Maharashtra Vidhan Sabha Election Updates : मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामु, ळे प्रचारसभांना वेग आला आहे. केंद्रातील अनेक नेते महाराष्ट्रात दाखल झाले असून रॅलींतून जनतेशी संवाद साधत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने आरोप प्रत्यारोपांना उत आलाय. विविध माध्यमांवरील मुलाखतीत नेत्यांकडून अनेक गौप्यस्फोट केले जात आहेत. या गौप्यस्फोटांवर अनेकांचे प्रत्युत्तरही येत आहेत. त्यामुळे राज्यात गारठा पसरलेला असला तरीही राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय घडतंय? कोणात्या कुठे सभा आहेत? या सभांमधून कोण कोणावर निशाणा साधतंय हे पाहुयात.

Live Updates

Maharashtra News Live Today, 13 November 2024 : राज्यातील राजकीय घडामडी जाणून घेऊयात

20:03 (IST) 13 Nov 2024

‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा

'बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देऊन देशभर खळबळ उडवून देणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मीरा रोड येथे पुन्हा या घोषणेचा पुनरुच्चार केला.

सविस्तर वाचा...

19:35 (IST) 13 Nov 2024

‘एसआयओ’तर्फे विद्यार्थ्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध; विविध शैक्षणिक, सामाजिक, रोजगार, पर्यावरण संवर्धनाशी संबंधित मागण्यांवर भर

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्ष जाहिरनाम्यातून आश्वासनांची खैरात करीत आहेत.

सविस्तर वाचा...

19:35 (IST) 13 Nov 2024

विर्लेपार्ले विधानसभा मतदार संघ: झोपड्यांचे पुनर्वसन, विमानतळ फनेल झोनसह अनेक समस्या ‘जैसे थे’, समस्यांकडे लक्ष देण्याची मतदारांची मागणी

विर्लेपार्ले मतदारसंघ मुंबईतील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून नेहमीप्रमाणे यावेळीही या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

सविस्तर वाचा...

19:34 (IST) 13 Nov 2024

“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा

ठाकरे यांनी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना "खाली मुंडी पाताळ धुंडी…मनी नाही भाव देवा मला पाव" असे म्हणत केसरकर यांचा पराभव झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चांगले होईल असा टोला हाणला.

सविस्तर वाचा...

18:17 (IST) 13 Nov 2024

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्यावर तपासणी

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग सलग दोन दिवस वणी व औसा येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

18:16 (IST) 13 Nov 2024

मलंगगड परिसरात सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचे फलक फाडले

कल्याण – कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचे फलक काही अज्ञात इसमांनी फाडून टाकले आहेत. याप्रकरणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

सविस्तर वाचा....

18:04 (IST) 13 Nov 2024

साहेब जातात कधी याची वाटच अजित पवार पाहत आहेत, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप

ठाणे : ९० वर्षांचे वडील रुग्णालयात बिछाण्यात पडले असताना लोक उधारी काढून रुग्णालयाचे देयक भरतात आणि वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे जेव्हा बघावे तेव्हा साहेब कधी जातात याच मार्गावर असतात असा आरोप राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.

सविस्तर वाचा...

18:03 (IST) 13 Nov 2024

मोदी हे भारतातील मशीदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणणार, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची आरोप

ठाणे : आपण यापूर्वीच एक मशीद गमावून बसलो आहोत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील इतर मशीदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणू इच्छित आहेत असा आरोप एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

सविस्तर वाचा...

