Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना येत्या २० नोव्हेंबरला रंगणार आहे. त्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने बीकेसी मैदानात सभा घेतली. या सभेत राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. या सभेत राहुल गांधी यांनी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. ज्याअंतर्गत महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली. तसंच उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यातल्या शिवाजी मंदिराच्या आव्हानावरुन पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. तर शरद पवार यांनी कृषी संवर्धन योजनेची घोषणा केली. शरद पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. शरद पवारांच्या तीन सभा नागपूरमध्ये होणार आहेत. तसंच महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे असंही शरद पवार म्हणाले आहेत. यासह सगळ्याच घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 07 November 2024 विधानसभेची रणधुमाळी सुरु, शरद पवारांच्या नागपुरात तीन प्रचारसभा, यांसह महत्वाच्या बातम्या

18:25 (IST) 7 Nov 2024
“राज्‍यात तीन भाऊ, मिळून महाराष्‍ट्र खाऊ…”, उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका

आपण तिघे भाऊ, मिळून महाराष्‍ट्र खाऊ, असेच त्‍यांचे वर्तन आहे, अशी टीका माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्यापूर येथे बोलताना केली.

सविस्तर वाचा...

18:13 (IST) 7 Nov 2024
“हफ्ते घेणारे नव्हे; हफ्ते देणारे आमचे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

मतदानानंतर लगेच लाडक्या बहिणीचे डिसेंबरचे पैसे सुद्धा टाकणार आहोत. बहिणींना लखपती झाल्याचे बघायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सविस्तर वाचा...

17:39 (IST) 7 Nov 2024
नाशिक : जिल्ह्यातील १०७ गुन्हेगारांना मतदार संघात प्रवेशास मनाई

जिल्ह्यातील १०७ गुन्हेगारांना निवडणूक कालावधीत मतदार संघात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

17:33 (IST) 7 Nov 2024
त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली

विधानसभेच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आपल्या कर्तबगारीपेक्षा धार्मिक आधार महत्वाचा वाटू लागल्याने त्र्यंबक नगरीकडे अशा मंडळींची ये-जा वाढली आहे.

वाचा सविस्तर...

17:31 (IST) 7 Nov 2024
सोलापुरात मोदी, उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी प्रचारसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकाच दिवशी सोलापुरात प्रचार सभांसाठी येत आहेत. त्या वेळी या दोन्ही नेत्यांची राजकीय जुगलबंदी पाहावयास मिळणार आहे.

वाचा सविस्तर...

17:28 (IST) 7 Nov 2024
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, तब्येतीची केली विचारपूस

शिवाजीनगर येथील प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन अजित पवार यांनी तब्येतीची विचारपूस केली.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 7 Nov 2024
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…

तेलंगना व महाराष्ट्र सीमेवरील चौदा वादग्रस्त गावांतील पाच हजार मतदार दोन वर्षात चौथ्यांदा मतदान करणार आहे.

सविस्तर वाचा...

16:33 (IST) 7 Nov 2024
महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंशी खुल्या चर्चेची तयारी

सोलापूर : महाराष्ट्र राज्यातून अनेक उद्योग प्रकल्प गुजरातसह अन्य राज्यांमध्ये चालले आहेत, हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चालविलेला आरोप तद्दन खोटा आहे. उलट महायुती सरकारच्या काळात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग प्रकल्प वाढले आहेत, असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी खुली चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारासाठी दानवे यांनी दौरा केला. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला किमान १८० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

16:06 (IST) 7 Nov 2024
भाजप देशद्रोही पक्ष – योगेंद्र यादव

या देशात भाजप हा एक देशद्रोही पक्ष असल्याचं वक्तव्य योगेंद्र यादव यांनी बुधवारी ठाण्यात केले.

सविस्तर वाचा...

15:48 (IST) 7 Nov 2024
सदाभाऊ खोत भाजपचं पाळलेलं कुत्र; अजित पवारांच्या माजी आमदारांची जीभ घसरली!

