Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates Today : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्यभर प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेस नेते राज्यभर फिरत आहेत, जनतेशी संवाद साधत आहेत. यादरम्यान, एकमेकांवर टिकाटिप्पणी करत आहेत. दरम्यान, रविवारी (१० नोव्हेंबर) महाविकास आघाडी व महायुतीने त्यांचे निवडणुकीचे जाहीरनामे प्रसिद्ध केले. या जाहिरनाम्यांद्वारे मोठमोठी आश्वासनं देण्याची स्पर्धा चालू होती. दरम्यान, अशा राजकीय घडामोडी आजही पाहायला मिळणार आहेत. या सर्व राजकीय व सामाजिक घडामोडींवर आपलं लक्ष असेल. यासंदर्भातील सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra News Today, 11 November 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

20:19 (IST) 11 Nov 2024
लांब पल्ल्याच्या गाड्यांना भाईंदरमध्ये थांबा मिळणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन

भाईंदर गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भाईंदर स्थानकात थांबवण्यात येतील अशी माहिती अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

सविस्तर वाचा...

20:04 (IST) 11 Nov 2024

निर्धार मेळाव्यात प्रहार पक्षाचा सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल नाराज शिवसैनिक शिवसैनिक धनंजय गावडे यांच्यासोबत

वसई- प्रहार जनशक्ती पक्षाने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात बविआच्या कारभारावर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार धनंजय गावडे यांना पाठिंबा दिला असून खुलेआम प्रचार सुरू केला आहे.

20:04 (IST) 11 Nov 2024

"आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

मेळाव्या दरम्यान अजित गव्हाणे हे नक्कीच आमदार होतील. असं म्हणत असतानाच 'अजित भाऊ' हा उल्लेख घेणे टाळले. सुप्रिया सुळेंनी अजित दामोदर गव्हाणे असा उल्लेख केला.

सविस्तर वाचा...

19:30 (IST) 11 Nov 2024
“महाराष्ट्र लुटणाऱ्या मोदी, शहांचे हेलिकॉप्टर तपासा,” उद्धव ठाकरेंचा संताप…

अकोला : आम्हाला जे कायदे लागू आहेत, ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील लागू राहिले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांची येताना नव्हे, तर जातांना तपासणी करा. महाराष्ट्र लुटून ते नेत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वाशीम येथे केला.

सविस्तर वाचा...

18:55 (IST) 11 Nov 2024

रायगडमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण याचा गोंधळ सूरूच; शेकाप उमेदवारावर कारवाईची शिवसेनेची मागणी

अलिबाग- विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर आली तरी रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवार कोण याबाबत स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे घटक पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. उरण, पेण आणि पनवेल मतदारसंघात शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि शेकाप दोन्ही पक्षांकडून आपलेच उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत असल्याचा दावा केला जात असल्याने, गोंधळाचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा

18:52 (IST) 11 Nov 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चक्क ‘क्रेन ऑपरेटर’; खात्यात केवळ दोन हजार रुपये, दीड लाखांवर कर्ज…

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात देवेंद् फडणवीस यांच्या विरोधात एका उमेदवाराचे नाव चर्चेत आहे. फडणवीस यांना आव्हान देणारा नितीन गायकवाड नावाचा उमेदवार हा क्रेन ऑपरेटर असून सातारा येथील रहिवासी आहे.

वाचा सविस्तर...

18:47 (IST) 11 Nov 2024
भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराला वंचितचे बळ, ‘कोणाच्या’अडचणी वाढणार…

अकोला : वंचित आघाडीने आज भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. वंचितच्या भूमिकेमुळे मतदारसंघातील लढतीवर परिणाम होणार असून भाजपसह काँग्रेसच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

18:43 (IST) 11 Nov 2024
भाईंदर : नरेंद्र मेहता यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर, कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्याने जैन यांचे ठिय्या आंदोलन

भाईंदर :- माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर प्रसारीत केल्याप्रकरणी आमदार गीता जैन यांच्या छायाचित्रकारावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सोमवारी ताब्यात घेण्यात आले. मात्र पोलिसांनी सूडबुद्धीने आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा आरोप करत जैन यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले.

सविस्तर वाचा....

18:27 (IST) 11 Nov 2024
मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला

यवतमाळ : दारव्हा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आयोजित सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा...

18:19 (IST) 11 Nov 2024

परभणी जिल्ह्यात बंडखोरांवर कारवाई नाहीच

परभणी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये ठळक उमेदवारांनी आपापल्या पक्षाशी बंडखोरी केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षाशी द्रोह करणाऱ्या या उमेदवारांवर अद्यापही त्या- त्या पक्षांनी मात्र शिस्तभंगाची कारवाई केली नाही. मतदान आठवड्यावर आलेले असताना या बंडखोर उमेदवारांचा प्रचारही रंगात आहे.

सविस्तर वाचा

18:19 (IST) 11 Nov 2024

भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!