17:58 (IST) 13 Nov 2024
पक्षाच्या विचारधारे पेक्षा पैशावर लढवल्या जात आहेत निवडणुका, माजी आमदार सुभाष बने यांनी व्यक्त केली खंत

संगमेश्वर : आज सर्वत्र निवडणूका पक्षाच्या विचारधारेपेक्षा पैशाच्या जोरावर लढविल्या जात आहेत. ही चिंतेची बाब असून हे लोकशाहीला घातक असल्याची खंत शिवसेनेचे नेते माजी आमदार सुभाष बने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आज काही लोक पदाचा व सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. ते जनहिताकडे कानाडोळा करून पैसा लुटायचा व तो पैसा निवडणूकीच्या काळात वारेमाप उधळवत निवडणूक जिंकण्यासाठी वापरून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे सुत्रच झाले आहे. मात्र यावेळेस हे तंत्र जागृत मतदारच उधळून लावेल आणि सत्तेचा माज आलेल्यांची धुळदाण करत घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

करोडो रुपयांची विकासकामे झाली असल्याचे दावे-प्रतिदावे करणाऱ्यांनी जनतेच्या मुलभूत गरजा कीती पुर्ण झाल्या. आपण व आपल्या बगलबच्यांनी आलेल्या निधिवर कीती डल्ला मारला.? तसेच विकासाच्या आकडेवारीत किती सत्यता आहे. ते तपासून याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला ही बने यांनी विरोधकांना दिला.

17:51 (IST) 13 Nov 2024

कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न

कधीकाळी यवतमाळ जिल्ह्यात कुणबी समाजाचे राजकीय वर्चस्व होते. गेल्या दशकात समाजाचे हे वर्चस्व कमी झाल्याने कुणबी समाजात खदखद आहे.

सविस्तर वाचा...

17:40 (IST) 13 Nov 2024

अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश

विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराने सध्या जोर पकडला आहे. यंदाही शहरासह ग्रामीणमध्ये अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 13 Nov 2024

भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान

धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून दुखावलेले भाजपचे स्थानिक बहुतांंश कार्यकर्ते, पदाधिकारी अजूनही ‘घड्याळा’च्या प्रचारात सक्रीय झालेले दिसत नाहीत.

सविस्तर वाचा...

17:00 (IST) 13 Nov 2024

ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?

विशेष म्हणजे स्वत: गणेश नाईक हेदेखील बंडखोरांची मनधरणी करत नसल्याने ऐरोली शिंदेसेना विरुद्ध नाईक हा सामना टिपेला पोहचला आहे.

सविस्तर वाचा...

16:04 (IST) 13 Nov 2024

शिवसेना (शिंदे गट) नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी बांधले शिवबंधन

शिवसेना (शिंदे गट) चे नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले.

सविस्तर वाचा...

15:08 (IST) 13 Nov 2024

लोकसभेतील मतांचे गणित विधानसभेत कायम राहणार? महायुती व मविआचे समीकरण जुळवण्याचे लक्ष्य

लोकसभेच्या निवडणुकीत अकोला मतदारसंघांतील विधानसभेच्या पाच जागांवर भाजप व काँग्रेसमध्ये तीव्र चुरस झाली, तर अकोला पूर्व मतदारसंघात भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये मतांसाठी चढाओढ दिसून आली.

सविस्तर वाचा...

14:56 (IST) 13 Nov 2024

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी… अमोल देशमुख म्हणाले, आशीष देशमुखांची मानसिकताच….

नागपूर : आशीष आणि अमोल देशमुख हे रणजीत देशमुख यांची दोन मुले आहेत. आशीष देशमुख यांचे सख्खे भाऊ अमोल देशमुख यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बुधवारी पत्रकार परिषद घेत आशीष देशमुखांवर अनेक आरोप केले.

वाचा सविस्तर...

14:53 (IST) 13 Nov 2024

अमरावती जिल्‍ह्यात उपद्रवमूल्‍य वाढविणारा प्रयोग

जिल्‍ह्याच्‍या राजकारणात अस्तित्‍वाच्‍या पाऊलखुणा जपण्‍यासाठी प्रयत्‍नशील असलेले युवा स्‍वाभिमान पक्षाचे बडनेरा येथील उमेदवार रवी राणा यांची महायुतीतील कार्यशैली वादात सापडली आहे.

सविस्तर वाचा...

14:30 (IST) 13 Nov 2024

कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये

कल्याण-डोंबिवलीत प्रचारासाठी प्रचारक मजुरांची गरज वाढू लागली आहे. त्यात प्रचारक मजूर मिळणे दुर्मिळ झाल्याने उमेदवारांनी मजुरांना आता ८०० रूपये ते १२०० रूपये रोजची मजुरी देणे सुरू केली आहे.