पिंपरी- चिंचवड: सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना अजित पवारांचे निकटवर्तीय माजी आमदार विलास लांडे यांची जीभ घसरली आहे. सदाभाऊ खोत हे भाजपने पाळलेलं कुत्र असल्याची टीका लांडे यांनी केली. शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर स्वतः अजित पवार यांनी देखील नाराजी व्यक्त करत शरद पवारांवरील वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत. असा इशारा दिला होता. अखेर याबाबत माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

15:45 (IST) 7 Nov 2024
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत नितीन गडकरींचे कौतुक; नागपुरातील उद्धव ठाकरे गटाचे…

मध्य नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयचित मंदीर चौकात सभा झाली.

सविस्तर वाचा...

15:32 (IST) 7 Nov 2024
प्रथमच असे घडणार ! शरद पवार यांच्या सभेत हिंगणघाटचे ‘शरद पवार’ गैरहजर राहणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या शुक्रवार रोजी आयोजित सभेसाठी येणार आहेत. हिंगणघाट येथे पक्षाचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते हजर होतील तेव्हा नेहमीचे चेहरे त्यांना दिसणार नाहीत.

सविस्तर वाचा...

14:55 (IST) 7 Nov 2024
नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तपोवनातील मैदानात ही सभा होत आहे. सभेसाठी शहर आणि ग्रामीण भागातून नागरिक वाहनाने मोठ्या प्रमाणात दाखल होतील.

सविस्तर वाचा...

14:42 (IST) 7 Nov 2024
वाशीम जिल्ह्यात तिरंगी-चौरंगी सामने; जातीय समीकरण, मतविभाजन कुणाच्या पथ्यावर?

विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात काट्याची लढत आहे. महायुती व मविआला बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याने वाशीम, रिसोड व कारंजा मतदारसंघात तिरंगी-चौरंगी सामने होणार आहेत.

वाचा सविस्तर...

14:42 (IST) 7 Nov 2024
पंतप्रधानांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन, तपोवनातील मैदानावर जय्यत तयारी

सभेला एक लाख जणांना जमविण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने नियोजन प्रगतीपथावर आहे. या तयारीचा आढावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून घेतला.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 7 Nov 2024
सांगलीतील काँग्रेसअंतर्गत बंडखोरीमागे षडयंत्र, पृथ्वीराज पाटील यांची बंडखोरांसह भाजपवर टीका

सांगली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत बंडखोरीचे षडयंत्र भाजपकडून गेली सहा महिने शिजत होते, असा आरोप काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केला.

सविस्तर वाचा...

14:17 (IST) 7 Nov 2024
भाजपपुढे लोकसभेतील पिछाडी दूर करण्याचे आव्हान, गडचिरोलीत उमेदवार बदलला, आरमोरीत अडचण

आरमोरी आणि गडचिरोलीत भाजपचे आमदार असतानाही काँग्रेसला मिळालेले मताधिक्य लक्षणीय होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे लोकसभेतील पिछाडी दूर करण्याचे आव्हान आहे.

वाचा सविस्तर...

14:15 (IST) 7 Nov 2024
अखेर काँग्रेसनेही घेतला कठोर निर्णय…माजी मंत्र्यांसह तब्बल सहा…

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी आम्ही काल जाहीर केल्या आहेत.

सविस्तर वाचा...

13:55 (IST) 7 Nov 2024
जळगाव जिल्ह्यात बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव, माजी खासदारास अभय

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी न ऐकणाऱ्या बंडखोरांसाठी पक्षाची दारे सहा वर्षांसाठी बंद होतील, असा इशारा अर्ज माघारीच्या एक दिवस आधीच दिला होता.

सविस्तर वाचा...

13:48 (IST) 7 Nov 2024
लोकसभेतील मताधिक्य कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान, भाजपला चिंता

चंद्रपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदानाची गणिते वेगळी असतात, ही वस्तुस्थिती असली तरी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत मिळालेले मताधिक्य भाजपसाठी चिंता व चिंतनाचा विषय ठरले आहे.

