणार आहेत. त्याआधीचा हा शेवटचा विकेंड सुरू असल्याने सर्वच पक्षांतील सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. माध्यमांना मुलाखती देणे, मतदारसंघात फिरणे अन् प्रचारसभांना संबोधित करण्यात उमेदवार आणि स्टार प्रचारकांचा वेळ जात आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. आजही विविध नेत्यांच्या सभा नियोजित आहेत. आजच्या सभांमध्ये कोण कुठून कोणावर निशाणा साधतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

 Maharashtra News Today, 15 November 2024 : दिवसभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

13:58 (IST) 15 Nov 2024

निवडणुकीच्या तोंडावर ऑटोरिक्षाचे चाके थांबणार? संयुक्त कृती समिती म्हणते…

नागपूर : महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाला दिलेले धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव व मंडळाच्या अस्पष्ट निकषांवर राज्यभरातील ऑटोरिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा…

13:50 (IST) 15 Nov 2024

महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य

राज्यात विधानसभा निवडणुकीत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे गुरुवारी खारघर येथील सेंट्रल पार्कजवळील मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 15 Nov 2024
MNS Manifesto : “महाराष्ट्राला स्वतःचं रेल्वे मंडळ असायला हवं”, मनसेच्या जाहीरनाम्यात राज ठाकरेंची तरतूद

महाराष्ट्राच्या प्रगतीला आवश्यक असणारी कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अशी व्यवस्था वेगवान आणि कमी शुल्कात उपलब्ध व्हावी म्हणून राज्यात रेल्वेचे जाळे हवे आणि ते जाळे उभे करण्यासाठी राज्याचे स्वतःचे रेल्वे मंडळ हवे.

13:28 (IST) 15 Nov 2024

Nagpur Assembly Constituency : गडकरी-फडणवीस यांच्या संयुक्तप्रचार सभेच्या मुहुर्ताची प्रतीक्षा

नागपूर : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना विदभार्तील दोन प्रमुख नेते नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांची आतापर्यंत एकत्र सभा न होण्याचा. निवडणूक अर्ज दाखल करताना हे दोघे नेते एकत्र होते. त्यानंतर अद्याप या नेत्यांच्या एकत्रित सभा नागपुरात किंवा विदर्भात विधानसभेसाठी झाली नाही.

वाचा सविस्तर…

12:35 (IST) 15 Nov 2024

‘पुणे कॅन्टोन्मेंट’ भाजपसाठी आव्हानात्मक; काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत

पुणे : काँग्रेस आणि भाजप हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक, तर काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपने पुण्यातील उमेदवार जाहीर केले असताना, शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी झगडावे लागल्याने विद्यामान आमदार सुनील कांबळे यांना मागील पाच वर्षांत केलेल्या काही चुकांमुळे निर्माण झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

वाचा सविस्तर…

12:29 (IST) 15 Nov 2024
MNS Manifesto 2024 : मूलभुत गरजा, दळणवळण, उद्योग धोरण अन् मराठी अस्मिता; मनसेच्या जाहीरनाम्यात नेमकं काय काय?

राज ठाकरेंनी चार भागातील जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी पहिल्या भागात मुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार

दुसरा भाग – दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्राभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता

तिसरा भाग- राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण

चौथा भाग – मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी, डिजिटल जगात मराठी जागतिक व्यावसीफाटवर मराठी, गड किल्ले संवर्धन, पारंपरिक खेळ.

12:17 (IST) 15 Nov 2024

आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…

चंद्रपूर : शहरातील सर्व मुख्य मार्ग, प्रमुख रस्ते, बगीच्या, वार्ड व प्रभागातील सर्व भागात पहाटेच्या सुमारास २०० रूपयांच्या नोटांचा अक्षरश: पाऊस पडला. जवळपास पाच ते सात करोड रूपयांच्या या नोटा ठिकठिकाणी आढळल्याने लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

वाचा सविस्तर…

12:10 (IST) 15 Nov 2024

Maharashtra Live News : शिवाजी पार्कातील मनसेची १७ तारखेची सभा रद्द, कारण देत राज ठाकरे म्हणाले….

१७ तारखेच्या सभेसाठी सरकारकडून परवानगी आलेली नाही. त्यामुळे दीड दिवस त्या सभेकरता उरलेला आहे. दीड दिवसांत या सभा करणं कठीण होऊन बसतंय. त्यामुळे १७ तारखेची सभा करत नाहीत. त्याऐवजी मुंबई ठाण्यातील मतदारसंघात दौरा सुरू होणार आहे- राज ठाकरे

11:57 (IST) 15 Nov 2024

मुंबईतली प्रवास, वीज अदानींमुळे महाग, वंचित’च्या प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबई : अदानी कंपनीला मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करण्याचे कंत्राट दिल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘बेस्ट’ उपक्रम तोट्यात गेला असून परिणामी सामान्य मुंबईकरांचा प्रवास महाग आणि वीज दर अधिक झाले आहेत, अशी टीका ‘वंचित बहुजन आघाडी’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

वाचा सविस्तर…

11:38 (IST) 15 Nov 2024

अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?

अकोला : अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपपुढे काँग्रेसचे तगडे आव्हान आहे. वंचित आघाडी देखील रिंगणात असून गठ्ठा मतदार लक्षात घेत पक्षांनी उमेदवार दिले. जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर मतदारसंघातील समीकरण जुळून येण्याची चिन्हे आहेत.

वाचा सविस्तर…

11:17 (IST) 15 Nov 2024

मोदींच्या सभेचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार का?

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचा फायदा भाजपला झाला नाही. उलट नुकसान अधिक झाले. त्यामुळे मोदी यांच्या चिमूर येथील सभेचा लाभ विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर वर्धा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

वाचा सविस्तर…

10:48 (IST) 15 Nov 2024

गडचिरोलीत उमेदवार बदलामुळे भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

गडचिरोली : विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आल्याने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत राजकीय वातावरण तापले आहे. गडचिरोली विधानसभेत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी नव्या उमेदवारांना मैदानात उतरवल्याने यंदा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी भाजपकडून डॉ. मिलिंद नरोटे तर काँग्रेसकडून मनोहर पोरेटी आमनेसामने आहेत.

वाचा सविस्तर…

10:46 (IST) 15 Nov 2024
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?

बुलढाणा : मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला मेहकर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. १९९५ पासून २०१९ पर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा फडकला. आता शिवसेनेची दोन शकले झाल्याने गेल्या साडेतीन दशकात प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट, अशी लढत रंगली आहे.

वाचा सविस्तर…

10:20 (IST) 15 Nov 2024

Live News : “महायुतीबरोबर येण्यासाठी मनसेने प्रयत्न केले, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत

महायुती आणि मनसेची विचारसरणी एकच आहे. दोघांनीही हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणूक ते स्वतंत्रपणे लढत आहेत. पक्ष निवडणुकीपासून सतत दूर राहिल्यास कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य येते. यातूनच बहुधा राज ठाकरे हे स्वतंत्रपणे लढत असावेत. शेवटी पक्ष चालविण्याचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मनसेने महायुतीत बरोबर यावे, असे प्रयत्न झाले. पण काही कारणाने ते शक्य झाले नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडले.

 Maharashtra News Live Today, 15 November 2024 : दिवसभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या