वाचा सविस्तर...

14:24 (IST) 13 Nov 2024

‘निष्ठावान’ अशी प्रतिमा उदयसिंह राजपूत यांना तारू शकेल ?

शिवसेनेतील फुटीनंतर ‘ निष्ठावान’ अशी ओळख शिवसैनिकांमध्ये असणाऱ्या उदयसिंह राजपूत यांच्यासमोर या वेळी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आव्हान निर्माण केले आहे.

सविस्तर वाचा...

14:03 (IST) 13 Nov 2024

"माझ्या कोकणाचं अदाणीकरण होऊ देणार नाही", उद्धव ठाकरेंचा घणाघात

साईबाबा म्हणायचे की सबका मालिक एक. पण हे लोक म्हणतात की सबका मालिक अदाणी. कोकणाचं मी अदाणीकर होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे</p>

13:54 (IST) 13 Nov 2024

विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण

फडणवीस व अहीर यांच्यात टोकाचे मतभेद होते. मात्र, आता अहीर व मुनगंटीवार यांच्यातील मतभेदाने टोक गाठले आहे.

सविस्तर वाचा...

13:45 (IST) 13 Nov 2024

सांगलीत जयंत पाटील यांची कसोटी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कोंडी करण्यासाठी एकास एक लढत निश्‍चित करण्यात महायुती यशस्वी ठरली आहे.

सविस्तर वाचा...

13:34 (IST) 13 Nov 2024

तहानलेल्या वस्त्यांमध्ये प्रचारतही पाणी मुद्द्याची टंचाई, जिल्ह्यातील इतर मतदार संघांमध्ये मात्र पाणीप्रश्नावरून राजकारण तापले

पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून नवी मुंबईतील ऐरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, कळवा-मुंब्रा तसेच इतर मतदार संघात राजकारण तापले आहे.

वाचा सविस्तर...

13:14 (IST) 13 Nov 2024

अजित पवारांचं २४ तासांत घुमजाव, गौतम अदाणींबरोबर झालेल्या बैठकीबाबत म्हणाले…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपी भाजपाच्या सरकार स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदाणी हजर होते, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्याच्या गादीवर कोण बसणार हे आता उद्योगपती ठरवणार का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी आता घुमजाव केलं आहे. माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वृत्त वाचा

13:12 (IST) 13 Nov 2024

Navneet Rana: अडसूळ पिता-पुत्रावर नवनीत राणांची शेलक्या शब्दात टीका, म्हणाल्या “दीडफुट्या ,चारफुट्या…बाहेरचे पार्सल”

नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदारसंघात युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्‍या प्रचार सभेला उपस्थित राहून महायुतीच्‍या नेत्‍यांना आव्‍हान दिले.

सविस्तर वाचा...

12:58 (IST) 13 Nov 2024

Rohit Pawar: “नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची दहशत”, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

लोक देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. त्यांची राज्यात आणि त्यांच्या शहरातही दहशत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

सविस्तर वाचा...

12:20 (IST) 13 Nov 2024

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार - अमित देशमुख

सांगली : राज्यात २५ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, त्यावेळी सांगलीचे आमदार म्हणून पृथ्वीराज पाटील हे शपथ घेतील, असा विश्वास माजी मंत्री अमित देशमुख यांनी सांगलीत व्यक्त केला.सांगलीतील काँग्रेसचे उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, सांगलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता आणि व्यापक दृष्टी केवळ श्री. पाटील यांच्याकडेच दिसून येते. त्यांनी सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी जादा खाटांची मागणी मी मंत्री असताना केली होती. जनतेसाठी मागणारा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी या प्रकल्पाला मान्यता दिली होती.