वाचा सविस्तर...

13:35 (IST) 7 Nov 2024
निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षप्रवेश, समर्थन अन् जेवणावळींना वेग

चंद्रपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत विविध पक्षांत प्रवेश, समर्थन, मांसाहारी आणि शाकाहारी जेवणावळी तथा दिवाळी फराळ, चहा, नास्त्यांच्या कार्यक्रमांना जोर आला आहे.

वाचा सविस्तर...

13:34 (IST) 7 Nov 2024
गडचिरोली, आरमोरीत थेट; अहेरीत तिरंगी लढत

जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोलीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार असून अहेरीत मात्र तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

13:27 (IST) 7 Nov 2024
विधानसभेसाठी उत्तरप्रदेश मधील नेतेही मैदानात ! पुण्यातील येरवडा भागात १७ नोव्हेंबरला होणार सभा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील विविध भागात महत्वाच्या राजकीय नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले आहे. सविस्तर वाचा…

13:26 (IST) 7 Nov 2024
पाणी नाही तर मत नाही; अंबरनाथमध्ये पाण्यापासून वंचित मतदार बहिष्कारच्या भूमिकेत

अंबरनाथ शहरातील पाण्याच्या समस्येला त्रासलेल्या मतदारांनी पाणी नाही तर मत नाही अशी भूमिका घेतली आहे अंबरनाथ पश्चिम येथील पटेल प्रयोशा योगिनिवास या गृह संकुलातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मतदानावर बहिष्कारचा इशारा दिला आहे गेल्या आठ वर्षांपासून पाणी समस्यांनी त्रासलेले असून प्रशासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमची प्रश्न सुटले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा…

13:26 (IST) 7 Nov 2024
राजुरा मतदारसंघात सत्तरीपार आजी-माजी आमदारांत लढत

चंद्रपूर : राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे व शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्यातील लढत रंगतदार होणार आहे. वयाची ७४ व ७३ वर्षे पूर्ण केलेल्या या दोन्ही उमेदवारांची प्रचारात चांगलीच दमछाक होत आहे.

वाचा सविस्तर...

13:13 (IST) 7 Nov 2024
यवतमाळ : कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, भाजप कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हा

वणी येथील भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात एका भाजप कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.

सविस्तर वाचा...

12:45 (IST) 7 Nov 2024
बुलढाणा: डॉक्टर झाले, पण राजकारणात रमले! श्रद्धा टापरे ठरल्या आद्य डॉक्टर आमदार; यंदाही नऊ जण रिंगणात

अभ्यासात हुशार असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाले पण राजकारणात आले अन राजकारण , आमदारकीत रमले असे अनेक नेते जिल्ह्यात कार्यरत आहेत.

सविस्तर वाचा...

12:35 (IST) 7 Nov 2024
जातीय जनगणना, आरक्षण मर्यादेवर शरद पवार थेटच बोलले, “मागील तीन वर्षांपासून ..”

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे आहे आणि जनता ते करून दाखवणार, असा विश्वास व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

11:56 (IST) 7 Nov 2024
बंडखोरांना सहा वर्षे निवडणूक बंदी- शहर काँग्रेसचा प्रस्ताव

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांवर सहा वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा प्रस्ताव शहर काँग्रेसकडून प्रदेशला पाठविण्यात आला आहे . सविस्तर वाचा…

11:55 (IST) 7 Nov 2024
निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा; वाचा कुठे घडला हा प्रकार?

मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशिक्षणाबाबत दिलेले आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध राष्ट्रीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना येत्या २० नोव्हेंबरला रंगणार आहे. त्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने बीकेसी मैदानात सभा घेतली.

MVA Five Big Promises For Maharashtra

महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीने दिलेली पाच वचनं काय ? (फोटो-प्रदीप दास, इंडियन एक्स्प्रेस)