Maharashtra Vidhan Sabha Election Updates : मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामु, ळे प्रचारसभांना वेग आला आहे. केंद्रातील अनेक नेते महाराष्ट्रात दाखल झाले असून रॅलींतून जनतेशी संवाद साधत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने आरोप प्रत्यारोपांना उत आलाय. विविध माध्यमांवरील मुलाखतीत नेत्यांकडून अनेक गौप्यस्फोट केले जात आहेत. या गौप्यस्फोटांवर अनेकांचे प्रत्युत्तरही येत आहेत. त्यामुळे राज्यात गारठा पसरलेला असला तरीही राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय घडतंय? कोणात्या कुठे सभा आहेत? या सभांमधून कोण कोणावर निशाणा साधतंय हे पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Live Today, 13 November 2024 : राज्यातील राजकीय घडामडी जाणून घेऊयात

11:21 (IST) 13 Nov 2024

देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न सचिन वाझे आणि अनिल देशमुखांना केला-चांदिवाल

अनिल देशमुख, पलांडे यांना आम्ही दंड भरायला लावला होता. आम्हाला जे शपथपत्र दिलं होतं त्याअनुसार सचिन वाझेंनी साक्षी पुरावे दिले असते तर बराच खुलासा झाला असता. त्यांच्या शपथ पत्रात त्यांनी दोन राजकीय व्यक्तींची नावं घेतली होती. आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख केला होता. ती नावं होती अजित पवार आणि शरद पवार. मी त्यांना ही नावं रेकॉर्डवर घेणार नाही. नियमांत बसत नसल्याने मी ते रेकॉर्डवर घेतलं नाही. देवेंद्र फडणवीस हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरण कुठलं होतं ते मी सांगणार नाही.असं चांदिवाल यांनी स्पष्ट केलं. मी त्यावेळी हे बोललो नाही कारण चर्चा करण्याला कारण मिळतं. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी नको होती. त्यामुळे मी त्यावेळी काही बोललो नाही. असंही चांदिवाल ( Justice Chandiwal ) यांनी स्पष्ट केलं

11:10 (IST) 13 Nov 2024

Maharashtra Live Update : “मी ऑन कॅमेरा सांगतेय की…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

गौतम अदाणींच्या उपस्थिती एनसीपी- भाजपा युतीसाठी बैठक झाली होती, असा दावा अजित पवारांनी केला होता. या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “एकतर या प्रश्नाचं उत्तर अजित पवारांना विचारावं लागेल. मी ऑन कॅमेरा सांगतेय, अशी कोणतीही मीटिंग झाली याची माहिती मला नाही. ही मीटिंग झाली की नाही हेही मला माहीत नाही. सकाळच्या शपथविधीबद्दल मला काहीही माहित नाही. मी झोपले होते आणि सदानंद सुळेंनी उठवंल नी सांगितलं की बघा काय चाललंय.”