Maharashtra Breaking News Live Updates, 15 October 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असून यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण :

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 15 October 2024 : चित्रा वाघ, पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी; निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडणार शपथविधी

09:40 (IST) 15 Oct 2024
सांगली: बिघडलेल्या हवामानाचा आले, हळदीला फटका; कंदकुजचा धोका बळावला, उत्पादन घटणार

बाजारात आल्याला मोठी मागणी असल्याने आणि नगदी पीक असल्याने लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.

सविस्तर वाचा…

09:39 (IST) 15 Oct 2024
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस ठाण्यांमध्ये वाढ, आता ‘इतकी’ ठाणी; गुन्हेगारी नियंत्रणात येणार का?

या पोलीस ठाण्यांसाठी अधिकारी व अंमलदारांची विविध संवर्गातील ३८६ पदे निर्माण करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा…

09:39 (IST) 15 Oct 2024
पिंपरी : प्रशासकीय राजवटीत विकासकामे सुसाट; दसऱ्यादिवशीही स्थायीची बैठक

ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचा तिढा आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर अशा विविध कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर गेल्या आहेत.

सविस्तर वाचा…

09:38 (IST) 15 Oct 2024
‘डेटिंग ॲप’च्या जाळ्यात ओढून लुटमार करणारी टोळी गजाआड, पुणे शहरासह, ग्रामीण भागात गुन्हे केल्याचे उघड

पुणे : समाज माध्यमातून मैत्रीचे आमिष दाखवून लूटणार करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या टोळीने पुणे शहरासह, ग्रामीण भागातील तरुणांना लुटल्याची माहिती उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

चित्रा वाघ ,पंकज भुजबळ (लोकसत्ता ग्राफिक टीम )

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यात भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.