2024 Maharashtra Vidhan Sabha Election Updates : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचाराच्या तोफा १८ नोव्हेंबरला थंडावणार आहेत. त्याआधीचा हा शेवटचा विकेंड सुरू असल्याने सर्वच पक्षांतील सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. माध्यमांना मुलाखती देणे, मतदारसंघात फिरणे अन् प्रचारसभांना संबोधित करण्यात उमेदवार आणि स्टार प्रचारकांचा वेळ जात आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. आजही विविध नेत्यांच्या सभा नियोजित आहेत. आजच्या सभांमध्ये कोण कुठून कोणावर निशाणा साधतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

 Maharashtra News Today, 15 November 2024 : दिवसभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

12:28 (IST) 21 Nov 2024

आता वीस रुपये घ्या, जिंकून आल्यास नोट दाखवून हजार न्या…गोंदियात उमेदवाराचे अफलातून आमिष…

गोंदिया : देशात आणि राज्यात महागाईने गाठलेला उच्चांक बघता वीस रुपयांच्या नोटेला आर्थिकदृष्ट्या फार महत्व नाही. पण, तरीही गोंदिया विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण क्षेत्रात या नोटचेे भाव वधारले आहेत.

सविस्तर वाचा…

12:07 (IST) 21 Nov 2024

चंद्रपूर जिल्हा बँकेतील ३६० पदांच्या भरतीला पुन्हा स्थगिती; कारण…

चंद्रपूर : न्यायालयात प्रलंबित अवमान याचिकेवरील सुनावणीपर्यंत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी स्थगिती दिली आहे.

सविस्तर वाचा…

11:47 (IST) 21 Nov 2024

भाजप आमदार दादाराव केचेंवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ? पण, केचे म्हणतात…

वर्धा : विधानसभा निवडणुकीत आर्वी भाजपतील बंडखोरी राज्यभर गाजली. अखेर अमित शहा यांच्या दरबारात ती थंडावली, असे येथील विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी अर्ज परत घेतल्यानंतर म्हटल्या गेले.

सविस्तर वाचा…

20:29 (IST) 15 Nov 2024

मतदान केंद्राच्या २०० मीटरपर्यंत चप्पल घालून येणाऱ्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करा, चप्पल चिन्ह असलेल्या उमेदवाराने दिले निवेदन

मतदारांना मतदान केंद्राच्या २०० मीटर पर्यंत चप्पल वापरण्यास बंदी करावी अशी अजब मागणी परंडा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने केली आहे.

सविस्तर वाचा…

19:43 (IST) 15 Nov 2024

Sanjay Raut: १७ तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणार – खासदार संजय राऊत

चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

19:41 (IST) 15 Nov 2024

प्रहार जनशक्‍ती पक्षाला धक्‍का; उमेदवाराचा कॉंग्रेसला पाठिंबा…

अमरावती : प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अबरार यांनी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंबा दिल्‍याने प्रहार जनशक्‍ती पक्षाला मोठा धक्‍का बसला आहे.

सविस्तर वाचा…

19:39 (IST) 15 Nov 2024

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’

चंद्रपूर : गडचिरोलीतील नक्षलवाद समुळ समाप्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राम मंदिर निर्माणासोबतच कलम ३७०, तीन तलाक, सीएए लागू केला आहे.

सविस्तर वाचा…

19:31 (IST) 15 Nov 2024

Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…

निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य अंधकारमय असेल, असा दावा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

सविस्तर वाचा…

18:55 (IST) 15 Nov 2024

Dahisar Assembly Election 2024: दहिसरमध्ये अटीतटीचा सामना घोसाळकर विरुद्ध चौधरी

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पहिला मतदारसंघ असलेल्या दहिसर मतदारसंघात यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे.

सविस्तर वाचा…

18:30 (IST) 15 Nov 2024

राज्यात १८, १९ नोव्हेंबरला शाळांना सुटी नाही… काय आहे शिक्षण आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण?

मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.

सविस्तर वाचा…

18:01 (IST) 15 Nov 2024
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

सावंत म्हणाले, की उद्योजकांना ताकद देण्यासाठी महायुती सरकारने पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिला. रस्ते, रेल्वे, विमानतळ या सुविधा निर्माण करण्यात आल्या.

