Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना येत्या २० नोव्हेंबरला रंगणार आहे. त्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने बीकेसी मैदानात सभा घेतली. या सभेत राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. या सभेत राहुल गांधी यांनी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. ज्याअंतर्गत महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली. तसंच उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यातल्या शिवाजी मंदिराच्या आव्हानावरुन पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. तर शरद पवार यांनी कृषी संवर्धन योजनेची घोषणा केली. शरद पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. शरद पवारांच्या तीन सभा नागपूरमध्ये होणार आहेत. तसंच महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे असंही शरद पवार म्हणाले आहेत. यासह सगळ्याच घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 07 November 2024 विधानसभेची रणधुमाळी सुरु, शरद पवारांच्या नागपुरात तीन प्रचारसभा, यांसह महत्वाच्या बातम्या

11:54 (IST) 7 Nov 2024
कसब्या’ची ९८ वर्षांपूर्वीची बिनविरोध निवडणूक…

निवडणूक म्हटली, की उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी, प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा, मतदारांना आश्वासने… हे सर्व झाल्याशिवाय निवडणूक झाली, असे मतदारांनाही वाटत नाही. अशा वातावरणात निवडणूक बिनविरोध होणे, हे अगदीच दुरापास्त.

सविस्तर वाचा…

11:53 (IST) 7 Nov 2024
Kolhapur Assembly Election 2024 : कोल्हापूरमधील काँग्रेसच्या माघारनाट्याने निकालाची समीकरणे बदलणार ?

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विजयाचा भरवसा ठेवून उमेदवारी बदलली गेली. त्याच उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने कॉंग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील एकंदरीत भूमिकेच्या अपकीर्तीची जोरदार चर्चा रंगली. सविस्तर वाचा…

11:52 (IST) 7 Nov 2024
Shirala Assembly Constituency : शिराळ्यात जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक

नागभूमी अशी जागतिक पातळीवर ओळख असलेल्या शिराळ्यात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. सविस्तर वाचा…

11:52 (IST) 7 Nov 2024
महायुती, महाविकास आघाडीत ‘गॅरंटी’ची स्पर्धा

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांवर आश्वासनांची खैरात करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी सध्या स्पर्धा लागली आहे. महायुतीने महिलांना दरमहा २१०० रुपये तर महाविकास आघाडीने तीन हजार रुपयांचे आश्वासन दिले आहे. सविस्तर वाचा…

11:51 (IST) 7 Nov 2024
इस्लामपूरमध्ये लोकांना बदल हवा – निशिकांत पाटील

सांगली : बारामतीचे स्वप्न दाखवून करामती करण्याचे काम इथल्या लोकप्रतिनिधींनी केले आहे. आता परिवर्तनाची नांदी सुरू असून लोकांना बदल हवा आहे, असे प्रतिपादन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी केले. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर शहरातील हनुमान नगर, महादेव नगर, शास्त्री कॉलनी आदी भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

पाटील म्हणाले, या तालुक्यातील लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. लाडकी बहीण योजनेचे स्वागत साऱ्या राज्यातील आमदार व भगिनींनी केले. परंतु या योजनेला या तालुक्यातील आमदारांनी विरोध केला. त्यांनी बारामतीची स्वप्ने येथील जनतेला दाखवली. पण त्यांनी ३५ वर्षांत फक्त करामती करण्याचे काम केले. या तालुक्यात विकास सर्वसामान्य लोकांचा झाला नाही तर तो या आमदारांच्या पै-पाहुण्यांचा झाला. ४० वर्षांत पाणंद रस्ते झाले नाहीत. आता आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे पाणंद रस्ते केले. लाडकी बहीण योजना आणून गोरगरीब माता-भगिनींना आधार दिला. या नेत्याने फक्त घराघरात भांडणे लावून गटा-तटाचे राजकारण करत हुकूमशाही पद्धतीने सत्ता भोगली. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना बाजूला करण्याची संधी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

11:51 (IST) 7 Nov 2024
रिकाम्या गावात प्रचार कोणापुढे करायचा? गावकरी शेतात,उमेदवार पेचात

वर्धा वगळता जिल्ह्यातील तीनही ही मतदारसंघात प्रामुख्याने ग्रामीण भाग येतो. वर्धा मतदारसंघ पण सेलू व नजीकच्या भागात ग्रामीण भागात मोडतो. मात्र उमेदवार येतात तेव्हा गावात शुकशुकाट दिसून येत असल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा…

11:50 (IST) 7 Nov 2024
तासगावच्या विकासासाठी साथ द्या – रोहित पाटील

स्व. आर. आर. पाटील यांच्या स्वप्नातील अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी आपण मला ताकद द्याल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना येत्या २० नोव्हेंबरला रंगणार आहे. त्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने बीकेसी मैदानात सभा घेतली.

महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीने दिलेली पाच वचनं काय ? (फोटो-प्रदीप दास, इंडियन एक्स्प्रेस)