Maharashtra Breaking News Live Updates, 15 October 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असून यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध शुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील इतरही घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 15 October 2024 : चित्रा वाघ, पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी; निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडणार शपथविधी

11:23 (IST) 15 Oct 2024
दहावी बारावी शिष्यवृत्तीसाठी महापालिकेकडे आले ' इतके ' अर्ज

पुणे : महानगपालिकेच्या वतीने दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी महापालिकेकडे आतापर्यंत १३ हजार अर्ज आले आहेत.

सविस्तर वाचा...

11:15 (IST) 15 Oct 2024
कल्याण: किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळ संस्थेचा संचालक लाखाची लाच घेताना अटकेत

तक्रारदार शिक्षकाने या प्रकरणी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांना संपर्क केला.

सविस्तर वाचा...

11:13 (IST) 15 Oct 2024
सात आमदारांच्या नियुक्तीचं प्रकरण : उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली

सात आमदारांच्या नियुक्तीप्रकरणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण आधीच न्यायालयात असताना सरकारने आमदारांची केलेली नियुक्ती बेकायदा असल्याचा ठाकरे गटाने म्हटलं होतं. मात्र, न्यायालयाने या नियुक्तीला तत्काळ स्थगिती देण्यात नकार दिल्याची माहिती आहे.

11:06 (IST) 15 Oct 2024
विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्रकरणः दोन एक्स हँडलचा वापर करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची एक्स हँडलवर धमकी दिल्याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

11:00 (IST) 15 Oct 2024
शरद पवारांच्या हुशारीमुळे बाळासाहेबांची शिवसेना फुटली; रामदास कदमाची टीका

शिवसेना फुटली, ती फक्त शरद पवारांच्या हुशारीमुळे फुटली. त्यावेळी उद्धव ठाकरे काँग्रेस सोडायला तयार होते. मी सर्व आमदारांना मातोश्रीवर आणायला तयार होतो. पण त्यापूर्वी शरद पवार मातोश्रीवर पोहचले आणि उद्धव ठाकरे बदलले. बाळासाहेब ठाकरे असताना शरद पवारांना जे काम जमलं नाही, ते शरद पवारांनी आता करून दाखवलं, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

10:51 (IST) 15 Oct 2024

काँग्रेसकडे सर्वांना मान्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, तर आम्ही पाठिंबा देऊ- संजय राऊत

काँग्रेसकडे सर्वांना मान्य असा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी तो जाहीर करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. पण लोकांना एका चेहऱ्याची अपेक्षा नक्की असते. ज्यावेळी आम्ही भाजपाबरोबर युतीत होतो, तेव्हा ज्याचे जास्त आमदार त्याचे जास्त मुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते. त्यातून भाजपाने आमचे अनेक उमेदवार पाडले, कारण आमच्या आमदाराचा आकडा वाढू नये. भाजपाबरोबर आम्हाला वाईट अनुभव आहे. आमदार पाडण्याचा प्रकार गोपीनाथ मुंडे यांच्या काळातही झाला. तसेच तो देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही झाला, असा आरोप राऊत यांनी केला.

10:47 (IST) 15 Oct 2024
पंढरपूर: कार्तिकी यात्रेत भाविकांना सुविधा व मंदिर संवर्धन जलदगतीने; संतवाणी रेडिओ, ॲपद्वारे जगभरात संत परंपरा पोहोचविणार

भक्त निवास येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सविस्तर वाचा...

10:47 (IST) 15 Oct 2024
खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात वाढ नाही, शुल्क नियामक प्राधिकरणचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यातील खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे शुल्क नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा...

10:28 (IST) 15 Oct 2024
कोथरुडमध्ये गुंगीचे ओैषध देऊन ज्येष्ठ महिलेची लूट

पुणे : ज्येष्ठ महिलेला लिंबू सरबतातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्याकडील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना कोथरुड भागात घडली

सविस्तर वाचा...

10:18 (IST) 15 Oct 2024
ठाणे: महिलांसाठी राखीव असलेल्या वेळेतही तेजस्विनी धावते सर्वांसाठी, बस अपुऱ्या पडत असल्यामुळे परिवहन विभागाचा निर्णय

महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या वेळेत तेजस्विनी मधून पुरुषांनाही घेऊन जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

10:14 (IST) 15 Oct 2024

Maharashtra Assembly Election 2024 Date: अखेर प्रतिक्षा संपली; महाराष्ट्राच्या निवडणुका आज जाहीर होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची घोषणा

ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार? याची वाट राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष पाहत होते. अखेर तो दिवस आला आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा -

10:11 (IST) 15 Oct 2024
मुंबईतील किती टक्के जागा झोपडपट्ट्यांनी व्यापली आहे ?

