Maharashtra Vidhan Sabha Election Date 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी महाराष्ट्राबरोबरच आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण :
Maharashtra Breaking News Live Today, 15 October 2024 : चित्रा वाघ, पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी; निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडणार शपथविधी
मुंबई : राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये असलेल्या रक्ताच्या साठ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या ई-रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची नोंदणी करणे रक्तपेढ्यांना बंधनकारक आहे.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी कार्यक्रम सुरू झाला आहे. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, बाबुसिंग महाराज राठोड, इद्रीस नाईकवाडी, विक्रांत पाटील, हेमंत पाटील, मनिषा कायंदे, पंकज भुजबळ या नेत्यांचा समावेश आहे.
दुकानदारांकडे सरकारी योजनेचे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
शेवटच्या घटका मोजत असलेल्या घटनाबाह्य सरकारने शेवटच्या दिवशी सुद्धा घटनेला तडे देण्याचे प्रयत्न सोडलेले नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय न्यायप्रविष्ट असताना देखील शेवटच्या दिवशी आमदार बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. केएफसीच्या गरुडा- अधिराप्रमाणे सर्व नियम कायदे बाजूला सारून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागणाऱ्या या संविधनविरोधी सरकारचा अंत केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. असो सरकारला सत्तेतून महाराष्ट्र हद्दपार करेल याची शाश्वती आली असावी आणि या भीतीतूनच आमदार नियुक्तीचा निर्णय घेतला असेल, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
शेवटच्या घटका मोजत असलेल्या घटनाबाह्य सरकारने शेवटच्या दिवशी सुद्धा घटनेला तडे देण्याचे प्रयत्न सोडलेले नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय न्यायप्रविष्ट असताना देखील शेवटच्या दिवशी आमदार बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.#KGF च्या गरुडा- अधिराप्रमाणे सर्व नियम कायदे बाजूला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 15, 2024
उरण : गेल्या आठवडा भर सायंकाळी सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पिकलेली भात पिके जमीनीवर आणि पावसात कोसळून कुजू लागल्याने उरण मधील शेतकऱ्यांच्यता हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे.
पुणे : महानगपालिकेच्या वतीने दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी महापालिकेकडे आतापर्यंत १३ हजार अर्ज आले आहेत.
तक्रारदार शिक्षकाने या प्रकरणी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांना संपर्क केला.
सात आमदारांच्या नियुक्तीप्रकरणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण आधीच न्यायालयात असताना सरकारने आमदारांची केलेली नियुक्ती बेकायदा असल्याचा ठाकरे गटाने म्हटलं होतं. मात्र, न्यायालयाने या नियुक्तीला तत्काळ स्थगिती देण्यात नकार दिल्याची माहिती आहे.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची एक्स हँडलवर धमकी दिल्याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेना फुटली, ती फक्त शरद पवारांच्या हुशारीमुळे फुटली. त्यावेळी उद्धव ठाकरे काँग्रेस सोडायला तयार होते. मी सर्व आमदारांना मातोश्रीवर आणायला तयार होतो. पण त्यापूर्वी शरद पवार मातोश्रीवर पोहचले आणि उद्धव ठाकरे बदलले. बाळासाहेब ठाकरे असताना शरद पवारांना जे काम जमलं नाही, ते शरद पवारांनी आता करून दाखवलं, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
काँग्रेसकडे सर्वांना मान्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, तर आम्ही पाठिंबा देऊ- संजय राऊत
काँग्रेसकडे सर्वांना मान्य असा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी तो जाहीर करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. पण लोकांना एका चेहऱ्याची अपेक्षा नक्की असते. ज्यावेळी आम्ही भाजपाबरोबर युतीत होतो, तेव्हा ज्याचे जास्त आमदार त्याचे जास्त मुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते. त्यातून भाजपाने आमचे अनेक उमेदवार पाडले, कारण आमच्या आमदाराचा आकडा वाढू नये. भाजपाबरोबर आम्हाला वाईट अनुभव आहे. आमदार पाडण्याचा प्रकार गोपीनाथ मुंडे यांच्या काळातही झाला. तसेच तो देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही झाला, असा आरोप राऊत यांनी केला.
भक्त निवास येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मुंबई : राज्यातील खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे शुल्क नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केले.
पुणे : ज्येष्ठ महिलेला लिंबू सरबतातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्याकडील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना कोथरुड भागात घडली
महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या वेळेत तेजस्विनी मधून पुरुषांनाही घेऊन जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात आरपीआयची हक्काची मतदारसंख्या लाखो आहे. मात्र, या मतदारांचे कायम विभाजन होत आले आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Date: अखेर प्रतिक्षा संपली; महाराष्ट्राच्या निवडणुका आज जाहीर होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची घोषणा
ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार? याची वाट राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष पाहत होते. अखेर तो दिवस आला आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुंबई : आतापर्यंत किती क्षेत्र झोपडपट्टी अधिसूचित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे किंवा करणार आहात ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला केली. तसेच, या सगळ्यांची अद्ययावत माहिती सादर करण्याचे आदेश दिले.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाट एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता आता आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आज दुपारपर्यंत या दुसऱ्या आरोपीला पुण्यात आणलं जाईल, अशी माहिती आहे.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. या सात आमदारांचा आज निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
Maharashtra | The swearing-in ceremony of 7 MLCs appointed by the Governor will be held at Vidhan Bhavan today at noon.
— ANI (@ANI) October 15, 2024
Deputy Chairperson of Maharashtra Legislative Council Dr. Neelam Gorhe will administer the oath
सदावर्ते हे सध्या बिग बॉस या रियालिटी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यामुळे, ते सुनावणीसाठी अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आल्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
गेल्या पंधरा वर्षांपासून सावलीसारखे पालकमंत्री खाडे यांच्यासोबत प्रा. वनखंडे वावरत होते.
अत्यंत वर्दळीच्या डांगे चौकात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.
काँग्रेसने ही इमारत उभी केली असून सध्या ही इमारत राष्ट्रवादीने (शरद पवार) बळकावली आहे. या ठिकाणी पक्षीय कोणतेही काम केले जात नाही, तरीसुध्दा कब्जा मात्र राष्ट्रवादीकडेच आहे.
खोदकाम करताना स्फोटकांचा वापर केला जात आहे. याबाबत कंपनीने ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.
बाजारात आल्याला मोठी मागणी असल्याने आणि नगदी पीक असल्याने लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.
या पोलीस ठाण्यांसाठी अधिकारी व अंमलदारांची विविध संवर्गातील ३८६ पदे निर्माण करण्यात आली आहेत.
ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचा तिढा आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर अशा विविध कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर गेल्या आहेत.
पुणे : समाज माध्यमातून मैत्रीचे आमिष दाखवून लूटणार करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या टोळीने पुणे शहरासह, ग्रामीण भागातील तरुणांना लुटल्याची माहिती उघडकीस आली आहे.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यात भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.