सविस्तर वाचा…

17:48 (IST) 15 Nov 2024

‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप

भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणा देऊन ध्रुवीकरणाचे प्रयत्न करू नयेत, याकडे खान यांनी लक्ष वेधले.

सविस्तर वाचा…

17:44 (IST) 15 Nov 2024

“…तर रक्तरंजित क्रांती करणार”, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची भरसभेत धमकी…

सांगोला तालुक्यातील २ टीएमसी पाणी कुठे पळवलं तर रक्तरंजित क्रांती करणार – शहाजी बापू पाटील

17:19 (IST) 15 Nov 2024

ध्रुवीकरणाशिवाय उत्तर नागपुरात भाजपला यश मिळवणे अशक्य? मतविभाजन काँग्रेसला रोखणार का?

उत्तर नागपूर हा एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा गड होता. आंबेडकरी विचारधारेला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे.

सविस्तर वाचा…

17:19 (IST) 15 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Election 2024: विदर्भातील काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, माणिकराव ठाकरे ज्येष्ठ पण पक्षातूनच आव्हान

Chief Minister of Maharashtra from Congress : विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत ‘मुख्यमंत्री कोण होणार?’ या चर्चेने जोर पकडला होता.

सविस्तर वाचा…

16:27 (IST) 15 Nov 2024

उरणच्या उमेदवारांना क्रीडांगण सुविधांचा विसर, मतदारसंघात खेळाच्या मैदानांचा अभाव

एक विकसनशील मतदारसंघ म्हणून परिचित असलेल्या या मतदारसंघात खेळाच्या मैदानाचा अभाव आहे.

सविस्तर वाचा…

15:59 (IST) 15 Nov 2024

गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत

बेलापूर व ऐरोली या दोन्ही मतदारसंघांत यंदा अत्यंत चुरशीच्या लढती होणार असून यंदा मोठ्या पक्ष बदलाच्या घडामोडी घडल्या आहेत..

सविस्तर वाचा…

15:45 (IST) 15 Nov 2024

महायुतीकडून गोपीनाथ मुंडेंच्याच विचाराचे काम – पंकजा मुंडे

सांगली : गोपीनाथ मुंडे यांनी पाणी आणि महिला विकासावर काम करण्याचा विचार मला दिला. यानुसार आम्ही काम करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने महिलांचा सन्मान केला. यापुढेही महिलांना सन्मान आणि सुरक्षा देण्याचे काम महायुती सरकारच करेल, असे प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे यांनी बेडग येथे प्रचार सभेत केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ आज बेडग (ता. मिरज) येथे श्रीमती मुंडे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नीता केळकर व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

15:44 (IST) 15 Nov 2024

मराठा समाज म्हणून कोणालाही पाठिंबा, विरोध करण्यास मज्जाव

सांगली : विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजातील कोणत्याही संघटनेने अथवा व्यक्तीने कोणत्याही उमेदवाराला मराठा समाज म्हणून पाठिंबा अथवा विरोध करू नये. समाजाच्या वतीने असा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही, असा निर्णय सांगलीतील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा आरक्षण चळवळीनंतर गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या विविध राजकीय भूमिकाही जाहीर होत असल्याने सध्या सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील समाजाची भूमिका ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.

15:42 (IST) 15 Nov 2024

विकासकामांसाठीचा उमेदवारच मतदार निवडतील – रोहित पाटील

सांगली : विकास की दडपशाही करणारा प्रतिनिधी निवडायचा याचा निर्णय मतदारांनी या निवडणुकीत घ्यायचा असून मतदार जागरूकतेने विकास कामांसाठीच योग्य उमेदवार निवडतील, असा विश्वास तासगाव-कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

वायफळे (ता. तासगाव) येथील बस स्थानक चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सामान्य लोकांसाठी काम करतोय. लोकांच्या सुख-दु:खात जातोय. आम्ही काम करतोय, हे लोकांनी जवळून बघितले आहे. आबांचा वारसा आम्ही चालवत असून काम केले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये विरोधकांचा चिंचणी गट सोडला तर इतर सर्व ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले.