मुंबई : आतापर्यंत किती क्षेत्र झोपडपट्टी अधिसूचित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे किंवा करणार आहात ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला केली. तसेच, या सगळ्यांची अद्ययावत माहिती सादर करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा...

09:59 (IST) 15 Oct 2024

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे.

09:53 (IST) 15 Oct 2024
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

काही दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाट एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता आता आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आज दुपारपर्यंत या दुसऱ्या आरोपीला पुण्यात आणलं जाईल, अशी माहिती आहे.

09:43 (IST) 15 Oct 2024
आज विधानपरिषदेच्या सात आमदारांचा शपथविधी

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. या सात आमदारांचा आज निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1846031940018913499

09:42 (IST) 15 Oct 2024
मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण, आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकार आता भूमिका मांडणार

सदावर्ते हे सध्या बिग बॉस या रियालिटी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यामुळे, ते सुनावणीसाठी अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आल्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सविस्तर वाचा...

09:42 (IST) 15 Oct 2024
सांगली: वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपबरोबर आघाडीतही अस्वस्थता

गेल्या पंधरा वर्षांपासून सावलीसारखे पालकमंत्री खाडे यांच्यासोबत प्रा. वनखंडे वावरत होते.

सविस्तर वाचा...

09:41 (IST) 15 Oct 2024
पिंपरी- चिंचवड: वर्दळीच्या डांगे चौकात कचऱ्याचे ढीग

अत्यंत वर्दळीच्या डांगे चौकात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा...

09:41 (IST) 15 Oct 2024
जयंत पाटील यांचा प्रचार करणार नाही – जितेंद्र पाटील; काँग्रेसच्या बळकावलेल्या इमारतीवरून वाद

काँग्रेसने ही इमारत उभी केली असून सध्या ही इमारत राष्ट्रवादीने (शरद पवार) बळकावली आहे. या ठिकाणी पक्षीय कोणतेही काम केले जात नाही, तरीसुध्दा कब्जा मात्र राष्ट्रवादीकडेच आहे.

सविस्तर वाचा...

09:40 (IST) 15 Oct 2024
पुण्यातील बड्या आयटी कंपनीकडून जल अन् ध्वनिप्रदूषण! स्थानिकांच्या तक्रारीनंतर अखेर दणका

खोदकाम करताना स्फोटकांचा वापर केला जात आहे. याबाबत कंपनीने ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.

सविस्तर वाचा...

09:40 (IST) 15 Oct 2024
सांगली: बिघडलेल्या हवामानाचा आले, हळदीला फटका; कंदकुजचा धोका बळावला, उत्पादन घटणार

बाजारात आल्याला मोठी मागणी असल्याने आणि नगदी पीक असल्याने लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.

सविस्तर वाचा...

09:39 (IST) 15 Oct 2024
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस ठाण्यांमध्ये वाढ, आता ‘इतकी’ ठाणी; गुन्हेगारी नियंत्रणात येणार का?

या पोलीस ठाण्यांसाठी अधिकारी व अंमलदारांची विविध संवर्गातील ३८६ पदे निर्माण करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा...

09:39 (IST) 15 Oct 2024
पिंपरी : प्रशासकीय राजवटीत विकासकामे सुसाट; दसऱ्यादिवशीही स्थायीची बैठक

ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचा तिढा आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर अशा विविध कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर गेल्या आहेत.

सविस्तर वाचा...

09:38 (IST) 15 Oct 2024
‘डेटिंग ॲप’च्या जाळ्यात ओढून लुटमार करणारी टोळी गजाआड, पुणे शहरासह, ग्रामीण भागात गुन्हे केल्याचे उघड

पुणे : समाज माध्यमातून मैत्रीचे आमिष दाखवून लूटणार करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या टोळीने पुणे शहरासह, ग्रामीण भागातील तरुणांना लुटल्याची माहिती उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा...

चित्रा वाघ ,पंकज भुजबळ (लोकसत्ता ग्राफिक टीम )

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यात भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.