भंडारा : भंडारा विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसच्या पूजा ठवकर, शिंदेसेनेचे नरेंद्र भोंडेकर आणि अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार असला तरी अपक्ष उमेदवारांचेही त्यांच्यासमोर आव्हान आहे.शिवसेना शिंदे गटाने तीव्र विरोध असतानाही महायुतीकडून नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी दिल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली खदखद कायम आहे, तर आघाडीच्या उमेदवार पूजा ठवकर यांच्या उमेदवारीवरून स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

सविस्तर वाचा

18:07 (IST) 11 Nov 2024

गोंदियात प्रचाराची पातळी खालावली, एक म्हणतो कंत्राटदार, दुसरा म्हणतो भूमिपूजनदास

गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघात उमेदवार व त्यांच्या समर्थकाच्या प्रचाराची पातळी खालावली आहे.उमेदवारांनी परस्परांवर आरोपांची चिखलफेक सुरू केली आहे.

सवि्स्तर वाचा...

17:47 (IST) 11 Nov 2024
मुंबई : दिव्यांग मतदारांसाठी ९०० वाहने, मतदान केंद्रांवर व्हीलचेअर आणि मदतीसाठी स्वयंसेवकांची फौज

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. तसेच, मतदानाच्या दिवशी दिव्यांगांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ९९७ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. या सुविधांबाबत अधिक माहितीसाठी मदत क्रमांक १०९५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरात एकूण १७ हजार ५४० आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ६ हजार ३८७ असे मिळून एकूण २३ हजार ९२७ दिव्यांग मतदार आहेत. मुंबई उपनगरात दिव्यांग मतदारांसाठी ६१३ वाहतूक व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणांवर एकूण ९२७ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच, मुंबई शहरात दिव्यांग मतदारांसाठी ६७१ वाहतूक व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणांवर एकूण ७० वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. ही वाहने ३५ ‘रिंग रुट’ आणि ‘शटल रुट’वर सेवा देतील. यात दिव्यांग मतदारांसाठी सुलभ असलेल्या बसेस, रिक्षा आणि इकोव्हॅनचा समावेश आहे. दरम्यान, २ हजार ८५ मतदान केंद्रांच्या ठिकाणी २ हजार ५४९ व्हीलचेअर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान, व्हीलचेअरवरून दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या आत ने-आण करण्यासाठी तसेच अन्य मदतीसाठी एकूण २ हजार ८५ दिव्यांग मित्र, तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

17:32 (IST) 11 Nov 2024

मेहकरात वाटपासाठी ४० खोके आलेत, प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही पन्नास खोके गाजताहेत. नेते सांगायचे विसरले तरी ठाकरे गटाचे शिवसैनिक हा नारा देत नेत्याला त्याची आठवण करून देतात.

सविस्तर वाचा...

17:26 (IST) 11 Nov 2024

"महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळल्याने चांगलं सर्वेक्षण दाखवलं", रोहित पवारांचा चिमटा

एका सर्वेक्षणात असं सांगण्यात आलं आहे की राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती अधिक जाग जिंकू शकते. त्यावर आमदार रोहित पवार म्हणाले, महायुतीने सर्वे केला असेल तर त्यांना अधिकच्या जागा दाखवाव्या लागतील. महायुतीचे नेते त्यांच्या मतदारसंघातून बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळायला लागलं आहे. त्यामुळे चांगला सर्वे दाखवून कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याचं काम केलं जात आहे

17:14 (IST) 11 Nov 2024
गडचिरोलीत महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार? शेतकरी कामगार पक्षाचा दावा…

गडचिरोली :राज्यातील महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष शेतकरी कामगार पक्षाने राज्यात अधिकृत उमेदवारी दिलेल्याना आता महाविकास आघाडी - इंडिया आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

सविस्तर वाचा...

16:58 (IST) 11 Nov 2024
वंचितच्या भूमिकेमुळे ‘अकोला पश्चिम’चे समीकरण बदलणार

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेनंतर राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.’वंचित’ने भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे वंचितचे गठ्ठा मतदान अपक्ष उमेदवाराकडे वळण्याची शक्यता असून मतदारसंघातील गणित बदलणार आहेत.

वाचा सविस्तर...

16:57 (IST) 11 Nov 2024
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!

भंडारा : भंडारा विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसच्या पूजा ठवकर, शिंदेसेनेचे नरेंद्र भोंडेकर आणि अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार असला तरी अपक्ष उमेदवारांचेही त्यांच्यासमोर आव्हान आहे.

वाचा सविस्तर...

15:50 (IST) 11 Nov 2024
"एमआयएम रझाकारांची संघटना'; ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

अंबादास दानवे म्हणाले, संजय शिरसाट यांनी राजू शिंदेंवर ते एमआयएमचे असल्याचे आरोप केले, परंतु, मी म्हणतो एमआयएम ही संघटना भारतीय जनता पार्टीला मदत करणारी आहे. मुस्लिम मतदान आम्हाला न पडता एमआयएमलाच पडावे असा प्रयत्न एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी करत आहे. जिल्ह्यातील नऊच्या नऊ जागी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा आमचा विश्वास आहे. एमआयएम ही संघटना पूर्ण रझाकारांची संघटना आहे. मी मुस्लिम समाजाला सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा एमआयएमकडे जाऊ नका. कारण त्यांच्याकडून काहीही होणार नाही.

