Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates Today : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्यभर प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेस नेते राज्यभर फिरत आहेत, जनतेशी संवाद साधत आहेत. यादरम्यान, एकमेकांवर टिकाटिप्पणी करत आहेत. दरम्यान, रविवारी (१० नोव्हेंबर) महाविकास आघाडी व महायुतीने त्यांचे निवडणुकीचे जाहीरनामे प्रसिद्ध केले. या जाहिरनाम्यांद्वारे मोठमोठी आश्वासनं देण्याची स्पर्धा चालू होती. दरम्यान, अशा राजकीय घडामोडी आजही पाहायला मिळणार आहेत. या सर्व राजकीय व सामाजिक घडामोडींवर आपलं लक्ष असेल. यासंदर्भातील सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 11 November 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

13:31 (IST) 11 Nov 2024
“अमित ठाकरे लहान, त्यांनी शांतपणे…”, संजय राऊतांचा खोचक सल्ला

मनसेचे माहीम-दादर विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी प्रचारादरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर माझ्या काकांना धक्का बसला असं अमित ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, अमित ठाकरे वयाने लहान आहेत, ते निवडणूक लढवत आहेत, त्यांनी निवडणूक शांतपणे लढवावी. आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.

13:30 (IST) 11 Nov 2024

गुजरातच्‍या ‘पटेलां’चे अमरावतीच्‍या निवडणुकीवर लक्ष !

अमरावती : भाजपचे अमरावती जिल्‍ह्याचे निरीक्षक म्‍हणून ऋषिकेश पटेल हे सध्‍या जागोजागी कार्यकर्त्‍यांच्‍या बैठका घेत आहेत.

सविस्तर वाचा…

12:46 (IST) 11 Nov 2024
‘मविआ’च्या उमेदवारांना काँग्रेसच्या बंडखोरीचा फटका बसणार!

नागपूर : पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विरोधात बहुतांश ठिकाणी काँग्रेसने बंडखोरी केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचारात सहकार्य केले जात नसल्याची ओरड होत आहे. यामुळे आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

12:46 (IST) 11 Nov 2024
साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई

सातारा: सातारा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. मात्र पक्ष फुटीनंतर आणि मागील काही वर्षात भाजपाने केलेल्या पक्ष बांधणीनंतर या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची अस्तित्वासाठी लढाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.

वाचा सविस्तर…

12:17 (IST) 11 Nov 2024
काँग्रेस उमेदवाराच्या मांसाहार पार्टीत एकाचा मृत्यू

वरोरा मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मांसाहार पार्टीत दोन मद्यधुंद कार्यकर्ते विहिरीत पडले. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

वाचा सविस्तर…

11:58 (IST) 11 Nov 2024
राज्यात हरियाणा प्रारुपाचा प्रयोग शक्य झाला का ? उमेदवारांच्या संख्येत २८ टक्के वाढ

राज्यात सत्ताधारी पक्षाच्या विरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी हरियाणा प्रारुपाचा प्रयोग करण्याच्या चर्चा सुरू होत्या. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर यात किती यश आले हे तपासल्यास गत निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत २८ टक्के उमेदवारांची संख्या वाढली.

वाचा सविस्तर…

11:43 (IST) 11 Nov 2024
संचालकांवर जबाबदारी निश्चितीचा आदेश बेकायदेशीर, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकसानीप्रकरणी दिलीप सोपल यांचा आरोप

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या ११०३ कोटी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी बँकेच्या तत्कालीन ३२ संचालकांसह इतर अधिकाऱ्यांवर निश्चित करून त्यांच्याकडून कर्ज वसुली करण्याचा आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिला आहे. या आदेशाला बँकेचे माजी अध्यक्ष तथा बार्शी विधानसभा निवडणुकीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप सोपल यांनी जोरदार हरकत घेतली आहे. हा आदेश सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली, घाईगडबडीत आणि विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोप सोपल यांनी केला आहे.

11:41 (IST) 11 Nov 2024
महायुतीत नाराजी टाळण्यासाठीच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर?

मुंबई : महायुतीमध्ये नाराजी किंवा शह-काटशहाचे राजकारण होवू नये आणि मराठा समाजाच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू नये, यासाठी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच घेण्याची भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

वाचा सविस्तर…

11:23 (IST) 11 Nov 2024
‘कसब्या’तील धड्यातून पुण्यात भाजपचे ‘ब्राह्मण जोडो’

पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत महायुतीचा एकही ब्राह्मण उमेदवार नसला, तरी शहरात मोठी लोकसंख्या असलेल्या या समाजाची मते महायुतीकडे वळावीत, यासाठी विशेषत: भारतीय जनता पक्षाने ‘सूक्ष्म’ नियोजन केले आहे. ब्राह्मण समाज महायुतीलाच मतदान करील, असा आत्मविश्वास बाळगूनसुद्धा भाजपला दोन वर्षांपूर्वी ‘कसब्या’सारख्या बालेकिल्ल्यात पोटनिवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते.

वाचा सविस्तर…

11:20 (IST) 11 Nov 2024
हिंगण्यात मेघेंची हॅटट्रिक बंग रोखणार ?

सलग दोन वेळा हिंगणा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे समीर मेघे विजयाची हॅटट्रिक करणार की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) रमेश बंग त्यांना रोखणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

वाचा सविस्तर….

10:17 (IST) 11 Nov 2024
“त्या जिराफाने गद्दारी केली, लांब ढेंगा टाकत…”, संजय राऊतांचा रोख कोणाकडे? शिंदेंच्या जवळच्या नेत्यावर टीका

नवी मुंबईत आयोजित एका प्रचारसभेत बोलताना शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्यावर टीका केली. राऊत म्हणाले, “कधी कधी वाईटातून चांगल घडतं. त्या जिराफाने गद्दारी केली. असा लांब लांब ढेंगा टाकत जिराफा सारखा चालायचा. मागे पाटणला (जिल्हा – सातारा) आलो तेव्हा लोकांनी सांगितलं ते जिराफ आहेत म्हणून. वाईटातून चांगलं कसं घडतं बघा, त्यांनी बेईमानी केल्यामुळे पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर आली”.

“सत्यजित पाटणकर, शंभूराज देसाई ही आपली शेवटची निवडणूक (२०२४) असल्याचे सांगतायत. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही काय म्हातारे झालात काय? तुमची ही शेवटची निवडणूक आहे कारण एकदा हर्षद कदम निवडून आला तर पुढची २५ वर्षे तो हलणार नाही. शंभूराज देसाई याच खातं सर्वात भ्रष्ट आहे. लाज वाटली पाहिजे त्या माणसाला. एकनाथ शिंदे अभिमानाने सांगतात की हा माणूस माझ्यापेक्षा दोन पावलं पुढे होता. टांगाच मोठ्या आहेत त्यांच्या. त्यामुळे ते दोन पावलं पुढे असणारच”.