15:42 (IST) 15 Nov 2024

इस्लामपूरच्या खांद्यावर ३५ वर्षे बसलेले भूत यंदा उतरणार, गौरव नायकवडी यांची बोचरी टीका

सांगली : इस्लामपूर मतदारसंघात गेली ३५ वर्षे आपल्या खांद्यावर बसलेले हे भूत यंदा उतरले जाणार आहे. तुम्ही दबावतंत्राला बळी न पडता निशिकांतदादांना निवडून देऊन बदल घडवा व भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडलेल्या विरोधकांना पाडून इतिहास घडवा, असे आवाहन शिवसेनेचे नेते व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी केले.

आष्टा येथे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सतीश बापट, पोपट भानुसे, प्रवीण माने, अमोल पडळकर, दिलीप मोरे, नंदकिशोर आटूगडे, नीलेश कोळी आदी प्रमुख उपस्थित होते.

15:41 (IST) 15 Nov 2024

केवळ सत्तेसाठी भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ चा सापळा, मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

सोलापूर : काँग्रेसच्या विरोधात सतत खोटे बोलून, देशवासीयांची दिशाभूल करून सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ अदानी-अंबानींचेच भले केले आहे. उर्वरित देशाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता पुन्हा धर्माच्या नावे केवळ सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण करीत ‘ बटेंगे तो कटेंगे ‘ चा खोटा सापळा मोदींनी रचला आहे. त्यापासून जनतेने सावध राहावे, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट येथे काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खरगे बोलत होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह शेजारच्या कर्नाटकातील आळंदीचे आमदार बी. आर. पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

15:32 (IST) 15 Nov 2024

नवी मुंबई: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर, बंडाच्या हंगामात पक्ष जोडणीचे आव्हान

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभांच्या जागा भाजपला मिळणार हे स्पष्ट होताच शिवसेना (शिंदे) पक्षात बंडाचे वारे वाहू लागले.

सविस्तर वाचा…

15:32 (IST) 15 Nov 2024

पनवेल: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी येणारे नेते गोंधळात

राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेमके उमेदवार कोण, असा प्रश्न मतदारांना पडल्याने मतदार गोंधळात आहेत.

सविस्तर वाचा…

15:10 (IST) 15 Nov 2024

‘नोटा’चा कुणाला होणार ‘तोटा’!जाणून घ्या सविस्तर…

अमरावती : गेल्‍या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील ३० पैकी १४ मतदारसंघांमध्‍ये ‘नोटा’ला (वरीलपैकी कोणीही नाही) चौथ्‍या आणि पाचव्‍या क्रमांकाची मते मिळाली. जय-पराजयातील फरकाची मते वाढविण्‍यात ‘नोटा’चा ही हातभार लागला.

सविस्तर वाचा…

14:53 (IST) 15 Nov 2024
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्थानकात भीषण आग; मेट्र सेवा खंडित

14:45 (IST) 15 Nov 2024

नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !

गांधी परिवारातील सर्व सदस्यांच्या नांदेडमधील आजवरच्या जाहीर सभा चव्हाण परिवाराच्या नियंत्रणाखाली पार पडल्या. मागील २० वर्षांत अशोक चव्हाणच सर्व नियोजनाचा सूत्रधार होते.

सविस्तर वाचा…

14:43 (IST) 15 Nov 2024

राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन; विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय चर्चा…

अकोला : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.

सविस्तर वाचा…

14:21 (IST) 15 Nov 2024

वरोऱ्यात सर्वच उमेदवार नवखे, अभूतपूर्व रणधुमाळीत कोण बाजी मारणार ?

कुणबीबहुल वरोरा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वच उमेदवार नवखे आहेत.

सविस्तर वाचा…

14:21 (IST) 15 Nov 2024

“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप

नागपूर : दोन लाख कोटींची गुंतवणूक असलेले प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आले असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला.

सविस्तर वाचा…

 Maharashtra News Live Today, 15 November 2024 : दिवसभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या