15:40 (IST) 11 Nov 2024
गेवराईत नात्या-गोत्यांमध्येच प्रमुख लढत

छत्रपती संभाजीनगर : बीडमधील गेवराई विधानसभा मतदारसंघात काका-पुतणे आणि मेहुणे, अशा नात्यांमधील तीन प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत होत असून, प्रतिस्पर्ध्यांच्या मतांची वजाबाकी अधिक कोण करेल त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

वाचा सविस्तर...

15:40 (IST) 11 Nov 2024
निलंग्यात गुंडगिरी, दहशतीवरून आरोप प्रत्यारोप

लातूर : निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपाकडून एकमेकांवर गुंडगिरी व दहशतीचे आरोप केले जात आहेत. मात्र मतदारसंघातील लोक नेमकी गुंडगिरी कोणाची याबद्दल चांगलेच संभ्रमात असून त्याची रसभरीत चर्चा गावोगावी सुरू आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने यावेळी निलंगेकर घराण्या व्यतिरिक्त अभय साळुंके यांना उमेदवारी दिली आहे. अभय साळुंके हे मनसे, शिवसेना व काँग्रेस असा प्रवास केलेले कार्यकर्ते आहेत.

वाचा सविस्तर...

15:39 (IST) 11 Nov 2024

उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावरून वणीत वातावरण तापले

यवतमाळ : वणी येथे सोमवारी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेसाठी आले असताना हेलिपॅडवर उतरताच त्यांच्या ताफ्यातील बॅग तपासण्यात आल्या.

सविस्तर वाचा...

15:20 (IST) 11 Nov 2024
रत्नागिरी : राजापुर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे अविनाश लाड यांचे पक्षांकडून निलंबन

रत्नागिरी : महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी करुन अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेले कॉंग्रेसचे अविनाश लाड यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

15:18 (IST) 11 Nov 2024
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण

नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिका हद्दीतील सर्व १६७६ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून घडामोडींचे थेट प्रक्षेपण (वेबकास्ट) करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

15:06 (IST) 11 Nov 2024
विचार करण्याची हीच ती वेळ…

राज्याच्या विधानसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात पोहोचेल. तोपर्यंत पुण्यासारख्या एकेकाळी सुसंकृत वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या शहरात प्रचाराचा जो धुराळा उडालेला असेल, तो मतदारांना सहन करण्यावाचून पर्याय नसेल.

सविस्तर वाचा....

15:06 (IST) 11 Nov 2024
भाजपच्या जाहिरातीत सर्व जातींच्या टोप्या…एक टोपी मात्र मुद्दाम…

नागपूर : सोमवारी सर्व प्रमुख दैनिकांमध्ये उमटलेल्या भाजपच्या जाहिरातीत ‘एक है, तो सेेफ हैं’ या वाक्यात महाराष्ट्राच्या प्रमुख समाजाचे प्रतीक असलेल्या टोप्यांचे चित्र पेरले आहे.

सविस्तर वाचा...

14:32 (IST) 11 Nov 2024

अतिलोकशाही गैर न मानणारा काँग्रेस पक्ष यावेळी मात्र कठोर…एका झटक्यात तब्बल २८…

नागपूर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या विविध मतदारसंघातील एकूण २८ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

14:31 (IST) 11 Nov 2024
विदर्भाच्या राजकारणातील ‘भीष्माचार्य’ प्रथमच निवडणूक चक्राबाहेर

वर्धा: राजकारणात ४५ वर्ष घालवतांना लोकसभा ते नगरपालिका अशा सर्व निवडणुकीत सक्रिय सहभागी होणारे व्यक्तिमत्व आणि समाजवादी काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी व आता भाजप असा चौफेर राजकीय प्रवास पूर्ण करीत प्रकृती अस्वस्थमुळे केवळ संवाद साधण्यापुरते सक्षम असलेले दत्ता मेघे यावेळी प्रथमच आयुष्यात राजकारणावर मौन बाळगून आहेत.

वाचा सविस्तर...

14:11 (IST) 11 Nov 2024
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा सुरू होऊन एक महिना होत नाही तोच या मार्गिकेवरील मेट्रो गाडी भुयारातच बंद पडण्याची घटना घडली आहे. बीकेसीच्या दिशेने जाणारी मेट्रो रात्री पावणेआठच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे दोन मेट्रो स्थानकांच्या मध्ये भुयारात बंद पडली. अचानक मेट्रो भुयारातच बंद पडल्याने प्रवासी गाडीत अडकले आणि एकच गोंधळ सुरू झाला.

सविस्तर वाचा....

13:42 (IST) 11 Nov 2024
अमरावती : विरोधाभासी राजकारणामुळे मतदारही संभ्रमित !

अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला आहे, पण दर्यापुरातून त्‍यांच्‍या पक्षाने महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्‍या उमेदवाराविरोधात मैदानात उडी घेतली आहे. राजकारणातील या विरोधाभासामुळे मतदारही संभ्रमित झाले आहेत.

वाचा सविस्तर...