12:19 (IST) 13 Nov 2024

जतच्या जनतेला बाहेरचा उमेदवार अमान्य - जगताप

सांगली : जत विधानसभेला भाजपने दिलेल्या उमेदवाराचे तालुक्यात घर आणि शेत नाही, असा बाहेरचा उमेदवार जतची स्वाभिमानी जनता कदापि मान्य करणार नाही. जतकरांचा स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी स्वाभिमानी विकास आघाडीने तमणगोंडा रविपाटील यांची उमेदवारी दिली असून जनता निश्चितपणे आपली ताकद मतांच्या स्वरूपात दाखवून जातीचे राजकारण हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी आमदार विलासराव जगताप यांनी मंगळवारी व्यक्त केला.अपक्ष उमेदवार रविपाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवारी कुंभारी, हिवरे, डोर्ली, बाज, बेळुंखी, डफळापूर आदी ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. जगताप बोलत होते. यावेळी शंकर वगरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आक्काताई दुधाळ, शहाजी भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. वगरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत रविपाटील यांच्या प्रचार प्रमुख पदाच्या कारकिर्दीत भाजपला सर्वाधिक मतदान झाले. तरीही पक्षाने बाहेरचा उमेदवार लादून स्वाभिमानी जतच्या जनतेचा अवमान केला आहे. दोन आमदार विरुद्ध सुशिक्षित आणि स्वाभिमानी कार्यकर्ता अशी लढत होत आहे. एका आमदाराची अजून ३० महिने मुदत असताना पुन्हा त्यांनाच का संधी दिली, हे कळायला मार्ग नाही. काँग्रेसचे आमदार तर निष्क्रिय आहेत. त्यांना जनता कंटाळली आहे. यामुळे आता नवीन चेहरा देणे गरजेचे असल्याने रविपाटील यांना संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.उमेदवार रविपाटील म्हणाले, या भागात पाणी आले म्हणून समृद्धी आली, असे होणार नाही. तालुक्याचा औद्योगिक विकास होणेही गरजेचे आहे. बेरोजगारीचा महत्त्वाचा प्रश्न आहेच, पण दूध प्रक्रिया उद्योग उभा करणे हे यापुढील काळात करणे आवश्यक आहे. यासाठी युवकांची शक्ती विकासात गुंतली तरच स्थैर्य लाभणार आहे. यासाठीच मी उमेदवारी दाखल केली आहे. जनताही माझ्या पाठीशी उभी राहिल, असा विश्वास वाटतो, असे ते म्हणाले.

12:15 (IST) 13 Nov 2024

वन्य प्राण्यांचा उपद्रव, शेतीला सौर कुंपण योजना;शंभूराज देसाई यांची ग्वाही

कराड : शेती आणि शेतकऱ्यांसाठीचा वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी सौर कुंपण योजना राबवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.पाटण विधानसभा मतदारसंघातील ‘महायुती’तर्फे शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई हे कुंभारगाव (ता. पाटण) येथे प्रचार सभेत बोलत होते. दरम्यान, शंभुराजेंनी विभागातील वाड्या-वस्त्यांमध्ये थेट मतदारांशी संवाद साधला.

शंभूराज म्हणाले, गाव लहान की मोठे याला महत्त्व नाही, गावाचा विकास महत्त्वाचा आहे. या भूमिकेतून आम्ही विकासकामे केली. मात्र, स्वतः काही काम करायची नाही आणि जो चांगले काम करतोय त्याला करु द्यायचे नाही, अशी विरोधकांची मानसिकता आहे. परंतु, विरोधकांची ही वृत्ती यापुढे खपवून घ्यायची नसल्याचे मतदारांनीच ठरवले आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील दरीखोऱ्यात विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम आपण केले. पठारावरील सर्व विकासकामे जलद गतीने सुरू आहेत. पठारावरील नागरिकांच्या घरापर्यंत रस्ता पोहोचवला. ग्रामस्थांनी ज्या-ज्या विकासकामाची मागणी केली. ते काम आम्ही केले आहे. पाच वर्षांपूर्वी आम्ही निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले असून, मतदारसंघात विकासाची कामे केली आहेत. दरम्यान, सणबूर, मंद्रूळकोळे विभागातील गावभेटी आणि कुंभारगाव येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे शंभूराज यांनी सांगितले.

Story img Loader